जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात रहा…iPhone 14 ला ‘अशी’ मिळेल कनेक्टिव्हिटी

Apple iPhone 14 सिरीजमध्ये आपत्कालीन परिस्थितीत वापरकर्त्यांना मदत करण्यासाठी सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या माध्यमातून सिग्नल नसलेल्या भागातही सॅटेलाइट नेटवर्कला जोडता येणार असल्याने ग्राहकांना कनेक्टिव्हिटीसाठी एक चांगला पर्याय निर्माण झाला आहे.

जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात रहा...iPhone 14 ला ‘अशी’ मिळेल कनेक्टिव्हिटी
नेहमीप्रमाणे Apple या वर्षी देखील आपली फ्लॅगशिप iPhone 14 सिरीज लॉन्च करण्याच्या तयारी आहे.Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 2:24 PM

नेहमीप्रमाणे Apple या वर्षी देखील आपली फ्लॅगशिप iPhone 14 (iPhone 14) सिरीज लॉन्च करण्याच्या तयारी आहे. आगामी iPhone 14 सिरीजमधील फोन मागील सिरीपेक्षा अपडेट करण्यात आले आहेत. नवी सिरीज लॉन्च होण्याआधीच फोनमध्ये आढळलेल्या काही खास स्पेसिफिकेशन्सबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज लावले जात आहेत. कारण iPhone 14 सिरीजमध्ये आपत्कालीन परिस्थितीत वापरकर्त्यांना मदत करण्यासाठी सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी (satellite connectivity) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या सुविधेमुळे सिग्नल (Signal) नसलेल्या परिसरात सॅटेलाईट मोबाईच्या नेटवर्कशी (Mobile network) जोडता येणार आहे. विशेषतः दुर्गम भागात याचा प्रामुख्याने उपयोग होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, iPhone 14 सप्टेंबर 2022 मध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे.

ब्लूमबर्गचे मार्क गुरमन यांनी ही माहिती दिली असून त्यांनी सांगितल्यानुसार, iPhone 14 ग्रामीण परिसरात सॅटेलाइट नेटवर्कशी कनेक्ट करण्यासाठी सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी सुविधेचा वापर करेल. मागील वर्षी देखील iPhone 13 सिरीज लाँच होण्यापूर्वी असाच एक रिपोर्ट समोर आला होता. मात्र अपेक्षेप्रमाणे तसेच घडले नाही. गुरमन यांनी अहवाल दिला आहे, की iPhone 14 वर उपलब्ध सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी पर्यायामुळे, वापरकर्ते सॅटेलाइट नेटवर्कशी कनेक्ट राहण्यास सक्षम होतील.

सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीची वैशिष्ट्ये

iPhone 14 कॉन्टॅक्ट ऑप्शनच्या माध्यमातून आपात्कालिन संदेशहवनासाठी चांगले काम करेल. वापरकर्त्यांना सेल्युलर सेवा उपलब्ध नसताना एक लहान संदेश पाठवणे सोपे जाईल. Apple iPhone 14 मालिकेअंतर्गत चार मॉडेल लाँच होण्याची अपेक्षा आहे. आयफोन 14, आयफोन 14 प्रो, आयफोन 14 प्रो मॅक्स आणि दुसर्या मॉडेलबाबत साशंकता व्यक्त होत असली तरी ते आयफोन 14 मिनी नसण्याची शक्यता अधिक आहे. कंपनी यावेळी Apple iPhone 14 चे मिनी व्हर्जन लॉन्च करणार नाही, त्याऐवजी ते मॅक्स व्हेरिएंट असण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

नवीन प्रोसेसर असेल

आयफोन 14 मॉडेलमध्ये वेगळे प्रोसेसर वापरण्याचा अंदाज आहे आणि त्यापैकी दोन A16 प्रोसेसर असू शकतात. ग्लोबल चिपच्या कमतरतेमुळे Apple A15 ते A16 रीब्रांडेड करू शकते. कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर आयफोन 14 सीरीजमध्ये कोणतेही मोठे अपग्रेड होणार नाही, जर Apple ने सीरीजमध्ये अपग्रेड केले तर आयफोन 14 सीरीजची किंमत देखील वाढण्याची शक्यता आहे. हा फोन सप्टेंबर 2022 मध्ये बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या : 

50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, Realme Q5 Pro बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

आता डिलिट नाही भाऊ एडीट कर… ट्वीटर ‘हे’ नवीन फिचर आणण्याच्या तयारीत

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...