आनंदवार्ता, iPhone 15 झाला स्वस्त, लवकर करा ऑर्डर, नाहीतर ऑफर हातची जाणार
iPhone 15 Bumper Discount : Apple चा फ्लॅगशिप स्मार्टफोन iPhone 15 खरेदी करण्यासाठी आता खिशावर जास्त ताण येणार नाही. हा स्मार्टफोन स्वस्त किंमतीत ग्राहकांना खरेदी करता येईल. कंपनीने त्यावर जोरदार सवलत जाहीर केली आहे. त्यामुळे अविश्वसनीय किंमतीत हा स्मार्टफोन खरेदी करता येईल.
तुम्हाला Apple चा फ्लॅगशिप स्मार्टफोन iPhone 15 खरेदी करायचा असेल तर आता बजेटची चिंता करू नका. तुम्ही हा स्मार्टफोन स्वस्त किंमतीत खरेदी करू शकता. ॲप्पलचा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन स्वस्त किंमतीत खरेदी करता येईल. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनवर अत्यंत कमी किंमतीत हा स्मार्टफोन खरेदी करता येईल. काय आहे ही ऑफर, कसा घेता येईल तिचा फायदा, या डीलवर बँकेकडून सुद्धा फायदा मिळवता येईल का?
iPhone 15 वर सवलत
ॲमेझॉनवर Apple iPhone 15 (128 GB, Black) ची किंमत 79,600 रुपये आहे. या स्मार्टफोनवर सध्या 17% डिस्काउंटची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार हा स्मार्टफोन 65,900 रुपयात खरेदीची संधी आहे. याशिवाय या फोनवर एक्सचेंज ऑफर पण आहे. जर तुमच्याकडे iPhone 14 Plus (256 GB) चांगल्या स्थिती असेल तर तो एक्सचेंज करता येऊ शकतो. त्यातून 27,350 रुपयांपर्यंत बचत करता येईल. त्यामुळे Apple iPhone 15 (128 GB, Black) तुम्हाला केवळ 38,550 रुपयात मिळू शकतो.
बँकेची ऑफर काय?
ICICI Bank च्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास ग्राहकांना 4,000 रुपयांपर्यंत तात्काळ सवलत मिळेल. अशीच ऑफर SBI आणि Amazon Pay ICICI Bank बँकेच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट केल्यावर मिळते. ग्राहकांना हा स्मार्टफोन 34,550 रुपयांमध्ये ऑर्डर करता येईल. ही मोठी ऑफर आहे. ती काही कालावधीसाठीच आहे. ही ऑफर हातची जाऊ देऊ नका.
Display -Design iPhone 15 – या स्मार्टफोनमध्ये 6.1 इंचाचा डिस्प्ले आहे. हा फोन विविध रंगात येतो. गुलाबी, पिवळा, हिरवा, निळा आणि काळ्या रंग त्याची शोभा वाढवतात. Apple ने गेल्या मॉडलपासून डिझायन तेच ठेवले आहे. त्यात नॉचच्या जागी डायनॅमिक आयलँड नॉच दिला आहे.
कॅमेरा – या मॉडलमध्ये 48-मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आहे. त्यामुळे ग्राहकांना कमी उजेडात पण चांगली छायाचित्र काढता येतील.
बॅटरी लाईफ – Apple च्या दाव्यानुसार, iPhone 15 ची बॅटरी पूर्ण दिवस टिकते. अर्थात तुमचा वापर कसा आहे, यावर बॅटरी टिकते. साधा उपयोग असेल तर बॅटरी 9 तास सहज पुरते. या फोनला USB टाईप-C चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे.
चिप- या फोनमध्ये A16 बायोनिक चिप देण्यात आली आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन गतीने चालतो.