सावधान! चुकूनसुद्धा डाउनलोड करू नका अशाप्रकारचे ॲप्स, अन्यथा लागेल लाखो रुपयांचा चुणा !

गृह मंत्रालयाचे पोर्टल सायबर दोस्तने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून ट्वीट करत लोकांना रिमोट एक्सेस फ्रॉड पासून सावधान राहण्याचा इशारा दिला आहे सोबतच प्ले स्टोर मधून एनीडेस्क, क्विक सपोर्ट आणि टीम व्यूअर सारखे ॲप्स डाउनलोड न करण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.

सावधान! चुकूनसुद्धा डाउनलोड करू नका अशाप्रकारचे ॲप्स, अन्यथा लागेल लाखो रुपयांचा चुणा !
सावधान! चुकून सुद्धा डाउनलोड करू नका अश्याप्रकरचे ॲप्स
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 10:05 PM

Cyber Dost Alert: गेल्या अनेक दिवसापासून ज्या पद्धतीने अनेक ऑनलाइन पद्धतीचा वापर (online activities) वाढला आहे. त्याच गतीने ऑनलाइन फ्रॉड सुद्धा वाढला आहे. असे अनेक प्रकारचे धोके दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेले आहे. काही लोक या घटनेला ऑनलाईन फ्रॉड समजतात आणि यापासून वाचून सुद्धा जातात परंतु अनेकदा ज्येष्ठ नागरिक (senior citizen) अशा प्रकारच्या घोटाळ्यामध्ये सापडून जातात. कळत नकळत अशा प्रकारच्या घटनांचे बळी पडतात. आयुष्यभर कमावलेली कमाई अशा प्रकारच्या घोटाळ्यामध्ये घालवून बसतात म्हणूनच अनेकदा प्रत्येक बँकेद्वारे अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून ग्राहकांना जागरुक(customer awareness) सुद्धा केले जाते. त्याचबरोबर कोणकोणत्या घटनेद्वारे तुमच्यासोबत धोका होऊ शकतो याबद्दलची माहिती सुद्धा तुम्हाला अनेकदा देत असतात आणि कोणत्याही प्रकारच्या आमिषाला भुलू नका किंवा बँक कोणताही मेसेज तुम्हाला करत नाही अशा प्रकारचा सल्ला सुद्धा देतात. गेल्या काही दिवसांबद्दल बोलायचे झाल्यास बूस्टर डोस बद्दल 60 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना रजिस्ट्रेशन करण्याबाबत फोन कॉल करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढू लागले आहेत.

गृह मंत्रालयाचे पोर्टल सायबर दोस्तने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डल वरून ट्वीट करत लोकांना रिमोट एक्सेस फ्रॉड पासून सावधान राहण्याचा इशारा दिला आहे सोबतच प्ले स्टोर मधून एनीडेस्क, क्विक सपोर्ट आणि टीम व्यूअर सारखे ॲप्स डाउनलोड न करण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.

1. क्विक सपोर्ट आणि टीम व्यूअर सारखे ॲप डाउनलोड करू नये

प्ले स्टोर मधून एनीडेस्क, क्विक सपोर्ट आणि टीम व्यूअर सारखे ॲप अजिबात डाउनलोड करू नका. खरंतर सायबर क्रिमिनल केवायसी आणि अन्य प्रकारच्या गोष्टी तुम्हाला सांगून अशा प्रकारचे ॲप डाऊनलोड करायला सांगतात. आणि तुमची वैयक्तिक माहिती अशा या ॲपच्या माध्यमातून प्राप्त करून घेतात. रिमोट ऍक्सेस च्या माध्यमातून तुमची व्यक्तिगत माहिती सहजरीत्या चोरता येऊ शकते तसेच काही रिमोट ऍक्सेस ॲप सायबर फ्रॉड यासारखे धोके करता यावेत यासाठी बनवले गेलेले असतात. अशा प्रकारचे ॲप्स आपण डाउनलोड केले तर आपले फोटो, ओटीपी नंबर, पासवर्ड सोबतच अनेक अशा काही गोष्टी हॅकर पर्यंत पोचतात आणि हॅकर तुमच्यासोबत सहजच धोका करतात आणि म्हणूनच अशा वेळी कोणत्याही प्रकारचे एप्लीकेशन वापरताना त्याबद्दलची महत्त्वाची माहिती जाणून घ्यायला हवी. हे हे कार रिमोट ऍक्सेस च्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यातील पैसे सुद्धा काढू शकतात.

2. तुमच्या व्यक्तिगत माहितीला वाचवा

एनीडेस्क आणि क्विक सपोर्ट सारखे ॲप जर तुमच्या मोबाईल फोन मध्ये असतील तर त्यांना लगेचच आणि अनइन्स्टॉल करून द्या कारण की अशा प्रकारचे एप्लीकेशनमुळे सायबर क्रिमीनल यांच्याकडे तुमचा पिन नंबर, ओटीपी नंबर आणि बँक अकाउंट डिटेल्स त्वरित पोहोचेल आणि या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्यासोबत भविष्यात धोका होऊ शकतो.

या गोष्टीची विशेष काळजी घ्या

अनेकदा बँक किंवा टेलिकॉम कंपनी आपल्याला कधीही कॉल करून आपली केवायसी अपडेट करण्यासाठी एखादे अप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी सांगत नाही म्हणूनच जर तुम्हाला अशा प्रकारचा एखादा कॉल आला तर त्या कॉलला कोणत्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद देऊ नका अशा वेळी त्वरित तक्रार करा त्याचबरोबर जर कधी तुम्ही अशा प्रकारच्या सायबर क्राइमला बळी पडलेला असाल तर अशा परिस्थितीत त्वरित पोलिसांना याबद्दल सूचना द्या व रीतसर याची तक्रार सुद्धा नोंदवा. तुमच्या बँकेशी त्वरित संपर्क साधून घडलेली घटना बँकेच्या मॅनेजरला सांगा अशामुळे तुमच्या बँकेच्या खात्यातून जर काही पैसे कमी झाले असतील तर काही तासाच्या आत हे पैसे परत मिळण्याची शक्यता असते म्हणून अशावेळी तत्परतेने वागायला हवे.

इतर बातम्या

सोशल मीडियावर Reels हिरोंचा डंका, मनोरंजनासोबत पैसे कमावण्याचा काय आहे फंडा? जाणून घ्या!

पती आणि मुलीच्या फोटोपासून ते प्रभूकुंजच्या पत्त्यांपर्यंत, लतादीदींच्या निधनानंतर नेटिझन्स गुगलवर काय-काय सर्च करतायत?

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.