Budget Gaming Phone: 12 हजार रुपयांच्या रेंजमध्ये टॉप 4 स्मार्टफोन्स, यादीत Redmi ते Moto चे पर्याय

Budget Gaming Phone: भारतीय स्मार्टफोन बाजारात रेडमी (Redmi) ते आयफोनपर्यंत (iPhone) अनेक कंपन्या पाय रोवून उभ्या आहेत, ज्या वेगवेगळ्या किंमतींमध्ये त्यांचे स्वतःचे स्मार्टफोन विकतात.

Budget Gaming Phone: 12 हजार रुपयांच्या रेंजमध्ये टॉप 4 स्मार्टफोन्स, यादीत Redmi ते Moto चे पर्याय
Best Gaming PhoneImage Credit source: Poco
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 3:23 PM

Budget Gaming Phone: भारतीय स्मार्टफोन बाजारात रेडमी (Redmi) ते आयफोनपर्यंत (iPhone) अनेक कंपन्या पाय रोवून उभ्या आहेत, ज्या वेगवेगळ्या किंमतींमध्ये त्यांचे स्वतःचे स्मार्टफोन विकतात. पण आज आम्ही तुम्हाला 25 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या गेमिंग स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत. दरम्यान, बॅटल ग्राउंड मोबाईल इंडिया (BGMI) आणि फ्री फायर सारख्या गेम्सची लोकप्रियता कोणापासूनही लपलेली नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काही स्वस्त गेमिंग स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत. यामध्ये Poco, Redmi, Motorola आणि iQoo सारख्या कंपन्यांचे स्मार्टफोन्स या सेगमेंटमध्ये आहेत.

  1. Redmi Note 10S: रेडमी नोट 10 एस हा एक गेमिंग स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनची किंमत 12999 रुपये इतकी आहे आणि या किंमतीत 6 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज मॉडेल उपलब्ध आहे. तसेच, यात AMOLED डिस्प्ले आहे. या फोनमध्ये 6.43 इंचाचा डिस्प्ले आहे आणि त्याचे रिझोल्यूशन 1080×2400 पिक्सेल आहे. यामध्ये कंपनीने MediaTek Helio G95 ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला आहे. तसेच यामध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सेलचा आहे. तसेच यात 13 मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये यूजर्स 512 GB पर्यंतचे SD कार्ड टाकू शकतात.
  2. iQOO ZS 5G: Vivo चा सब-ब्रँड म्हणून सुरू झालेला ब्रँड अजूनही लोकांमध्ये वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. iQoo ही कंपनी जास्तीत जास्त स्पीड असणारे स्मार्टफोन्स विकते. गेमिंग प्रेमी या कंपनीच्या स्मार्टफोन्सना पसंती दर्शवतात. कंपनीचा iQOO ZS 5G हादेखील गेमिंग प्रेमींचा आवडता स्मार्टफोन आहे. iQoo च्या या फोनमध्ये 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज आहे. तसेच यामध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यात 44W चा फ्लॅश चार्जर मिळेल. यात 6.67 इंचाचा डिस्प्ले आहे. या फोनची किंमत 25 हजार रुपयांपेक्षा कमी आहे, ज्यामध्ये डिस्काउंट आणि ऑफर्सचा समावेश आहे.
  3. Poco X3 Pro: Poco या स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने गेल्या वर्षी X3 स्मार्टफोन सादर केला होता आणि तो एक गेमिंग स्मार्टफोन आहे. यात 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आहे, जो गेमिंग आणि स्क्रोलिंग एक्सपीरियन्स सुधारतो. या फोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. तसेच यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 860 चिपसेट देण्यात आला आहे. याच्या बॅक पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 48 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. यात 5020 mAh ची बॅटरी आहे.
  4. Moto G60: Motorola चा हा एक गेमिंग स्मार्टफोन आहे, ज्याचा डिस्प्ले 120hz रिफ्रेश रेटसह येतो. याच्या बॅक पॅनलवर 108 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. तसेच, हा मोबाइल 732G ऑक्टा-कोर प्रोसेसरसह येतो. त्याची किंमत 18 हजार रुपयांपेक्षा कमी आहे.

इतर बातम्या

गुगलने बंदी घातलेले ‘हे’ अॅप्स्‌ तुमच्या मोबाईलमध्ये नाहीत ना?

सोशल मीडियात खळबळ : हवामान खात्याचेही ट्विटर अकॉउंट हॅक

स्कूटर देतो पण, कामावर या… गुगल कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यासाठी आमिष

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.