Laptop Buying Guide : लॅपटॉप खरेदी करायचंय? ‘या’ 3 महत्त्वपूर्ण गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर बुडतील पैसे
तुम्हाला जर एखादी लॅपटॉप खरेदी करण्याचा असेल परंतु बाजारातील खूपसारे मॉडेल पाहून तुम्हीही कोणते मॉडेल खरेदी करायचे या विचाराने चक्रावून गेला असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण लॅपटॉप खरेदी करण्यापूर्वी आम्ही या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत.
कुठलीही वस्तूची खरेदी करताना आपण त्याबाबत गुगल (Google) करतो, त्याचा रिव्ह्यू बघतो, तज्ज्ञांचे मत घेतो, परंतु तरीही आपल्या मनात अनेक शंका असतात. आपण चुकीची वस्तू तर घेणार नाही ना? याबाबत चिंता वाटते. त्यात नवीन लॅपटॉप घ्यायचा असेल तर खूप गोंधळ होतो. बाजारातील अनेक पर्यायांमुळे गोंधळ होणे सामान्य आहे, कोणता लॅपटॉप घ्यावा हे समजत नाही. नवीन लॅपटॉप घेताना (Laptop Buying Guide) योग्य फीचर्स (Features) लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही स्वतःसाठी नवीन लॅपटॉप घेण्याचा निर्णय घ्याल तेव्हा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत. या लेखातून त्यांची चर्चा करुया…
बजेट आणि गरज : लॅपटॉप खरेदी करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे तुमची गरज काय आहे? गरजेनुसार योग्य लॅपटॉप निवडला जाऊ शकतो, मजबूत बॅटरी, उत्तम फीचर्स किंवा चांगली स्क्रीन, निर्णय घेण्यापूर्वी यापैकी कोणता घटक तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे याचा विचार करा.
उदाहरण : जर तुम्ही प्राथमिक शाळेतील काम करण्यासाठी लॅपटॉप शोधत असाल तर दमदार प्रोसेसर आणि हाय रिझोल्यूशन डिस्प्लेवर अधिक खर्च करण्यात काही अर्थ नाही. म्हणजेच आपली गरज समजूनच बजेटनुसार लॅपटॉप घ्यायला हवा.
स्क्रीन : योग्य लॅपटॉप निवडताना तुम्ही सर्वात पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे डिस्प्ले. तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्ही बजेट लॅपटॉप शोधत असाल, तर हाय रिझोल्यूशन डिस्प्ले आणि पातळ बेझलची अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. पण जर तुम्हाला बजेटची अडचण नसेल, तर उत्तम व्ह्यूइंग अँगलसह हाय रिझोल्यूशन स्क्रीन आणि OLED पॅनेल देणारा स्क्रीन असलेला लॅपटॉप खरेदी करता येईल.
बॅटरी लाइफ : लॅपटॉप किंवा कोणतेही गॅझेट खरेदी करताना बॅटरी हा महत्वाचा घटक ठरत असतो. तुमचे बजेट काहीही असले तरी लॅपटॉपची बॅटरीच जर उत्तम नसेल तर लॅपटॉपचा काही उपयोग होत नाही. लॅपटॉपची बॅटरी पुन्हा पुन्हा चार्ज करणे सोपे नसल्यामुळे या फीचरबाबत तडजोड करणे योग्य ठरणार नाही.