‘5G’ प्रकरणात जुही चावलाला हायकोर्टाचा दणका, याचिका फेटाळत ठोठावला 20 लाखांचा दंड!
अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) हिला 20 लाखांचा मोठा दंड ठोठावत दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी (4 जून) 5G रोल आऊटविरोधातील तिची याचिका फेटाळून लावली. इतकेच नाही तर कोर्टाने जुही चावलाला आणखी एक मोठा धक्का दिला आहे.
मुंबई : अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) हिला 20 लाखांचा मोठा दंड ठोठावत दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी (4 जून) 5G रोल आऊटविरोधातील तिची याचिका फेटाळून लावली. इतकेच नाही तर कोर्टाने जुही चावलाला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले की, या प्रकरणात याचिकाकर्त्याने कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग केला (Delhi High Court dismisses plea by Juhi Chawla against 5G rollout imposes costs of Rs 20 lakh).
हायकोर्टाने पुढे असेही म्हटले की, या प्रकरणात असे दिसते आहे की याचिका केवळ प्रसिद्धीसाठी दाखल केली गेली आहे, म्हणूनच याची लिंक सोशल मीडियावर शेअर केली गेली. न्यायमूर्ती जीआर मिधा यांच्या खंडपीठाने आदेशात म्हटले आहे की, हे आरोप त्रासदायक आहेत.
गाणे गाणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई
हायकोर्टाच्या सुनावणीदरम्यान गाणे गाणाऱ्या व्यक्तीवरही कारवाई करण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीला आणि बेकायदेशीरपणे सुनावणीत भाग घेतलेल्या सर्वांना न्यायालयाने अवमान नोटीस बजावली आहे. कोर्टाच्या सुनावणीत अडथळा आणल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना अशा लोकांवर कारवाई करण्यास सांगितले आहे. त्याचवेळी न्यायालयाने म्हटले की, याचिकाकर्त्याने कोर्टाची संपूर्ण फीदेखील जमा केली नाही, जी दीड लाखाहून अधिक आहे.
कोर्टाने उपस्थित केला प्रश्न
यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी (2 जून) जुही चावला, सरकारला निवेदन न देता 5G वायरलेस नेटवर्क तंत्रज्ञानाला आव्हान देण्यासाठी थेट कोर्टात आल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. तंत्रज्ञान संबंधित तिच्या चिंतेबाबत सरकारला कोणतेही निवेदन न देता, जुही चावला यांनी देशात 5 जी वायरलेस नेटवर्क स्थापित करण्याच्या विरोधात थेट दावा दाखल करण्यासंदर्भातही हायकोर्टाने प्रश्न केला होता (Delhi High Court dismisses plea by Juhi Chawla against 5G rollout imposes costs of Rs 20 lakh).
जुहीची याचिका नेमकी काय?
जुही चावला म्हणाली की, या 5जी योजनांमुळे मानवांवर गंभीर, अपरिवर्तनीय परिणाम होतो आणि पृथ्वीवरील पर्यावरणाचे कायमचे नुकसान होण्याचा धोका आहे. अॅडव्होकेट दीपक खोसला यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेत अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची विनंती केली होती की, 5 जी तंत्रज्ञान मानवजातीसाठी, पुरुष, स्त्री, प्रौढ, लहान मुलं, अर्भक, प्राणी आणि सर्व प्रकारच्या जीव-जंतुंसाठी सुरक्षित आहे का हे स्पष्ट करावं.
आपला अजेंडा 5 जीवर बंदी घालण्याचा नसल्याचेही जुहीने स्पष्ट केले होते. ती म्हणाली की, लोकांचा गैरसमज आहे की, आम्ही 5 जी तंत्रज्ञानाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. आम्हाला सर्वांना हे स्पष्ट सांगायचे आहे की, आम्ही 5 जी तंत्रज्ञानाविरूद्ध नाही. तथापि, आम्ही केवळ सरकार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना अपील केले की, 5 जी तंत्रज्ञान सर्व मानवजातीसाठी, पुरुष, स्त्रिया, मुले, वृद्ध लोक, प्राणी सुरक्षित आहे का?, याचे उत्तर देण्यात यावे.
(Delhi High Court dismisses plea by Juhi Chawla against 5G rollout imposes costs of Rs 20 lakh)
हेही वाचा :
Binge Watch | पुन्हा ताज्या होतील 90च्या दशकाच्या आठवणी, OTTवर पाहू शकता ‘या’ सर्वोत्कृष्ट मालिका!
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, सिद्धार्थ पिठानीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
‘मी 5G तंत्रज्ञानाच्या विरोधात नाही, पण मला उत्तर हवंय’, जुही चावलाने दिले स्पष्टीकरण#5G | #JuhiChawla | #Bollywood https://t.co/IWtsP0OVh3
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 4, 2021