व्हॉट्सअपच्या मनमानीनंतर आनंद महिंद्रा, विजय शेखर यांच्यासह या दिग्गजांनी वापरलं सिग्रल अ‌ॅप!

जगभरातील कोट्यवधी युजर्सला नववर्षाच्या दुसऱ्याच आठवड्यात WhatsApp ने नव्या अटी आणि शर्थींचे नोटिफिकेशन टाकलं होतो.

व्हॉट्सअपच्या मनमानीनंतर आनंद महिंद्रा, विजय शेखर यांच्यासह या दिग्गजांनी वापरलं सिग्रल अ‌ॅप!
Follow us
| Updated on: Jan 12, 2021 | 6:53 PM

मुंबई : जगभरातील कोट्यवधी युजर्सला नववर्षाच्या दुसऱ्याच आठवड्यात WhatsApp ने नव्या अटी आणि शर्थींचे नोटिफिकेशन टाकलं होतो. या अटी आणि शर्ती मान्य करणे, प्रत्येक व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला गरजेचे असणार आहे. या नव्या अटी आणि शर्ती या फेसबुकसोबत करण्यात येणाऱ्या बदलाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यानंतर लोकांना व्हॉट्सअ‍ॅप वापरण्याकडेच पाठ फिरवण्याचे संकेत दिले आहेत. टेस्लाचे संस्थापक एलन मस्क यांनी सिग्नल अॅप वापरणार असल्याचे ट्वीट केले. (anand mahindra And Vijay Shankar sharma Will Use to Signal App After Whats App privacy policy)

त्यानंतर लोकांमध्ये ‘सिग्नल’ अॅप डाउनलोड करण्यासाठी स्पर्धाच लागली. भारतामधील अनेक कॉर्पोरेट कंपन्यानी सिग्नल अ‍ॅप वापरण्याचे कर्मचाऱ्यांना सांगितले आहे. महिंद्रा समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा हे देखील सिग्नल अॅप वापरणार आहेत. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनीही सिग्नल अ‍ॅप वापरण्याचे संकेत दिले आहेत. जिंदल स्टील अॅन्ड पॉवर कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांना व्हॉट्सअ‍ॅप ऐवजी कामात सिग्नल आणि टेलिग्राम सारखे अॅप वापरायला सांगितले आहे.

कंपनीच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स मॅनेजरने ट्वीट करून त्याविषयी माहिती दिली आहे. तसेच टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन आणि कंपनीच्या अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही सिग्नल अ‍ॅपवर येण्याबद्दल सांगितले आहे. भारतातील प्रमुख उद्योजकांनी व्हॉट्सअ‍ॅपकडे पाठ फिरवली आहे. याचा फटका व्हॉट्सअ‍ॅपला बसण्याची शक्यता आहे.

WhatsApp च्या नव्या धोरणांमुळे युजर्सची प्रायव्हसी कायम राहणार नाही. WhatsApp आता युजर्सची इत्यंभूत माहिती ठेवणार आहे. प्रामुख्याने आपला आर्थिक डेटा साठवून ठेवला जाणार आहे. म्हणजेच आपल्या आर्थिक व्यवहारांवरुन आपण गरीब आहोत, श्रीमंत आहोत की मध्यमवर्गीय आहोत याची वर्गवारी केली जाणार आहे. त्यानुसारच आपल्याला सोशल मीडियावर जाहिराती दिसतील. (उदा. श्रीमंत युजर्सना त्यांच्या सोशल मीडिया पेजेसवर महागड्या गाड्या, गॅजेट्सच्या जाहिराती दिसतील). कंपनी आपल्या डेटाचा वापर करुन अधिक पैसे कमावणार आहे.

WhatsApp च्या नव्या धोरणात स्पष्ट नमूद केलं आहे की, तुम्ही WhatsApp वर जो कंटेंट अपलोड, सबमिट, स्टोर, सेंड किंवा रिसिव्ह करत आहात त्याचा वापर रिप्रोड्यूस, डिस्ट्रीब्यूट आणि डिस्प्ले करण्यासाठी जगभरात नॉन एक्सक्लूझिव्ह, रॉयल्टी फ्री, सब्लिसेंसेबल आणि ट्रान्सफरेबल लायसन्स दिलं जात आहे.

संबंधित बातम्या : 

तुमचा WhatsApp वरील डेटा अन्य प्लॅटफॉर्म्सवर शेअर होणार, संमती न दिल्यास अकाऊंट बंद केलं जाईल

(anand mahindra And Vijay Shankar Will Use to Signal App After Whats App privacy policy)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.