AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Electric scooter | आता केवळ 749 रुपयांमध्ये बुक करा iVOOMi S1 इलेक्ट्रिक स्कूटर, 28 मेपासून सुरू होणार टेस्ट ड्राइव्ह

iVOOMi जीतची विक्री पहिल्यापासूनच सुरु झाली आहे. नवीन एस 1 स्कूटरची टेस्ट ड्राईव्ह 28 मे 2022 पासून सुरु होणार आहे. यानंतर पुढील महिन्यात या स्कूटरची ऑफिशिअल डिलिव्हरी मिळणार आहे.

Electric scooter | आता केवळ 749 रुपयांमध्ये बुक करा iVOOMi S1 इलेक्ट्रिक स्कूटर, 28 मेपासून सुरू होणार टेस्ट ड्राइव्ह
आता केवळ 749 रुपयांमध्ये बुक करा iVOOMi S1 इलेक्ट्रिक स्कूटर
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 11:40 AM

आईवूमीचे (iVOOMi) इलेक्ट्रिक वाहन डिव्हिजन iVOOMi एनर्जीने नुकतेच भारतीय बाजारात दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटरला लाँच केल्या होत्या. यात, कंपनीचे iVOOMi S1 इलेक्ट्रिक स्कूटर आणि जीत सिरीजच्या इलेक्ट्रिक स्कूटरचा (Electric scooter) सहभाग आहे. iVOOMi जीतची विक्री पहिल्यापासूनच सुरु झाली आहे. नवीन एस 1 स्कूटरची टेस्ट ड्राईव्ह 28 मे 2022 पासून सुरु होणार आहे. यानंतर पुढील महिन्यात या स्कूटरची ऑफिशिअल डिलिव्हरी मिळणार आहे. iVOOMi Energy ने नुकतेच मार्केटमध्ये आपली एस 1 इलेक्ट्रिक स्कूटर 84 हजार 999 रुपयांमध्ये सादर केली होती. आता कंपनीने 749 रुपयांच्या टोकनवर iVOOMi S1 इलेक्ट्रिक स्कूटरच्या बुकिंगला सुरुवात केली आहे. या शिवाय iVOOMi च्या टेस्ट ड्राईव्हला (Test drive) 28 मेपासून सुरुवात करण्यात येणार आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, iVOOMi S1 इलेक्ट्रिक स्कूटर 28 मेपासून नागपूर, पुणे, मुंबई, गोंदिया, कोल्हापूर, नांदेड, इचलकरंजी, सूरत, अहमदनगर, भावनगर, कच्छ आणि आदिपूर अशा 12 शहरांमध्ये आपली डिलरशिप उपलब्ध करुन देणार आहे. यानंतर ई-स्कूटर 5 जूनपर्यंत भारतातील सर्व डिलर्सकडे उपलब्ध होणार आहे. एस 1 इलेक्ट्रिक स्कूटरला इंटरनॅशनल सेंटर फोर ऑटोमोटीव्ह टेक्नोलॉजीव्दारे अनुमोदित करण्यात आले आहे. सोबत विभागीय परिवहन कार्यालयाव्दारे नोंदणीकृत करण्यात आले आहे. iVOOMi S1 इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 2kWh लिथिअम आयन बॅटरी आणि 60 V इलेक्ट्रिक मोटर आहे. या माध्यमातून स्कूटरला 65 किमी प्रती तासाचा टॉप स्पीड मिळतो.

जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

ई-स्कूटरला एक वेळा चार्ज केल्यावर तिला 115 किमीची रेंज मिळत असल्याचा दावा करण्यात येत आहे. बॅटरीला फूल चार्ज करायला जवळपास 3 ते 4 तासांचा वेळ लागतो. स्कूटरचा कर्ब वेट 75 किलो आहे. iVOOMi S1 इलेक्ट्रिक स्कूटर एक बॅटरी-ए-ए सर्व्हिस फीचर्ससह उपलब्ध आहे.

चांगला ड्रायव्हिंग अनुभव

आईवूमी एनर्जीचे प्रबंध निर्देशक आणि सहसंस्थापक सुनील बंसल यांनी सांगितले की, ‘आम्हाला आमच्या नवीन लाँच करत असलेल्या iVOOMi S1 इलेक्ट्रिक स्कूटरच्या टेस्ट राइडचा ग्राहकांना अनुभव करुन देता आला याबाबत अत्यंत आनंद होत आहे. आम्हाला विश्‍वास आहे, की एस 1 इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये गेम चेंजर ठरेल. आम्हाला या बाईकला सॉलिड स्टेट इलेक्ट्रिक मोटरच्या प्रदर्शन आणि प्रदर्षित करण्याची संधी मिळाल्यानेही आनंद होत आहे. या स्कूटरच्या माध्यमातून एक चांगला ड्रायव्हिंग अनुभव मिळेल, अशी अपेक्षा आहे. ग्राहकांच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करु अशी खात्री आहे.

हे सुद्धा वाचा

जोरदार वारा, पावसाचा तडाखा; फळबागांना नुकसान
जोरदार वारा, पावसाचा तडाखा; फळबागांना नुकसान.
मराठी दाम्पत्यानं घातला डिलिव्हरी बॉय सोबत वाद, भांडूपमधला बघा VIDEO
मराठी दाम्पत्यानं घातला डिलिव्हरी बॉय सोबत वाद, भांडूपमधला बघा VIDEO.
सचिन अहीर पवारांच्या भेटीला अन् एकाच गाडीतून प्रवास, काय झाली चर्चा?
सचिन अहीर पवारांच्या भेटीला अन् एकाच गाडीतून प्रवास, काय झाली चर्चा?.
केंद्रीय कॅबिनेट बैठकीत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, सुत्रांची माहिती
केंद्रीय कॅबिनेट बैठकीत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, सुत्रांची माहिती.
अजित पवार हा फुटलेला गट आहे, संजय राऊतांचा टोला
अजित पवार हा फुटलेला गट आहे, संजय राऊतांचा टोला.
चुकून पाकच्या हद्दीत गेलेला तो जवान भारतात; कुटुंबीयांच्या भावना अनावर
चुकून पाकच्या हद्दीत गेलेला तो जवान भारतात; कुटुंबीयांच्या भावना अनावर.
मध्य रेल्वेने प्रवास करताय? आज उद्या विशेष ब्लॉक, कधी कुठे आणि कसा?
मध्य रेल्वेने प्रवास करताय? आज उद्या विशेष ब्लॉक, कधी कुठे आणि कसा?.
पाकिस्तानने पी. के. साहूंना भारताच्या ताब्यात सोपवलं
पाकिस्तानने पी. के. साहूंना भारताच्या ताब्यात सोपवलं.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रो-9 मार्गिकेच्या चाचणीला सुरुवात
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रो-9 मार्गिकेच्या चाचणीला सुरुवात.
अरुणाचल प्रदेशात चीनच्या कुरघोड्या सुरुच, भारतानं खडसावत थेट म्हटलं...
अरुणाचल प्रदेशात चीनच्या कुरघोड्या सुरुच, भारतानं खडसावत थेट म्हटलं....