AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

84 दिवसांसाठी दररोज 2 जीबी डेटा हवाय? जाणून घ्या जियो, एअरटेल, BSNL, वोडाफोन पैकी कोणाचा प्लॅन बेस्ट

टेलिकॉम ऑपरेटर्स कंपन्या येत्या काळात त्यांचे प्लॅन्स अजून महाग करणार आहेत. Vi (वोडाफोन आयडिया) ने यापूर्वीच त्यांचे पोस्टपेड प्लॅन महाग केलेत आहेत.

84 दिवसांसाठी दररोज 2 जीबी डेटा हवाय? जाणून घ्या जियो, एअरटेल, BSNL, वोडाफोन पैकी कोणाचा प्लॅन बेस्ट
| Updated on: Dec 08, 2020 | 10:39 PM
Share

मुंबई : टेलिकॉम ऑपरेटर्स कंपन्या येत्या काळात त्यांचे प्लॅन्स अजून महाग करणार आहेत. Vi (वोडाफोन आयडिया) ने यापूर्वीच त्यांचे पोस्टपेड प्लॅन महाग केलेत आहेत. सध्या त्यांनी त्यांचे प्रीपेड प्लॅन्स आहेत तसेच ठेवले आहेत. एअरटेल (Airtel), बीएसएनएल (BSNL), जियो (Jio) आणि Vi (Vodafone and Idea) या कंपन्या 84 दिवसांची वैधता असलेले प्लॅन्स देतात. (Best prepaid plans among Airtel, BSNL, jio, vi vodafone)

साधारण एक-दोन वर्षांपूर्वी या कंपन्यांमध्ये सर्वात स्वस्त प्लॅन्स देण्यासाठी चढाओढ सुरु होती, परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. गेल्या वर्षभरात प्रामुख्याने लॉकडाऊनच्या काळात सर्वच कंपन्यांनी त्यांचे प्लॅन्स अधिक महाग केले आहेत. येत्या काळातही त्यात वाढ केली जाऊ शकते. तत्पूर्वी आम्ही तुम्हाला टेलिकॉम कंपन्यांच्या सध्याच्या प्लॅन्सबाबती माहिती देणार आहोत. (Best prepaid plans among Airtel, BSNL, jio, vi vodafone)

एअरटेल (Airtel)

एअरटेल कंपनी 698 रुपयांमध्ये 84 दिवसांचा प्लॅन देत आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 2 जीबी डेटा दिला जाईल. तसेच यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस पाठवता येतील. सोबतच तुम्हाला एयरटेल एक्सट्रिम प्रीमियम, मोफत हॅलो ट्युन्स, विन्क म्युझिक आणि 150 रुपयांचा फास्टॅग कॅश मिळेल.

बीएसएनएल (BSNL)

बीएसएनएल कंपनी 599 रुपयांचा प्रीपेड प्लॅन देत आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 5 जीबी डेटा आणि 100 एसएमएस मिळतील. यामध्ये तुम्हाला दररोज 250 मिनिटं FUP लिमिट आहे. या प्रीपेड प्लॅनद्वारे तुम्ही मोफत कॉलर ट्युनही सेट करु शकता.

रिलायन्स जियो (Reliance Jio)

जियो कंपनी 599 रुपयांचा प्रीपेड प्लॅन देत आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 84 दिवसांसाठी 2 जीबी डेटा दिला जाईल. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड नेट कॉलिंग आणि जियो टू नॉन जियो कॉलिंगदेखील मिळेल. याची FUP लिमिट 3000 मिनिटं इतकी आहे. तसेच यामध्ये तुम्हाला दररोज 100 एसएमएस पाठवता येतील. सोबतच सर्व प्रकारचे जियो अॅप्स मोफत वापरता येतील.

Vi वोडाफोन आयडिया (VI : Vodafone Idea)

Vi कंपनी 699 रुपयांचा प्रीपेड प्लॅन देत आहे. यामध्ये तुम्हाला 84 दिवसांसाठी दररोज 4 जीबी डेटा मिळेल. तसेच अनलिमिटेड लोकल आणि नॅशनल कॉल्सची सुविधा मिळेल. सोबतच दररोज 100 लोकल आणि नॅशनल एसएमएस पाठवता येतील.

प्रीपेड प्लॅन्सचा विचार करत असाल तर रिलायन्स जियो आणि बीएसएनलचा प्लॅन सर्वोत्तम आहे. दोन्ही कंपन्या 599 रुपयांमध्ये 84 दिवस डेटा आणि कॉलिंगची सुविधा देत आहेत. याच प्लॅनसाठी एअरटेल आणि वोडाफोन या कंपन्या 100 रुपये अधिक घेत आहेत.

संबंधित बातम्या

Airtel चा Jio ला धोबीपछाड, नव्या ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय वाढ

‘जिओ’चा नवा प्लॅन; देशातील ‘हा’ ग्राहकवर्ग काबीज करण्याची अंबानींची रणनीती

525 आणि 600 रुपयांच्या प्लॅनमध्ये 400GB डेटा, BSNL ची जबरदस्त ऑफर

(Best prepaid plans among Airtel, BSNL, jio, vi vodafone)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.