AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Smartphone Upgrade Days sale : 9000 रुपयांच्या डिस्काऊंटसह iPhone 12 खरेदीची संधी

अमेझॉन इंडियाने (Amazon India) स्मार्टफोन अपग्रेड डेज सेलची (Smartphone Upgrade Days sale) घोषणा केली आहे.

Smartphone Upgrade Days sale : 9000 रुपयांच्या डिस्काऊंटसह iPhone 12 खरेदीची संधी
Iphone 12
Follow us
| Updated on: Jul 07, 2021 | 5:01 PM

मुंबई : अमेझॉन इंडियाने (Amazon India) स्मार्टफोन अपग्रेड डेज सेलची (Smartphone Upgrade Days sale) घोषणा केली आहे, ज्याअंतर्गत ग्राहक अनेक फोनवर डील आणि ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात. ई-कॉमर्स वेबसाइटने OnePlus, Xiaomi, Samsung, Apple, Vivo आणि Oppo च्या फोनवर सूट जाहीर केली आहे. (Amazon Smartphone Upgrade Days sale, up to 9000 Rs discount on iPhone 12)

नियमित डील्सव्यतिरिक्त अमेझॉनने नवीन OnePlus Nord CE 5G, Redmi Note 10S आणि Tecno Spark 7T सारख्या इतर काही स्मार्टफोन्सवर बँक ऑफर्स सादर केल्या आहेत. स्मार्टफोन अपग्रेड डेज सेलअंतर्गत सुरु झालेली विक्री 8 जुलै 2021 पर्यंत लाईव्ह असेल. विक्रीदरम्यान ग्राहक एसबीआय क्रेडिट कार्डवर 10 टक्के त्वरित सवलत मिळवू शकतात.

बँक ऑफरअंतर्गत एसबीआय क्रेडिट कार्ड वापरणा्ऱ्यांना एसबीआय क्रेडिट कार्ड किंवा ईएमआय पेमेंट वापरण्यावर आयफोन 12 वर इन्स्टंट सूट म्हणून 1,250 रुपयांपर्यंतची सवलत मिळेल. विक्रीदरम्यान काही हायलाइट डील्समध्ये आयफोन 12 चा समावेश आहे जो 9,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह उपलब्ध आहे. हा फोन ग्राहक 70,900 रुपयांमध्ये खरेदी करु शकतात. ग्राहक एसबीआय क्रेडिट कार्ड ऑफरसह 750 रुपयांच्या फ्लॅट डिस्काऊंटचादेखील लाभ घेऊ शकतात. त्यामुळे हा फोन ग्राहक 70,150 रुपयांमध्ये खरेदी करु शकतात.

आयफोन 12 चे फिचर्स

Apple ने आयफोन 12 पाच नवीन रंगांमध्ये लाँच केला आहे. ज्यामध्ये निळा, लाल, काळा, पांढरा आणि हिरवा या रंगांचा समावेश आहे. आयफोन 12 मध्ये सुपर रेटिना XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की, ही आतापर्यंतची सर्वात टिकाऊ आणि सर्वोत्कृष्ट स्क्रीन आहे.

आयफोन 12 सिरेमिक शील्डने सुसज्ज आहे ज्यामुळे हा फोन पूर्वीपेक्षा टिकाऊ बनला आहे. आयफोन 12 हा स्मार्टफोन 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड कॅमेरा + 12 मेगापिक्सलच्या वाइड अँगल लेन्ससह लाँच करण्यात आला आहे.

आयफोन 12 मध्ये डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर आयफोन 12 प्रो मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. आयफोन 12 मध्ये 12 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. जो वाइड आणि अल्ट्रा वाइड लेन्सने सुसज्ज आहे.

आयफोन 12 प्रो मध्ये 12 मेगापिक्सलचा F1.6 प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. सोबत 12 मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरादेखील देण्यात आला आहे. सोबत 7 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरादेखील देण्यात आला आहे.

इतर बातम्या

फेसबुक, ट्विटर आणि गुगलने या देशाला दिली धमकी; जाणून घ्या कारण

अखेर Twitter नमलं, नवे तक्रार अधिकारी नेमणार, दिल्ली हायकोर्टात माहिती

(Amazon Smartphone Upgrade Days sale, up to 9000 Rs discount on iPhone 12)

'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.
हाफीज सईदला लादेनसारखा मारा अन्.... अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल
हाफीज सईदला लादेनसारखा मारा अन्.... अमेरिकेचा भारताला ग्रीन सिग्नल.