घरबसल्या खरेदी करा सोने-चांदीचे शिक्के, 15 मिनिटांत होम डिलिव्हरी

Gold Home Delivery | धनत्रयोदशीला तुम्हाला सोने-चांदीची नाणी घरपोच मागविता येतील. ऑनलाईन खरेदी केल्यावर तुम्हाला ही नाणी घरपोच मिळतील. काही ॲप ही सुविधा देत आहे. त्यामुळे दिवाळीच्या कामाच्या गडबडीत सराफा बाजाराकडे जाणे होत नसेल तर ऑनलाईन नाणी खरेदी करुन ती घरपोच मिळतील.

घरबसल्या खरेदी करा सोने-चांदीचे शिक्के, 15 मिनिटांत होम डिलिव्हरी
Follow us
| Updated on: Nov 08, 2023 | 11:17 AM

नवी दिल्ली | 8 नोव्हेंबर 2023 : दिवाळीत धनत्रयोदशीला सोने आणि चांदीचे शिक्के खरेदीचा अनेकांचा रतीब असतो. प्रत्येक वर्षी सोन्यात भर घालावी अशी मान्यता आहे. या दिवशी काही जण सराफा बाजारात जाऊन किडूमिडूक का असेना सोने खरेदी करतात. तुम्हाला सोने-चांदीची नाणी खरेदीसाठी आता सराफा बाजारात जाण्याची गरज उरली नाही. दिवाळीत अनेक कामांचा डोंगर डोक्यावर असताना बाहेर पडणे जमत नसेल तर घरबसल्या ही नाणी मिळवता येईल. काही ॲप ही सुविधा देत आहे. सोने-चांदीची नाणी तुम्हाला अशी ऑनलाईन खरेदी करता येतील.

15 मिनिटांत घरपोच नाणी

काही Apps काही शहरांमध्ये ही सुविधा देत आहे. तुम्ही ऑनलाईन सोने-चांदीच्या नाण्याची खरेदी केली तर अवघ्या 15 मिनिटांत ही नाणी घरपोच मिळतील. आता अनेक ॲप्सच्या माध्यमातून घरपोच किराणा पोहचतो. अनेक सामान डिलिव्हरी होते. तसेच Gold Coin वा Silver Coin घरपोच मिळेल. खरेदीपूर्वी तुमच्या शहरात त्याची डिलिव्हरी होते का ते एकदा तपासून घ्या. खात्री झाली आणि किंमत योग्य वाटली तर ऑर्डर बुक करा.

हे सुद्धा वाचा
  1. Blinkit – ब्लिंकिट या ॲपच्या माध्यमातून सोने-चांदीची नाणी ऑनलाईन खरेदी करता येईल. हे ॲप उघडल्यावर सर्वात वरच्या बाजूला Celebrate Diwali दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर Gold and Silver Coins या विभागात या. याठिकाणी 1 ते 10 ग्रॅम सोने आणि चांदीची नाणी खरेदी करता येतील.
  2. Big basket – तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप असेल. किराणा सामान खरेदीसाठी या ॲपचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. नसेल तर ते डाऊनलोड करता येईल. या ॲपच्या माध्यमातून Tanishq ची 22k आणि 24k शिक्के खरेदी करता येतील. ॲप उघडल्यावर Tanishq दिसेल. त्यावर क्लिक करा आणि सोने-चांदीचे शिक्के खरेदी करा.

  • Zepto – हे पण एक ग्रोसरी ॲप आहे. ते लोकप्रिय आहे. धनत्रयोदशी निमित्त तुम्हाला या ॲपवरुन चांदीचा शिक्का खरेदी करता येईल. या ॲपवर Reliance Jewels कडून सोन्याची दागिने पण खरेदी करता येईल. खरेदीपूर्वी तुमच्या शहरात त्याची डिलिव्हरी होते का ते एकदा तपासून घ्या.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.