BMW ची शानदार बाईक लाँच होण्यास सज्ज, दमदार फिचर्समुळे रायडर्स प्रभावित

बीएमडब्ल्यूच्या दोन नव्या अपडेटेड बाईड पुढच्या आठवड्यात लाँच होणार आहेत. त्यांचे फोटो नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

BMW ची शानदार बाईक लाँच होण्यास सज्ज, दमदार फिचर्समुळे रायडर्स प्रभावित
Follow us
| Updated on: Oct 04, 2020 | 12:51 PM

मुंबई : बीएमडब्ल्यू मोटरराड इंडिया (BMW Motorrad India) 8 ऑक्टोबर 2020 ला अपडेटेड जी 310 आर (BMW G 310 R) आणि जी 310 जीएस (BMW G 310 GS) या दोन बाईक लाँच करणार आहे. लाँचिंगच्या एक आठवडा अगोदर कंपनीने नव्या बीएमडब्ल्यू जी 310 जीएस चे फोटो प्रसिद्ध केले आहेत. या फोटोंमध्ये 310 जीएस मॉडेल जास्त आकर्षक दिसत आहे. (BMW Motorrad India revealed images of new and updated G 310 R and G 310 GS)

या बाईकमध्ये बीएस 6 कंप्लिट इंजिनासह काही नवीन अपडेट्स करण्यात आले आहेत. बाईकमध्ये करण्यात आलेल्या सर्व बदलांची कंपनीने माहिती दिली आहे. त्यानुसार यामध्ये बाईकची स्टाईल आणि इंजिनात बदल करण्यात आले आहेत.

बाईकच्या डिजाईनचा विचार केला तर बाईकमध्ये एक नवीन हेडलाईट देण्यात आली आहे. त्यासोबतच एक एलईडी डे टाईम रनिंग लाईट स्ट्रीप आहे. फ्यूल टँकवर दोन मोठ्या आणि वेगळ्या फोन्टमध्ये जीएस लिहीले आहे. तसेच तिथे ‘Rallye’ स्टिकर लावण्यात आलं आहे.

ही बाईक दोन नवी रंगांच्या ऑप्शनसह लाँच केली जाणार आहे. या बाईकच्या टायरमध्ये बदल करण्यात आला आहे. बाईकमध्ये सेल्फ-बूस्टिंग अँटी-होपिंग क्लच, एक इलेक्ट्रोमोटिव्ह थ्रॉटल कंट्रोलर देण्यात आला आहे. राइड-बाय-वायर सिस्टमसोबत अॅडजस्टेबल ब्रेक आणि क्लच हँड लीवरसुद्धा देण्यात आलं आहे.

या नव्या बाईकमध्ये टीएफटी इंस्ट्रूमेंट कन्सोल देण्यात आलेलं नाही. स्टूडियो शॉट्समध्ये बाईकला एक सेंटर स्टँड दिलंय जे जुन्या मॉडेलमध्ये नव्हतं. अपडेट केलेल्या बीएमडब्ल्यू जी 310 जीएस मध्ये डिजिटल इंस्ट्रूमेंट कन्सोल देण्यात आलं आहे.

बीएमडब्ल्यू जी 310 आर आणि जी 310 जीएसचं इंजन अपाचे आरआर 310 सारखं आहे. यामध्ये पूर्वीप्रमाणे 6-स्पीड गियरबॉक्स असेल परंतु स्लिपर आणि असिस्ट क्लच असेल की नाही, याबाबत सांशकता आहे. अपडेट केलेल्या जी 310 ड्युअलसाठी बुकिंगला सुरुवात करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Technology | ‘आयफोन 12 मिनी’ ठरेल Appleचा सगळ्यात लहान स्मार्टफोन!

सावधान! तुमचा डेटा चोरी होतोय, Google play store वरुन 34 अॅप्स हटवले

(BMW Motorrad India revealed images of new and updated G 310 R and G 310 GS)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.