Airtelच्या नव्या प्लॅनचा धमाका, 599 रुपयांत 2 लोकांना मिळणार डेटा-कॉलिंग आणि बरंच काही..
Airtel 599 Plan Details : कंपनीने एक नवीन प्लॅन लाँच केला आहे. या नवीन योजनेमुळे तुम्हाला कोणते फायदे मिळणार आहेत ते जाणून घेऊया.
नवी दिल्ली : एअरटेल (Airtel) या टेलीकॉम कंपनीने काही काळापूर्वी प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनसह अनलिमिटेड 5G डेटा देण्याची घोषणा केली होती. आणि आता कंपनीने त्यांच्या वापरकर्त्यांसाठी (users) एक नवीन योजना आणली आहे. एअरटेलच्या नवीन प्लॅनची (new plan) किंमत 599 रुपये आहे. या प्लॅनमुळे तुम्हाला कोणते फायदे मिळतील, त्याबद्दल जाणून घेऊया.
Airtel 599 Plan Details
हा प्लॅन एअरटेलच्या अधिकृत साइटवर लिस्ट करण्यात आला आहेए. अरटेलच्या या नवीन पोस्टपेड प्लॅनमध्ये तुम्हाला 75 जीबी हायस्पीड डेटासह फ्री अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलिंग सुविधा तसेच दररोज 100 एसएमएसची सुविधा मिळेल.
इतकेच नाही तर या 599 रुपयांच्या एरियल रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला डेटा रोलओव्हरची सुविधाही मिळेल. पण तुमच्या माहितीसाठी हे जरूर नमूद केले पाहिजे ती कंपनीच्या अधिकृत साइटवर दिलेल्या माहितीनुसार, या प्लॅनसह 200 GB पर्यंत डेटा रोलओव्हर सुविधा प्रदान करण्यात आली आहे.
कंपनीचा हा एअरटेल फॅमिली प्लॅन आहे, ज्यामध्ये एक ॲड ऑन कनेक्शन देखील देण्यात आले आहे. म्हणजेच तुम्ही 599 रुपयांमध्ये दोन नंबर चालवू शकता. दुसऱ्या कनेक्शनसाठी 30 जीबी वेगळा डेटा दिला जाईल, म्हणजेच या प्लॅनमध्ये एकूण 105 जीबी हायस्पीड डेटा मिळेल.
Airtel 599 Plan सह मिळतील अन्य फायदे
डेटा, कॉलिंग आणि एसएमएस व्यतिरिक्त, या प्लॅनसह, युजर्स म्हणजेच वापरकर्त्यांना 6 महिन्यांसाठी Amazon Prime Video ची मेंबरशिप (सदस्यत्व) आणि 1 वर्षासाठी Disney + Hotstar मोबाइल चे सबस्क्रिप्शन दिले जाते. या प्लॅनसोबत विंक म्युझिक प्रीमियम, हँडसेट प्रोटेक्शनची सुविधाही उपलब्ध आहे. याशिवाय एअरटेलकडे 699 रुपये, 999 रुपये, 1199 रुपये आणि 1499 रुपयांचे फॅमिली पोस्टपेड प्लॅन देखील उपलब्ध आहेत.
Reliance Jio 599 Postpaid Plan
599 रुपयांच्या या Jio पोस्टपेड प्लॅनमध्ये 100 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 SMS आणि 200 GB डेटा रोलओव्हर प्रदान करण्यात आला आहे. या प्लॅनसह अतिरिक्त कनेक्शन देखील उपलब्ध आहे.
इतर फायद्यांबद्दल सांगायचे तर, या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स मोबाईल प्लॅन, जिओ टीव्ही, अॅमेझॉन प्राइम आणि जिओ क्लाउड सारख्या ॲप्सचे फायदे दिले आहेत. या प्लॅनमध्ये 5G यूजर्सना अनलिमिटेड डेटाचा लाभ मिळणार आहे.