स्टारलिंक सॅटेलाईट सिस्टमचा सावधानतेने वापर करा;स्पेसएक्सचा सीईओ एलन मास्कचे आवाहन; रशिया करु शकते गैरवापर

मुंबईः रशियाकडून युक्रेनवर हळूहळू अनेक क्षेत्रावर कब्जा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे स्पेसएक्सचा सीईओ एलन मास्क (Elon Musk) यांनी युक्रेनियन नागरिकांना इंटरनेटविषयी धोक्याची सूचना दिली आहे. शुक्रवारी ‘स्पेसएक्स’ (SpaceX) चे एलन मास्क यांनी युक्रेनमधील राहणाऱ्या नागरिकांना स्टारलिंक सॅटेलाईट सिस्टमचा (starlink satellite system) सावधानतेने वापर करा असा सतर्कतेचा इशारा दिला आहे. कारण त्यांच्या व्यावसायिक इंटरनेट नेटवर्कला रशियांकडून […]

स्टारलिंक सॅटेलाईट सिस्टमचा सावधानतेने वापर करा;स्पेसएक्सचा सीईओ एलन मास्कचे आवाहन; रशिया करु शकते गैरवापर
elon muskImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 5:11 PM

मुंबईः रशियाकडून युक्रेनवर हळूहळू अनेक क्षेत्रावर कब्जा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे स्पेसएक्सचा सीईओ एलन मास्क (Elon Musk) यांनी युक्रेनियन नागरिकांना इंटरनेटविषयी धोक्याची सूचना दिली आहे. शुक्रवारी ‘स्पेसएक्स’ (SpaceX) चे एलन मास्क यांनी युक्रेनमधील राहणाऱ्या नागरिकांना स्टारलिंक सॅटेलाईट सिस्टमचा (starlink satellite system) सावधानतेने वापर करा असा सतर्कतेचा इशारा दिला आहे. कारण त्यांच्या व्यावसायिक इंटरनेट नेटवर्कला रशियांकडून टार्गेट केले जाण्याची शक्यता आहे, आणि त्या सगळ्या सिस्टिममध्ये ते अडथळा निर्माण करु शकतात असेही त्यांनी सांगितले आहे. एलन मास्क यांनी नॉन-रशियन कम्युनिकेशन सिस्टमच्या (non-Russian Communication System) रुपाने स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट टारगेट करण्याची जास्त शक्यता असल्याचा धोका त्यांनी दिला आहे. त्यामुळे त्यांनी नागरिकांन एक प्रकारची विनंतीच केली आहे की, गरज असेल तरच तुम्ही स्टारलिंक ओपन करा.

एलन मस्क यांनी ट्विवटरवरुन पोस्ट करुन सांगितल आहे की, म्हणजे त्यांनी धोक्याची सूचनाच दिली आहे की, स्टारलिंक ही एकमेव अशी सिस्टीम आहे जी नॉन रशियन कम्युनिकेशन सिस्टीम आहे, जी आजही युक्रेनमधील काही भागात काम करत आहे. त्यामुळे हे नेटवर्क त्यांच्याकडून नक्कीच टार्गेट केले जाऊ शकते. त्यामुळे त्याचा वापर तुम्ही काळजीपूर्वक करा असेही त्यांनी सांगितले.

अँटीना कायमच माणसांपासून दूर ठेवा

रशियाने क्षेपणास्त्रांचा मारा सतत चालू ठेवल्याने युक्रेन आता विध्वंसतेच्या मार्गावर आहे. त्यामुळे मस्कने हेही सांगितले आहे की स्टारलिंकची गरज असेल तेव्हाच त्याचा वापर करा आणि त्याला असलेला अँटीना कायमच माणसांपासून दूर ठेवा.

रशियाने क्षेपणास्त्रांचा मारा सुरु केल्यानंतर युक्रेनमध्ये प्रचंड मोठी हानी झाली आहे. त्यामुळे युद्धजन्य परिस्थितीत एलनकडून मदतीचे वचन देण्यात आले होते. युक्रेनला वचन दिल्याप्रमाणे एलन मस्कद्वारे चालवण्यात येत असलेल्या कंपनीकडून हल्ल्यावेळी युक्रेनमध्ये यूजर टर्मिनल्सने भरलेला एक ट्रक पाठवण्यात आला होता. त्यानंतर उपपंतप्रधान मायखाईलो फेडोरोव यांना त्या ट्रकचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला होता.

स्पेसएक्स म्हणजे कोणत्याही ठिकाणी सेवा

स्पेसएक्समधील ऑर्बिटमध्ये हजारो स्टारलिंक सॅटलाईट आहेत. जे कंपनीला फाईबर ऑप्टिकल केबलशिवाय कोणत्याही ठिकाणी ती सेवा देते.

स्टारलिंक उपग्रह कक्षेत

रशियन हल्ल्यामुळे युक्रेनच्या इंटरनेट पायाभूत सुविधांचे प्रचंड नुकसान झाले आहे तरीही ते उपग्रह ऑनलाईन ठेवू शकतात. SpaceX ने आतापर्यंत 1,747 पेक्षा जास्त स्टारलिंक उपग्रह कक्षेत ठेवले आहेत आणि एकूण 40,000 हून अधिक प्रक्षेपित करण्यासाठी कंपनी योजना आखत आहे.

संबंधित बातम्या

अ‍ॅमेझॉनवर Apple iPhone 12 मिळत आहे एकदम स्वस्तात, काय आहे कॅशबॅक आणि एक्सेंझ ऑफर जाणून घ्या…

Deepfake Technology चा वापर करुन युक्रेनविरोधी व्हिडिओ व्हायरल; काही बनावट प्रोफाईल काढून टाकली

Facebook : फेसबुकचा कारवाईचा बडगा; महिनाभरात एक कोटींहून अधिक तक्रारींची दखल

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.