MS Dhoni : या कारणामुळे लग्नपत्रिकेत छापला महेंद्रसिंह धोनीचा फोटो
यावर्षी महेंद्रसिंग धोनी शेवटची आयपीएल स्पर्धा खेळणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर बीसीसीआयसोबत काम करणार असल्याची चर्चा आहे.
मुंबई : महेंद्रसिंह धोनीला (Mahendra singh dhoni) देशात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखलं जातं. ज्यावेळी महेंद्रसिंह धोनी टीम इंडियाचा कर्णधार होता. त्यावेळी टीम इंडिया तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल होता. त्याचबरोबर धोनीने टीम इंडियाला प्रत्येक फॉरमॅटमधील विश्वचषक (world cup) जिंकून दिला आहे. त्यामुळे देशात महेंद्र सिंग धोनीच्या चाहत्यांची संख्या अव्वल आहे. आतापर्यंत महेंद्र सिंग धोनी वापरत असलेल्या अनेक वस्तू चाहते वापरत आहेत. सध्या महेंद्रसिंह धोनी फक्त आयपीएलच्या फॉरमॅटमध्ये खेळताना दिसत आहे. महेंद्रसिंग धोनीचा फोटो एका चाहत्याने लग्नाच्या पत्रिकेत (marriage card) छापल्यामुळे त्याची सगळीकडे जोरात चर्चा सुरु आहे.
एका चाहत्याने लग्नाच्या पत्रिकेत महेंद्र सिंह धोनीचा फोटो छापला आहे. त्यामुळे ती लग्नपत्रिका सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. ही लग्नपत्रिका कर्नाटक राज्यातील असल्याचं एका वेबसाईटने म्हटलं आहे. धोनीचा फोटो उजव्या बाजूला छापला आहे. कालच्या बाजूला वधू आणि वराचं नाव छापण्यात आलं आहे.
सध्या महेंद्रसिंग धोनी मैदानात घाम गाळत असल्याची माहिती मिळाली आहे. आतापर्यंत महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमध्ये चैन्नईच्या टीमला अनेकदा चषक जिंकून दिला आहे. त्यामुळे त्याचे देशात मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. यावर्षी महेंद्रसिंग धोनी शेवटची आयपीएल स्पर्धा खेळणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर बीसीसीआयसोबत काम करणार असल्याची चर्चा आहे.
A fan printed the photo of MS Dhoni in his wedding card. pic.twitter.com/DDkhVbIrwk
— Johns. (@CricCrazyJohns) March 10, 2023
सध्या ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाली आहे, त्याचबरोबर चर्चा सुध्दा सुरु आहे. महेंद्रसिंग धोनी यंदा आयपीएलमधील निवृत्ती घेण्याची शक्यता असल्याने त्याची जागा कोण संभाळणार असा सुध्दा प्रश्न उपस्थित केला जात आहे.