Cyber Crime : सायबर भामट्यांनो आता तुमची खैर नाही, सरकारने बनवलंय ब्रह्मास्! लाखो सिम कार्ड….

सध्या सायबर क्राईमचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. सायबर क्राईमच्या अनेक घटना समोर येताना दिसतात. पण आता टेन्शन घेऊ नका. या सायबर क्राईमला आता आळा बसणार आहे.

Cyber Crime : सायबर भामट्यांनो आता तुमची खैर नाही, सरकारने बनवलंय ब्रह्मास्! लाखो सिम कार्ड....
Follow us
| Updated on: Apr 02, 2023 | 12:23 AM

मुंबई : सध्या सायबर क्राईमचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. सायबर क्राईमच्या अनेक घटना समोर येताना दिसतात. पण आता टेन्शन घेऊ नका. या सायबर क्राईमला आता आळा बसणार आहे. चला तर मग सायबर क्राईम पासून आपण कसे वाचू शकता याबाबत जाणून घ्या.

सिम कार्ड ही सायबर क्राईमची पहिली लिंक आहे. केंद्र सरकारने बनावट सिमला आळा घालण्यासाठीआधुनिक तंत्रज्ञानाला शस्त्र बनवले आहे. यामध्ये आत्तापर्यंत आठ लाखांहून अधिक बनावट सिम कार्ड डिएक्टिवेट करण्यात आले आहेत. एजन्सी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि फेस रेकग्निशन इनेबल्ड टेलिकॉम सिम सब्सक्राइबर व्हेरिफिकेशन सिस्टम (ASTR) द्वारे देखरेख करत आहेत, जेणेकरून सायबर गुन्हेगार लोकांची बँक खाती, क्रेडिट कार्ड किंवा पेमेंट वॉलेट लुटू शकणार नाहीत.

सायबर गुन्ह्यांचा गट म्हटल्या जाणाऱ्या जामतारा, मेवात आणि पुरुलिया येथून एएसटीआर प्रणालीद्वारे येणाऱ्या प्रत्येक संशयास्पद कॉलवर एजन्सी लक्ष ठेवून आहे.  या सायबर क्राईम स्पॉट्सची 8 लाखांहून अधिक बनावट सिम डिएक्टिवेट करण्यात आली आहेत. कारण अत्याधुनिक प्रणालीमुळे, काही क्षणातच एजन्सींना कळते की सिम बदलले आहेत की बनावट आहेत.

ASTR कसे कार्य करते?

TRAI नुसार संपूर्ण देशात 114.36 कोटी मोबाईल वापरकर्ते आहेत. ASTR मधील ज्या ठिकाणाहून तक्रारी आल्या आहेत त्या ठिकाणच्या सर्व मोबाईल वापरकर्त्यांच्या सिमकार्डचे फोटो, फॉर्म, कागदपत्रे चेहर्‍यावरील ओळख तंत्रज्ञानाने स्कॅन करण्यात आली आहेत.  फोटो, जन्मतारीख, वडिलांचे नाव, पत्ता, स्वाक्षरी यामध्ये आढळलेल्या विसंगतीच्या आधारे एजन्सी पुढे जातात. सिम कार्डचा खरेपणा पडताळण्यासाठी तपशील जुळवण्याच्या प्रक्रियेला काही क्षण लागतात.

जर कोणत्याही सिममधून गुन्हेगारी क्रियाकलाप आढळल्यास, सर्व कागदपत्रांचे डिजिटल तपशील तात्काळ जुळवून एजन्सींना पाठवले जातात. मग एजन्सी संबंधित राज्यांच्या पोलिसांना माहिती देतात. तसंच तपास पूर्ण होईपर्यंत सिम डिएक्टिवेट केले जाते.

गुन्हेगारांचा डेटा तयार केला जात आहे

देशातील सर्व सिम वापरकर्त्यांचे सिम फॉर्म, कागदपत्रे आणि फोटो सॉफ्टवेअरमध्ये रेकॉर्ड केले जातात. सायबर गुन्हेगारांचा डेटा तयार झाल्यानंतर त्यांचा डेटा या सॉफ्टवेअरमध्ये मर्ज केला जाणार आहे. त्यामुळे आता नवीन सिम मिळविण्यासाठी ऑनलाइन पडताळणीसाठी दिलेल्या व्हिडिओ आणि कागदपत्रांद्वारे AI सक्षम सॉफ्टवेअरची पुष्टी केली जाईल.

तज्ञ काय सांगतात?

सायबर क्राइम विरुद्ध कायदा आणि तांत्रिक बाबींचे तज्ञ पवन दुग्गल यांनी सांगितलं की, समजा तुम्हाला एखादा कॉल आला, ज्यामध्ये तुम्हाला त्वरित पैसे गुंतवण्यास किंवा हस्तांतरित करण्यास सांगितलं.  तर तुम्ही ऑनलाइन नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल (NCCRP), पोलीस, स्थानिक सायबर युनिट, बँक सायबर युनिट किंवा स्थानिक पोलिसांना याबाबत ताबडतोब माहिती द्या.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या NCCRP शी सर्व राज्ये, बँका आणि इतर संस्थांची सायबर युनिट्स जोडलेली आहेत. याबाबत त्यांना माहिती मिळताच सर्वप्रथम एएसटीआरच्या मदतीने सिमबाबत सत्यता जाणून घेतल्यानंतर संबंधित सिम डिएक्टिवेट केले जाते.  त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येते.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.