Marathi News Technology Are you planning to buy new car in this diwali look at these 5 great cars
दिवाळीत कार खरेदी करण्याचा प्लॅन करताय? मग ‘या’ पाच कार बघाच!
भारतात बहुतांश लोक दिवाळी सणानिमित्त काही ना काही खरेदी करतात. अनेक लोक कार, बाईक किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यदेखील खरेदी करतात. यंदाच्या दिवाळीत जर तुम्ही कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर या पाच कार नक्की पाहा. या कार्सवर चांगल्या ऑफर्सदेखील देण्यात आल्या आहेत.
Follow us
Tata Altroz : टाटा मोटर्सने कोणतीही मोठी अनाऊन्समेंट न करता भारतात प्रिमीयम हॅचबॅक कार अल्ट्रोजच्या किंमतीमध्ये बदल केले आहेत. प्रिमीयम हॅचबॅकच्या एक्सई आणि एक्सई रिदम या दोन मॉडेल वगळता एक्सएमटी, एक्सटी, एक्सझेड आणि एक्सझेड (ओ) व्हेरिएंटच्या किंमतीत तब्बल 40 हजार रुपयांपर्यंत घट केली आहे.
Maruti Suzuki Celerio : मारुती सुझुकी लवकरच सिलेरियोचे नवे मॉडेल लाँच करणार आहे. या नव्या कारची किंमत 4.50 लाख रुपये असेल. तर टॉप मॉडेलची किंमत 5.80 लाख रुपये इतकी असण्याची शक्यता आहे.
Mahindra Thar SUV : महिंद्राची थार ही ट्रिम्स-एएक्स आणि एलएक्स मध्ये उपलब्ध आहे. एएक्स सीरीजची किंमत 9.80 लाख ते 12.49 लाख रुपये इतकी आहे.
MG Gloster :भारताच्या या पहिल्या ऑटोनामस (लेव्हल 1) प्रिमीयम एसयूव्हीमध्ये एमजी आय-स्मार्ट तंत्रज्ञान आहे. ज्यामुळे ही कार लोकांच्या पसंतीस उतरली आहे. एक लाख रुपये भरुन ही कार बुक करता येऊ शकते. या कारची किंमत 28.98 लाख ते 35.38 लाख रुपये इतकी आहे.
Kia Sonet : किया सोनेट कारची किंमत 6.71 लाखांपासून सुरु होते. ही एक स्मार्ट अर्बन कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. ही कार तरुणांच्या पसंतीस उतरली आहे.