Flipkart Sale : Oppo आणि RealMe स्मार्टफोनच्या खरेदीवर बंपर डिस्काउंट
जर तुम्ही कमी बजेटमध्ये चांगल्या स्पेसिफिकेशन्सच्या स्मार्टफोनच्या शोधात असाल तर, तुमची प्रतीक्षा संपली आहे. फ्लिपकार्ट सेलअंतर्गत ओप्पोपासून ते रिअलमीपर्यंत आठ ते दहा हजारांच्या डिस्काउंटमध्ये स्मार्टफोनची खरेदी करु शकतात.
एप्रिल संपण्यात जमा आहे, अशामध्ये दिग्गज ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने एप्रिल महिना अखेरीस मोबाईल फेस्ट सेल (Flipkart Sale) जाहिर केला आहे. महिन्याच्या शेवटी होत असलेल्या या सेलमध्ये तुम्ही विविध कंपन्यांचे स्मार्टफोन (smartphone) सवलतीच्या दरात (discounts) खरेदी करु शकणार आहात. जर तुम्ही एका बजेट फोनच्या शोधात असाल तर हा सेल तुमच्याचसाठी आहे. सेलअंतर्गत तुम्हाला ओप्पोपासून ते रिअलमीपर्यंतचे सर्व बजेटफोन वाजवी दरात घेता येणार आहेत. फ्लिपकार्टवर डिस्काउंटवर मिळत असलेल्या ओप्पो आणि रिअलमीच्या काही स्मार्टफोनबाबत या लेखात माहिती जाणून घेणार आहोत.
- ओप्पो रेनो 7 प्रो 5जी फ्लिपकार्टवर या मोबाईलवर तुम्हाला 16 टक्के डिस्काउंट मिळू शकते. या मोबाईलची रिटेल किंमत 47990 इतकी आहे. सवलतीच्या दरात हा 39999 रुपयांना मिळेल.
- ओप्पो रेनो6 5जी फ्लिपकार्टवर या मोबाईलला 25 टक्के डिस्काउंट देण्यात आली आहे. याची रिटेल किंमत 35990 असून सवलतीच्या दरात हा 26990 रुपयांना मिळणार आहे.
- ओप्पो रेनो7 5जी या मेाबाईलच्या खरेदीवर तुम्हाला 23 टक्के डिस्काउंट मिळेल याची रिटेल किंमत 37990 असून सवलतीच्या दरात हा मोबाईल 28999 रुपयांना मिळेल.
- रिअलमी 9 प्रो 5जी फ्लिपकार्टवर रिअलमीच्या मोबाईल्सनाही मोठी सुट देण्यात आली आहे. रिअलमी 9 प्रो 5जी आणि रिअलमी 9 प्रो प्लस 5जी हे मोबाईल आता 17999, 26999 आणि 14999 रुपयांना उपलब्ध आहेत.
- फ्लिपकार्टवरील सेलवर रिअलमी जीटी 2 प्रो 41999 रुपये आणि 49999 रुपयांना उपलब्ध आहे. सोबतच रिअलमी ×7 मॅक्सची किंमत 29999 रुपये आणि रिअलमी सी20 केवळ 7499 रुपयांना उपलब्ध आहे.
- रिअलमी 9आय या मोबाईलवर 11 टक्के सुट देण्यात आली आहे. 16999 रिटेल किंमत असलेला हा मोबाईल सवलतीच्या दरात 14999 रुपयांना उपलब्ध होणार आहे.
- रिअलमी 9 प्रो प्लस 5जी या मोबाईलवर 10 टक्के सुट देण्यात आली आहे. याची किंमत 29999 असून सवलतीच्या दरात तो 26999 रुपयांना उपलब्ध होणार आहे.