फेसबुकवर पोस्ट करताना विचार करा, नव्या नियमांचे पालन न केल्यास कारवाई, पब्लिक फिगर्सवरील टीका रोखण्याचा कंपनीचा प्रयत्न
अलीकडेच सोशल मीडिया दिग्गज फेसबुकने जाहीर केले आहे की, ते सेलिब्रिटीज, राजकारणी आणि क्रिएटर्ससह पब्लिक फिगर्सना लक्ष्य करणाऱ्या गंभीर 'सेक्शुअल कॉन्टेंट'वर बंदी घालणार आहेत.
मुंबई : अलीकडेच सोशल मीडिया दिग्गज फेसबुकने जाहीर केले आहे की, ते सेलिब्रिटीज, राजकारणी आणि क्रिएटर्ससह पब्लिक फिगर्सना लक्ष्य करणाऱ्या गंभीर ‘सेक्शुअल कॉन्टेंट’वर बंदी घालणार आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे कंपनीच्या हरॅसमेंट धोरणाचा (Harassment Policy) एक भाग म्हणून येतील. फेसबुकचे जागतिक सुरक्षा प्रमुख अँटिगोन डेव्हिस यांनी एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “पब्लिक फिगर, मग ते राजकारणी, पत्रकार, सेलिब्रिटी किंवा क्रिएटर्स असोत, या व्यक्ती फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा वापर त्यांच्या फॉलोवर्सची थेट जोडण्यासाठी करतात,” (Facebook expands policy on harassment to protect public figures, if you dont follow rule your post will be blocked)
डेव्हिस यांनी अधिकृत ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले आहे की, “आमची बुलिंग अँड हरॅसमेंट पॉलिसी पब्लिक फिगर्स आणि खासगी व्यक्तींमधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य (freedom of expression) आणि पब्लिक डिस्क्लोजर सक्षम करते. यामुळे आता मोठ्या प्रमाणावर हरॅसमेंटचे कॉर्डिनेटेड एफर्ट्स दूर केले जातील.
विविध व्यक्तींची बदनामी करण्यासाठी काही लोक वेगवेगळ्या लिंक्स फेसबुकवर पोस्ट करत असतात. इतर सोशल मीडियावरील लिंकही फेसबुकवर शेअर केल्या जातात. अशा लिंक आता फेसबुकवरून काढून टाकल्या जाणार आहेत. कोणत्याही व्यक्तीची फेसबुकवर बदनामी किंवा हरॅसमेंट होऊ नये याची आम्ही दक्षता घेणार आहोत, असेही फेसबुकने म्हटले आहे.
एखाद्या व्यक्तीला ट्रोल करण्यासाठी, सरकार, नेते, सरकारी अधिकारी यांच्यावर तोंडसुख घेण्यासाठी, त्यांची बदनामी करण्यासाठी टीकाकार फेसबुकवर एकापेक्षा जास्त अकाऊंट तयार करतात. विविध अकाऊंट्सवरुन त्यांच्याविरोधात पोस्ट करतात, असे अकाउंट्स आणि त्यावरुन केलेल्या पोस्ट यापुढे ब्लॉक केल्या जातील.
फर्मने म्हटले आहे की, ते कोणत्याही व्यक्तीची हरॅसमेंट होत असेल असा कॉन्टेंट त्वरीत त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन हटवतील. जसे की इनबॉक्समध्ये डायरेक्ट मेसेजेस किंवा पर्सनल प्रोफाइल किंवा पोस्टवरील कमेंट्स.
इतर बातम्या
बहुप्रतिक्षित OnePlus 9RT ग्राहकांच्या भेटीला, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास
Amazon Great Indian Festival : Redmi चा शानदार स्मार्टफोन अवघ्या 7,020 रुपयात, जाणून घ्या ऑफर
‘या’ स्मार्टफोनमध्ये जबरदस्त कॅमेरा मिळणार, 2021 मध्ये हे टॉप कॅमेरा फोन घरी आणा
(Facebook expands policy on harassment to protect public figures, if you dont follow rule your post will be blocked)