Samsung Galaxy S20 Plus (8GB+128GB) : फ्लिपकार्ट दिवाळी सेलमध्ये Samsung Galaxy S20+ हा जबरदस्त स्मार्टफोन तुम्ही 49,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. या स्मार्टफोनची मूळ किंमत ही तब्बल 83,000 रुपये आहे. हा स्मार्टफोन तुम्ही 'नो कॉस्ट ईएमआय'वरही खरेदी करु शकता. तसेच यावर एक्सचेंज ऑफर आणि ठराविक क्रेडिट कार्डवर कॅशबॅक ऑफर्सदेखील देण्यात आल्या आहेत.
Motorola Razr-2019 (6GB+64GB) : फ्लिपकार्ट दिवाळी सेलमध्ये मोटोरोला रेजर 2019 हा स्मार्टफोन तुम्ही 84,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. या स्मार्टफोनची मूळ किंमत 1,49,999 रुपये इतकी आहे.
जसजसे अँड्रॉईड फोन जुने होत जातात तसतसे हळुहळु त्यामध्ये अनेक गोष्टींना सपोर्ट मिळणं बंद होतं. फोन खूपच जुना झाला तर त्यात आवश्यक गोष्टीही करणं मुश्किल होऊन जातं असल्याच्या तक्रारी स्मार्टफोन युजर्स करतात.
Samsung Galaxy M51 (6GB+128GB) : अमेझॉन सेलमध्ये हा स्मार्टफोन तुम्ही 22,499 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. याची मूळ किंमत 24,999 रुपये इतकी आहे. यासोबत सिटी बँक, कोटक बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या कार्डद्वारे शॉपिंग केल्यास 3,000 रुपयांचा डिस्काऊंट मिळेल.
Redmi Note 9 Pro Max (6GB+64GB) : अमेझॉन सेलमध्ये हा फोन तुम्ही 15,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. या फोनची मूळ किंमत 18,999 रुपये आहे. तसेच या फोनवर अनेक एक्सचेंज ऑफर्सदेखील देण्यात आल्या आहेत.