Explainer | घरीच तयार करा की वीज! काय आहे Rooftop Solar Scheme

Rooftop Solar Scheme | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात सौर ऊर्जा योजनेची घोषणा केली. देशातील एक कोटी घरांवर हे सोलर पॅनल बसविण्यात येणार आहे. वीज विक्री करुन वार्षिक 18,000 रुपयांचा फायदा होणार आहे. काय आहे ही योजना, कोणाला होणार त्याचा लाभ, जाणून घ्या..

Explainer | घरीच तयार करा की वीज! काय आहे Rooftop Solar Scheme
Follow us
| Updated on: Feb 04, 2024 | 11:45 AM

नवी दिल्ली | 4 February 2024 : 1 फेब्रुवारी रोजी निर्मला सीतारमण यांनी अंतरिम बजेट सादर केले. देशातील एक कोटी कुटुंबांना ‘रुफटॉप सोलर स्‍कीमसाठी’ (Rooftop Solar Scheme) 10000 कोटी रुपयांची तरतूद त्यांनी केली. एक कोटी कुटुंबांना प्रत्येक महिन्याला 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळण्याचा मार्ग यामुळे मोकळा होईल. त्यामुळे वार्षिक 18000 रुपयांचा फायदा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजेटच्या काही महिन्यांअगोदरच ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ सुरु केली होती. काय आहे ही योजना, त्याचा कोणला लाभ घेता येईल ते पाहुयात..

इलेक्ट्रिक व्हेईकलसाठी मोठी मदत

प्रत्येक घराच्या छतावर या योजनेत सोलर पॅनल बसविता येतील. त्यामुळे सूर्याच्या ऊर्जेने वीज निर्मिती करता येईल. ही वीज ग्राहकांना महावितरण सारख्या कंपन्यांना विक्री करता येईल. त्यामाध्यमातून त्यांना वार्षिक 18,000 रुपयांपर्यंतची कमाई होईल. त्यामुळे इलेक्ट्रिक व्हेईकलची चार्जिंग करणे सोपे होईल. झीरो कार्बन उत्पादन योजनेतंर्गत केंद्र सरकार अशा योजनांना पाठबळ देत आहे. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या (Central Electricity Authority) आकड्यांनुसार, देशात सोलर एनर्जी इंस्‍टॉल्‍ड कॅप‍िस‍िटी सध्या 73 गीगावॅटहून अधिक आहे.

हे सुद्धा वाचा

वीज विक्री करुन कमाई

प्रधानमंत्री सूर्योदय योजना (PMSY) ही केंद्र सरकारची महत्वकांक्षी योजना आहे. देशात सोलर एनर्जीचा उपयोग वाढविण्यास त्यामुळे बळ मिळेल. या योजनेत अपारंपारिक ऊर्जेचा लाभ घेता येईल. छतावर, शेतात सोलर पॅनलचा वापर करुन वीज उत्पादन करता येईल. वीज विक्री करुन ग्राहकांना कमाई करता येईल. पण त्यासाठी अटी आणि शर्तींचे पण पालन करावे लागणार आहे.

कोणाला करता येईल अर्ज

  • कोणताही भारतीय नागरीक, संस्था
  • स्वतःचे घर हवे आणि त्यावर मोकळी जागा हवी
  • हे घर मजबूत आणि छतावर सहज सोलर पॅनल बसविता येण्याची सुविधा असावी
  • अर्जदाराकडे वीज जोडणी असावी

कोणाला मिळेल योजनेचा फायदा

सूर्योदय योजनेतंर्गत सरकार एक कोटी घरांवर सौर ऊर्जेसाठी पॅनल बसवणार आहे. त्यासाठी बजेटमध्ये घोषणा करण्यात आली आहे. सोलर पॅनलच्या मदतीने मोफत वीज मिळेल. ज्यांच्या घरावरील छतावर सोलर पॅनल बसविता येणार आहे, त्या कुटुंबांना या योजनेत सहभागी करुन घेण्यात येणार आहे. ही योजना गरीब आणि मध्यमवर्गासाठी आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1.50 लाखांपेक्षा कमी आहे. त्यांना फायदा होईल.

सबसिडीची तरतूद

केंद्र सरकार PMSY अंतर्गत सोलर पॅनल लावण्यासाठी 40 टक्क्यांपर्यंत सबसिडी देईल. पण त्यासाठी अर्जदाराला या योजनेच्या अटी आणि शर्तींचे पालन करावे लागेल. तसेच या योजनेतील नियमानुसार ही सबसिडी देण्यात येईल. या योजनेसाठी सरकार कर्ज पण उपलब्ध करुन देते. या योजनेविषयीची माहिती नागरिकांना https://solarrooftop.gov.in या पोर्टलवर मिळेल.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.