AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amazon आता स्वतःच्या ब्रँडचा टीव्ही विकणार, अ‍ॅलेक्सासह टीव्हीमध्ये अनोखे फीचर्स

बिझनेस इनसाइडरने गुरुवारी सांगितले की अमेझॉन (Amazon) ऑक्टोबरच्या सुरुवातीला अमेरिकेत अमेझॉन-ब्रँडेड टीव्ही लाँच करण्याची योजना आखत आहे.

Amazon आता स्वतःच्या ब्रँडचा टीव्ही विकणार, अ‍ॅलेक्सासह टीव्हीमध्ये अनोखे फीचर्स
Follow us
| Updated on: Sep 04, 2021 | 7:28 PM

मुंबई : बिझनेस इनसाइडरने गुरुवारी सांगितले की अमेझॉन (Amazon) ऑक्टोबरच्या सुरुवातीला अमेरिकेत अमेझॉन-ब्रँडेड टीव्ही लाँच करण्याची योजना आखत आहे. याच्याशी संबधित लोकांचा हवाला देत, अहवालात म्हटले आहे की, Amazon डिव्हाइसेस आणि लॅब 126 च्या टीमचा समावेश करत जवळपास दोन वर्षांपासून टीव्ही लाँच करण्याचे काम सुरु आहे. (Amazon will Launch their Own TV By Oct)

अहवालात म्हटले आहे की, टीव्ही व्हॉईस असिस्टंट अलेक्साद्वारे ऑपरेट होईल. सध्या हा टीव्ही थर्ड पार्टीकडून डिझाइन आणि विकसित केला जात आहे, त्यापैकी एक टीसीएल आहे. याशिवाय, आगामी टीव्हीमध्ये अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्ये देखील उपलब्ध असतील. तथापि, Amazon ने या टिप्पणीला कोणताही प्रतिसाद दिला नाही. अमेझॉनला टीव्ही बाजारात थोडा अनुभव आहे. AmazonBasics ब्रँड अंतर्गत परवडणारे टीव्ही उपलब्ध आहेत.

अमेझॉन फायर टीव्ही सॉफ्टवेअर भारतात उपलब्ध

टेक दिग्गज कंपनीने गेल्या वर्षीच्या अखेरीस भारतात AmazonBasics TV लाँच केले होते. Retail दिग्गज जायंटने तोशिबा आणि इन्सिग्निया टीव्हीची विक्री करण्यासाठी फायर टीव्ही सॉफ्टवेअर चालवणाऱ्या बेस्टबायसोबत भागीदारी केली आहे. भारतात, कंपनी फायर टीव्ही सॉफ्टवेअरसह Ondia, Croma आणि AmazonBasics TV टीव्ही विकते, जे 16,499 रुपयांपासून ते 50,990 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

अमेझॉन कंपनी फायर टीव्ही स्टिक आणि फायर टीव्ही क्यूब देखील विकते, ज्याद्वारे आपण टीव्हीला स्मार्ट टीव्हीमध्ये रूपांतरित करू शकता. थर्ड जनरेशन फायर टीव्ही स्टिक 3,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, तर फायर टीव्ही स्टिक 4K 5,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. फायर टीव्ही क्यूबची किंमत 12,999 रुपये आहे.

अमेझॉनशी संबंधित इतर बातम्यांमध्ये, सीईओ अँडी जेसी यांनी 1 सप्टेंबर रोजी सांगितले की कंपनी येत्या महिन्यांत जागतिक स्तरावर कॉर्पोरेट आणि टेक्निकल भूमिकांसाठी 55,000 लोकांना नियुक्त करण्याची योजना आखत आहे.

जुलैमध्ये Amazon च्या टॉप पोस्टवर रुजू झाल्यापासून आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत जेसी म्हणाले की, कंपनीला इतर व्यवसायांमध्ये रिटेल, क्लाउड आणि जाहिरातींमधील मागणी कायम ठेवण्यासाठी अधिक मेहनत करण्याची गरज आहे. प्रोजेक्ट कुइपर नावाच्या ब्रॉडबँडचा वापर वाढवण्यासाठी उपग्रह कक्षेत सोडण्याच्या कंपनीच्या नवीन अटीलाही अनेक गोष्टींची आवश्यकता असेल, असेही ते म्हणाले.

15 सप्टेंबरपासून अमेझॉनच्या वार्षिक रोजगार मेळाव्यामुळे जेसी यांना अपेक्षा आहे की, आता नोकरीसाठी चांगला काळ असेल. जेसीने पीडब्ल्यूसीच्या अमेरिकेच्या सर्वेक्षणाचा हवाला देत जेसी यांनी सांगितले की, “कोरोना साथीच्या काळात, बर्‍याच नोकऱ्या आहेत ज्या डिसप्लेस्ड किंवा बदलल्या गेल्या आहेत आणि असे बरेच लोक आहेत जे नोकरीचे वेगळे पर्याय आणि नवीन संधी शोधत आहेत.”

इतर बातम्या

कमी किंमत आणि 6000mAh बॅटरीसह Redmi 10 Prime भारतात लाँच

Samsung Galaxy M32 5G बाजारात, आजपासून सेल सुरु, जाणून घ्या किती आहे 5G फोनची किंमत

वर्षअखेरीस Samsung सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच करणार, जाणून घ्या फीचर्स

(Amazon will Launch their Own TV By Oct)

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....