Amazon Prime Day sale : MI, Oneplus च्या ‘या’ 5 स्मार्टफोन्सवर तगडा डिस्काऊंट

अमेझॉनने घोषणा केली आहे की, प्रीमियम स्मार्टफोनवर 10,000 रुपयांपर्यंतची सूट आणि लॅपटॉप्सवर तब्बल 35,000 रुपयांपर्यंतच्या डिस्काऊंट ऑफर्स सादर केल्या जातील.

Amazon Prime Day sale : MI, Oneplus च्या 'या' 5 स्मार्टफोन्सवर तगडा डिस्काऊंट
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 3:54 PM

मुंबई : Amazon प्राइम डे सेल 26 जुलै रोजी लाईव्ह होणार आहे. हा दोन दिवसीय सेल दरवर्षी विद्यमान प्राइम ग्राहकांसाठी अ‍ॅमेझॉनद्वारे आयोजित केला जातो. तसेच नवीन प्राईम ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी दरवर्षी या सेलचे आयोजन करते. प्राइम डे सेल म्हणजे अशा स्मार्टफोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसवर सूट दिली जाते, ज्यासाठी ग्राहक बर्‍याच दिवसांपासून वाट पहात होते. Amazon स्मार्टफोन, लॅपटॉप, अमझॉन इको डिव्हाइस, होम डिव्‍हाइस, फर्निचरसह इतर कॅटेगरीजमधील वस्तूंवर चांगल्या ऑफर्स देत आहे. (Dont miss these 5 smartphone deals during Amazon Prime Day sale, check full list)

अमेझॉनने घोषणा केली आहे की, प्रीमियम स्मार्टफोनवर 10,000 रुपयांपर्यंतची सूट आणि लॅपटॉप्सवर तब्बल 35,000 रुपयांपर्यंतच्या डिस्काऊंट ऑफर्स सादर केल्या जातील. कंपनी Amazon Prime Day सेलदरम्यान OnePlus, Xiaomi, Samsung, Apple, HP, boAt, Sony, Amazfit, Lenovo आणि इतर लोकप्रिय ब्रँड्सच्या विविध आयटम्सवर सूट देत आहे.

Redmi Note 10 Pro Max

रेडमी नोट 10 प्रो मॅक्स सध्या 19,999 रुपये किंमतीत विकला जात आहे. परंतु या सेलदरम्यान त्याच्या किंमतीवर सूट मिळू शकते. तथापि, याक्षणी किंमतीत किती सूट दिली जाईल याबाबत माहिती नाही. Amazon ने याबद्दल काहीही सांगितलेलं नाही. रेडमी नोट 10 प्रो मॅक्समध्ये रियर क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, जो 108 मेगापिक्सल कॅमेर्‍यासह येतो. यात 6.67 इंचाचा एफएचडी + एमोलेड डिस्प्ले आहे जो 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येतो. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 732 जी प्रोसेसर देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 33 डब्ल्यू फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

Oneplus 9R

वनप्लस 9R सध्या 39,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. वनप्लस 9 आर नो कॉस्ट EMI वर उपलब्ध करुन देण्यात येईल. या 5 जी इनेबल्ड फोनमध्ये 6.55-इंचाचा फ्ल्युड अमोलेड डिस्प्ले देण्यात येईल जो 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येतो. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8705G प्रोसेसर दिला आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 4500mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

iQOO Z3

या यादीतला तिसरा फोन आहे iQOO Z3, ज्याची किंमत 20,990 रुपये इतकी आहे. यामध्ये 6.58 इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले आहे. त्याच वेळी, त्यात तुम्हाला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 768G 5G प्रोसेसर मिळेल. हा फोन 55W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. फोनचा रियर कॅमेरा 64 मेगापिक्सेलचा आहे ज्यामध्ये आपण 4K व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता.

Apple Iphone 11

Apple आयफोन 11 ची किंमत सध्या 54,000 रुपये इतकी आहे. सेलमध्ये या फोनची किंमतही कमी करण्यात आली आहे. Apple चा ए 13 बायोनिक चिपसेट आयफोन 11 मध्ये देण्यात आला आहे, जो लो लाइट ड्युअल कॅमेरा सेटअपसह येतो. त्याच वेळी यात 6.1 इंचाचा एलसीडी रेटिना डिस्प्ले आहे. Apple चा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन वॉटर आणि डस्ट प्रतिरोधक आहे.

Mi 10i 5G

Mi 10i 5G देखील 21,999 रुपयांना विकला जात आहे. या 5 जी इनेबल्ड स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचांचा एफएचडी + डिस्प्ले आहे. यात रियर क्वाड कॅमेरा सेटअप आहे जो 108 मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेर्‍यासह येतो. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 750 जी प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 4820mAh बॅटरी आहे जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

इतर बातम्या

अ‍ॅमेझॉन देत आहे 10 हजार रुपयांपर्यंत गिफ्ट व्हाऊचर; बस्स.. तुम्हाला फक्त ‘ही’ किरकोळ प्रक्रिया करावी लागेल

तुम्ही Google Chrome वापरताय? मग आधी ‘ही’ गोष्ट करा, नाहीतर मोठं नुकसान होऊ शकतं!

Oppo Reno 6 Pro 5G बाजारात, नव्या 5 जी फोनमध्ये काय आहे खास?

(Dont miss these 5 smartphone deals during Amazon Prime Day sale, check full list)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.