दिवाळीत ॲप्पलचा बंपर धमाका, अर्ध्या किंमतीत मिळवा हे प्रोडक्ट
Apple Diwali Sale 2023 | या दिवाळीत ग्राहकांना ॲप्पलचा बंपर धमाका मिळेल. ॲप्पलचे धमाकेदार प्रोडक्ट्स मुंबईतील बीकेसी आणि दिल्लीतील साकेत येथील ॲप्पल स्टोअरमध्ये सहज मिळतील. या प्रोडक्टवर ग्राहकांना 50 टक्क्यांपर्यंत सवलत मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांचा मोठा फायदा होईल. स्टोअर सुरु झाल्यापासून ग्राहकांना थेट उत्पादन विक्री करण्यात येत आहे.
नवी दिल्ली | 9 नोव्हेंबर 2023 : सध्या दिवाळीनिमित्त ऑफर्सचा भडीमार सुरु आहे. अनेक ऑनलाईन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ग्राहकांना मोठ्या सवलतीत उत्पादनांची विक्री करत आहे. फ्लिपकार्ट, ॲमेझॉन आणि इतर अनेक प्लॅटफॉर्मवर धमाकेदार ऑफर्सचा पाऊस पडला आहे. दिवाळी सणानिमित्त ग्राहकांना मोठा फायदा होईल. ॲप्पलने त्यांच्या उत्पादनावर मोठी सवलत जाहीर केली आहे. ॲप्पलचे गाजलेले स्मार्टफोन, आयपॉड आणि इतर उत्पादने अत्यंत स्वस्तात मिळतील. ग्राहकांसाठी ही पर्वणीच आहे. ॲप्पलचे धमाकेदार प्रोडक्ट्स मुंबईतील बीकेसी आणि दिल्लीतील साकेत येथील ॲप्पल स्टोअरमध्ये सहज मिळतील. या प्रोडक्टवर ग्राहकांना जवळपास 50 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येत आहे.
अर्ध्या किंमतीत उत्पादने
दिवाळीत स्वस्तात उत्पादने मिळावीत यासाठी ॲप्पल दिवाळी विक्री महोत्सवाची सुरुवात झाली आहे. यामध्ये ग्राहकांना आयपॉड, आयफोन 14, आयफोन 14 प्लस यांच्या किंमतीत मोठी सवलत जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही कंपनीच्या उत्पादनांवर 50 टक्क्यांपर्यंत बचत करु शकता. ग्राहक आयफोन 14 आणि आयफोन 14 प्लस सोबत AirPods 3rd जनरेशन 50 टक्क्यांपर्यंत सूट मिळवू शकतात.
अशा आहेत किंमती
AirPods 3rd जनरेशनचे आहे. ते 2021मध्ये बाजारात दाखल झाले होते. या एअरपॉड्सची किंमत 20,900 रुपये आहे. पण तुम्ही आयफोन 14 आणि आयफोन 14 प्लस खरेदी कराल तर त्यासोबत एअरपॉड्स अर्ध्या किंमतीत मिळेल. आयफोन 14 प्रो हा 79,900 रुपयांपासून सुरु होतो. तर बेसिक मॉडेलची स्टोअरेज क्षमतेत कुठलाही बदल न होता त्याची किंमत 69,900 रुपये आहे. या मॉडेलमध्ये 128GB, 256GB आणि 512 GB स्टोअरजे क्षमता आहे.
सवलतींचा पडणार पाऊस
- जर ग्राहकांनी ॲप्पलचा स्मार्टफोन खरेदी केला तर त्यांना ॲप्पल म्युझिकचे सहा महिन्यांचे सब्सक्रिप्शन मिळेल.
- योग्य बँकेचे क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ग्राहकांना त्वरीत कॅशबॅकची ऑफर लागू होईल
- बँकेचे क्रेडिट कार्डवर त्यांना तीन, सहा महिन्यांचा ईएमआय अतिरिक्त खर्चाशिवाय मिळेल
- आयपॅड, एअरपॉड्स, एअरटॅग किंवा ऍपल पेन्सिल खरेदी करणाऱ्यांना पण सवलत मिळेल
- या खरेदीवर त्यांना युनिक इमोजी, नंबर्स, टेक्स्ट मिळेल
- त्यांना हिंदी, बंगाली, मराठी, तामिळ, कन्नड, गुजराती, तेलगू आणि इंग्रजी या भाषेची निवड करता येईल