AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DSLR कॅमेरा: उन्हाळी सुटीत ‘फोटोग्राफी’चा प्लॅन करताय? त्यासाठीचे उत्तम पर्याय स्वस्तातले DSLR कॅमेरे..!

फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन वरून स्वस्तातले कॅमेरे खरेदी करू शकता.

DSLR कॅमेरा: उन्हाळी सुटीत ‘फोटोग्राफी’चा प्लॅन करताय? त्यासाठीचे उत्तम पर्याय स्वस्तातले DSLR कॅमेरे..!
पाहा स्वस्त DSLRImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Apr 23, 2022 | 8:20 PM
Share

कोरोनाच्या संसर्ग कमी झाल्याने अखेर शाळा उघडल्या. त्याचबरोबर पर्यटनस्थळेही (Tourist places) खुली झाली आहेत. त्यामुळे आता दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्याच्या सुट्टीत (Summer vacation) बाहेर फीरायचे प्लॅनींग घराघरात सुरू झाले आहे. फीरायला जायचे म्हटले तर, सर्वात आधी बॅगमध्ये ठेवली जाणारी वस्तू म्हणजे, कॅमेरा. पर्यटनस्थळी फोटोग्राफी करण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला काही स्वस्त DSLR कॅमेऱ्यांबद्दल सांगणार आहोत. स्थानिक बाजारपेठेव्यतिरिक्त, हे DSLR कॅमेरे फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदी केले जाऊ शकतात. बहुतेक तरुणांना डीएसएलआर कॅमेर्‍याने फोटो क्लिक करण्याची आवड आहे, कारण याचा वापर करून उत्तम दर्जाचे फोटो आणि व्हिडिओ तयार करता येतात. DSLR कॅमेऱ्याच्या मदतीने (With the help of camera) सर्वोत्तम इंस्टाग्राम रील्स आणि इतर प्लॅटफॉर्मसाठी व्हिडिओ आणि फोटो क्लिक केले जाऊ शकतात.

Canon EOS 3000D कॅमेरा किंमत आणि वैशिष्ट्ये

Canon EOS 3000D कॅमेरा Canon EOS 3000D DSLR कॅमेरा Flipkart वरून खरेदी करता येईल. ईकॉमर्स प्लॅटफॉर्मवरील दिलेल्या माहितीनुसार, त्याची किंमत 26,999 रुपये आहे.

या कॅमेऱ्यात 18-मेगापिक्सलचा APS CMOS सेन्सर आहे. याशिवाय यात टाइप सी आणि मिनी एचडीएमआय पोर्ट्स देण्यात आले आहेत. यात सेल्फ टाइमरही आहे.

Canon EOS 1500D वैशिष्ट्ये आणि किंमत

Canon EOS 1500D (Canon EOS 1500D DSLR) कॅमेरा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. त्याची किंमत 34995 रुपये आहे. त्याची लेन्स 18 55 मिमी आहे. तसेच यात 24.1 मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

या कॅमेरामध्ये वायफाय आहे, जे डेटा शेअरिंगमध्ये मदत करते. या कॅमेऱ्याच्या मदतीने युजर्स 1080 पिक्सेलवर रेकॉर्ड करू शकतील. Flipkart वर दिलेल्या माहितीनुसार, हा कॅमेरा 2 वर्षांच्या वॉरंटीसह येते.

Fujifilm X Series XT 200 ची वैशिष्ट्ये

जर तुम्ही कॉम्पॅक्ट आकाराचा कॅमेरा शोधत असाल, तर तुम्ही मिररलेस कॅमेरा घेऊ शकता. स्लिम असण्यासोबतच ते वापरण्यासही खूप सोपे आहे. Fujifilm X Series XT 200 Flipkart वर Rs.61999 मध्ये खरेदी करता येईल.

यात २४.२ मेगापिक्सल्सची लेन्स आहे. तसेच यात TFT डिस्प्ले आहे, जो प्रिव्ह्यू दाखवण्यात मदत करतो. या कॅमेऱ्यात ट्रायपॉड स्लॉट देखील देण्यात आला आहे. त्याची शटर गती 1/32000 सेकंद आहे.

डीएसएलआर कॅमेऱ्याची वैशिष्ट्ये

डीएसएलआर कॅमेरा लेन्सने क्लिक केलेल्या फोटोंची गुणवत्ता वेगळी असते. या कॅमेऱ्यांद्वारे क्लिक केलेला फोटो तुम्हाला पाहिजे तितक्या मोठ्या आकारात तयार करता येतो. त्याच्या मदतीने, सर्वोत्कृष्ट इंस्टाग्राम रील आणि इतर प्लॅटफॉर्मसाठी व्हिडिओ आणि फोटो क्लिक केले जाऊ शकतात.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.