iPhone 14 लॉन्च होताच युजर्सना बसला धक्का… ‘हा’ बजेट फोन झाला महाग

iPhone 14 सीरिज लाँच करताच ॲप्पलने iPhone 13 आणि iPhone 12 च्या किमती कमी केल्या आहेत. पण कंपनीच्या एका गोष्टीमुळे ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या सर्वात स्वस्त 5G फोनची किंमत वाढली आहे. त्यामुळे कभी खुशी कभी गम अशी काहीची गंमत ग्राहकांची झालेली दिसून येत आहे.

iPhone 14 लॉन्च होताच युजर्सना बसला धक्का… ‘हा’ बजेट फोन झाला महाग
iPhone
Follow us
| Updated on: Sep 09, 2022 | 5:41 PM

मुंबई : नुकतीच आयफोन 14 (iPhone 14) सिरीज लाँच झाली आहे, एकीकडे ॲप्पलने (Apple) आपला आयफोन (iPhone 13) आणि iPhone 12 यांना बजेट फोन करण्यासाठी त्यांच्या किमतीत नुकतीच कपात केली आहे तर दुसरीकडे कंपनीने आपल्या सर्वात स्वस्त 5G फोनची किंमत वाढवली आहे. ॲप्पलने iPhone SE 2022 च्या बेस मॉडेलची किंमत 6 हजार रुपयांनी वाढवली आहे. आयफोन SE 2022 भारतात कोणत्या किमतीत लॉन्च झाला आणि आता किंमत वाढल्यानंतर या मॉडेलची नवीन किंमत काय आहे, याची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

iPhone SE 2022 ची भारतात किंमत

iPhone SE 2022 च्या 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 43,900 रुपये होती, परंतु आता 6,000 रुपयांनी किंमत वाढवल्यानंतर, हे मॉडेल 49,900 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. iPhone SE 2022 चा 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 48,900 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता, परंतु 6,000 रुपयांच्या वाढीनंतर तुम्ही आता हे मॉडेल 54,900 रुपयांना खरेदी करू शकाल. iPhone SE 2022 चे 256 जीबी मॉडेल आधी 58,900 रुपयांना विकले जात होते, आता किंमत 6 हजारांनी वाढल्यानंतर हे मॉडेल खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 64,900 रुपये मोजावे लागणार आहेत. तिन्ही मॉडेल्स Apple च्या अधिकृत साइटवर नवीन किंमतींसह लिस्टींग करण्यात आले आहेत.

काय आहेत स्पेसिफिकेशन्स?

iPhone SE 2022 च्या स्पेसिफिकेशन्सबाबत बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 4.7 इंचाचा एचडी डिस्प्ले असून तो 750 x 1334 पिक्सेल रिझोल्यूशन देतो, या फोनमध्ये HDR10 सपोर्ट उपलब्ध आहे. किंमत वाढविण्यात आली असली तरी कंपनीन या फोनमध्ये फार टेक्निकल बदल केलेले नाहीत. फोनची संपूर्ण माहिती कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.