कॉलेज तरुणांसाठी खुशखबर, दुकाटीची स्वस्त बाईक भारतात लॉन्च
नवी दिल्ली : सुपरबाईक बनवणारी इटालियन प्रसिद्ध कंपनी दुकाटीने (Ducati) नवीन बाईक लाँच केली आहे. स्क्रॅम्बलर असं या बाईकचे नाव आहे. या बाईकची (एक्स-शोरुम) किंमत 7 लाख 89 हजार रुपये ते 10 लाख 49 हजार रुपयांच्या दरम्यान आहे. या बाईकमध्ये पाच प्रकारचे व्हेरियंट दिले आहेत. दुकाटीच्या नव्या बाईकमध्ये दोन रंग उपलब्ध आहेत. पिवळा आणि केसरी असे […]
नवी दिल्ली : सुपरबाईक बनवणारी इटालियन प्रसिद्ध कंपनी दुकाटीने (Ducati) नवीन बाईक लाँच केली आहे. स्क्रॅम्बलर असं या बाईकचे नाव आहे. या बाईकची (एक्स-शोरुम) किंमत 7 लाख 89 हजार रुपये ते 10 लाख 49 हजार रुपयांच्या दरम्यान आहे. या बाईकमध्ये पाच प्रकारचे व्हेरियंट दिले आहेत.
दुकाटीच्या नव्या बाईकमध्ये दोन रंग उपलब्ध आहेत. पिवळा आणि केसरी असे दोन रंग दिले आहेत. बाईकची डिझाईनही सर्वांना आकर्षित करत आहेत. नव्या बाईकमध्ये पाच प्रकारचे व्हेरियंट दिले आहेत. आयकॉन, मॅच 2.0, क्लासिक, फुल थ्रोटल, कॅफे रेसर हे पाच व्हेरियंट दिले आहेत. प्रत्येक व्हेरियंटची किंमत वेगवेगळी आहे.
या बाईकमध्ये 13 लीटरची फ्यूअल टॅक दिली आहे. तसेच 6 गिअर, 803 सीसी, इलेक्ट्रॉनिक फ्यूअल इंजेक्शन दिले आहे. गाडीमध्ये एबीस सिस्टम असून 170 किलो वजनाची गाडी आहे.
महागड्या बाईकमध्ये नेहमी दुकाटी गाडीचे नाव घेतले जाते. दुकाटीच्या प्रत्येक बाईकची किंमत ही 15 लाखे ते 50 लाखांपर्यंत आहे. मात्र पहिल्यांदाच कंपनीने स्वस्त दरात बाईक लाँच केली आहे. भारतात कंपनीने स्क्रॅम्बलर ही बाईक लाँच केली असून या बाईकची किंमत 7 लाखांपासून ते 10 लाखांपर्यंत आहे.
दुकाटीच्या या नव्या बाईकची किंमत किती?
नवी दिल्ली – 8,48,427
मुंबई – 8,72,097
बंगळुरु – 9.11.547
कोलकत्ता – 8,25,117
पुणे – 8,72,097
अहमदाबाद – 8,64,207
इरनाकुलूम – 8,63,892
गुरगाव – 8,79,672
भारतातील प्रत्येक शहरात दुकाटीच्या या नव्या बाईकची किंमत वेगवेळी आहे. राज्यानुसार टॅक्स आणि इतर गोष्टींचा त्या किंमतीत समावेश केला जातो.