आनंदवार्ता, Apple iPhone झाले स्वस्त; या 7 मॉडल्सच्या किंमती इतक्या झाल्या कमी

Apple iPhone Prices : बजेट 2024 मधील घोषणेचा स्मार्टफोन युझर्सला फायदा झाला आहे. आयात शुल्कातील कपात पथ्यावर पडली आहे. ॲप्पल आयफोनची किंमत घसरली आहे. विविध मॉडेल्सवर चांगली सूट मिळत आहे. काय आहेत नवीन किंमत?

आनंदवार्ता, Apple iPhone झाले स्वस्त; या 7 मॉडल्सच्या किंमती इतक्या झाल्या कमी
Apple iPhone Price
Follow us
| Updated on: Jul 27, 2024 | 11:37 AM

Budget 2024 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्मार्टफोन आयातीवरील शुल्कात कपातीची घोषणा केली. बेसिक कस्टम ड्युटी 20 टक्क्यांहून 15 टक्क्यावर आणण्यात आली आहे. बजेटच्या या घोषणेनंतर Apple ने आयफोनच्या किंमतीत 3 ते 4 टक्के कपात केली आहे. त्यामुळे आता iPhone 15 आणि iPhone 14 सह इतर मॉडेलच्या किंमतीत कपात झाली आहे. Apple iPhone च्या किंमतीत 300 रुपये ते 5900 रुपयांपर्यंतची कपात झाली आहे.

असा होईल फायदा

जर तुम्ही 2 लाख रुपयांचा आयात केलेला स्मार्टफोन खरेदी करु इच्छित असाल तर तुम्हाला दहा हजारांचा फायदा होईल. ग्राहकाने 1.50 लाख रुपयांचा स्मार्टफोन खरेदी केला तर त्याची 7500 रुपयांची बचत होईल. 1 लाख रुपयांचा स्मार्टफोन खरेदीवर 5000 रुपयांची बचत होईल. ग्राहकाने 50 हजार रुपयांचा स्मार्टफोन खरेदी केला तर त्याला 2500 रुपयांचा फायदा होईल. तर 25 हजार रुपयांचा स्मार्टफोन खरेदीवर ग्राहकांना 1250 रुपयांचा फायदा होईल.

हे सुद्धा वाचा

iPhone 15 Price in India

आयफोन 15 च्या किंमतीत 300 रुपयांची कपात झाली. आता आयफोन 15 चा 128 जीबी व्हेरिएंट 79,900 रुपयांऐवजी कंपनीच्या साईटवर 79,600 रुपयांना विक्री होत आहे.

iPhone 15 Plus Price in India

आयफोन 15 प्लस वर सुद्धा 300 रुपयांची सूट मिळत आहे. या स्मार्टफोनच्या 128 जीबी व्हेरिएंटची किंमत आता 89,600 रुपये आहे. पूर्वी ही किंमत 89,900 रुपये होते.

iPhone 15 Pro Price in India

आयफोनचे हे मॉडेल ग्राहकांना 1,34,900 रुपयांऐवजी के 1,29,800 रुपयांना मिळत आहे. याचा अर्थ या मॉडेलवर आता ग्राहकांना घसघशीत 5100 रुपयांची सूट मिळत आहे. त्यांची मोठी बचत होत आहे.

iPhone 15 Pro Max Price in India

या आयफोन मॉडेलची किंमत 1,59,900 रुपयांऐवजी 1,54,000 रुपयांना खरेदी करता येईल. ग्राहकांना या मॉडलवर 5900 रुपयांपर्यंतची बचत करता येईल.

iPhone 14 Price in India

या आयफोन मॉडलच्या किंमतीत 300 रुपयांची कपात झाली आहे. या स्मार्टफोनच्या 128 जीबी मॉडेलची किंमत पूर्वी 69,900 रुपये होती. ती आता 69,600 रुपये आहे.

iPhone 13 Price in India

आयफोन 13 वर ग्राहकांना 300 रुपयांच्या कपातीचा फायदा होईल. या स्मार्टफोनच्या 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 59,900 रुपये होती. ती आता 59,600 रुपये झाली आहे.

iPhone SE 2022 Price in India

हा स्मार्टफोन 49,900 रुपयांना विक्री होतो. पण आता तो 2300 रुपयांनी स्वस्त झाला आहे. ग्राहकांना हा हँडसेट आता 47,600 रुपयांना खरेदी करता येईल.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.