डेल्टा व्हेरिएंटची भीती, गुगल, अमेझॉननंतर Facebook कडून कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलावण्याचा निर्णय स्थगित

कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटच्या (Coronavirus delta Variant) वाढत्या प्रकरणांमुळे फेसबुकने गुरुवारी कर्मचाऱ्यांचे कार्यालयात परत येणे पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत पुढे ढकलले आहे.

डेल्टा व्हेरिएंटची भीती, गुगल, अमेझॉननंतर Facebook कडून कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलावण्याचा निर्णय स्थगित
Follow us
| Updated on: Aug 13, 2021 | 3:59 PM

मुंबई : कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटच्या (Coronavirus delta Variant) वाढत्या प्रकरणांमुळे फेसबुकने गुरुवारी कर्मचाऱ्यांचे कार्यालयात परत येणे पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत पुढे ढकलले आहे. सर्वात मोठ्या सोशल नेटवर्क कंपनीने कर्मचाऱ्यांना त्यांच्या कॅम्पसमध्ये परत आणण्याची तयारी सुरु केली होती. परंतु कंपनीने आता कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावण्यापूर्वी त्यांना नोटीस पाठवली जाईल, असे आश्वासन दिले आहे. (Facebook postponed workers return to office due to fear of increasing cases of Delta variant of Coronavirus)

एएफपीच्या तपासाला उत्तर देताना फेसबुकच्या प्रवक्त्याने सांगितले की, “कंपनीला कर्मचाऱ्यांना कार्यालयात परत बोलावायचे आहे, परंतु कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यामुळे कंपनीने कर्मचाऱ्यांना कार्यालयात परत बोलवण्यासाठी जे टार्गेट ठेवलं होतं त्यावर परिणाम होत आहे. आम्ही परिस्थितीचे निरीक्षण करत राहतो आणि तज्ज्ञांसोबत काम करत आहोत, जेणेकरून आमच्या कार्यालयीन योजनांमध्ये परत येणे प्रत्येकाच्या सुरक्षेला प्राधान्य देईल.”

अमेझॉनकडूनही Work From Home च्या मुदतीत वाढ

जगभरात कोरोना आणि डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. याच पार्श्वभूमीवर अमेझॉनने त्यांच्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये पुन्हा बोलवण्याची मुदत वाढवली आहे. कंपनीने एक मेल पाठवून याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान याआधी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावले होते. मात्र कोरोनामुळे हा निर्णय बदलण्यात आला आहे. या नव्या निर्णयानुसार पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येऊ नये, असे आदेश दिले आहे. यानुसार आता अमेझॉनचे कर्मचारी येत्या 3 जानेवारी 2022 पर्यंत घरुनच काम (वर्क फॉर्म होम) करणार आहे.

अमेझॉनने आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेलनुसार, कर्मचाऱ्यांच्या रिटर्न टू ऑफिस टाईमलाईन ही स्थानिक परिस्थितीनुसार जागतिक स्तरावर वेगवेगळी असेल. तसेच कंपनीने याबाबत धोरण बदलल्यास, त्याबाबतचे बदल केल्यास त्याबद्दल नोटीस पाठवली जाईल, असेही सांगण्यात आले आहे. आपल्यातील अनेक कर्मचारी हे त्यांच्या गावी जाऊन काम करत आहे. त्यामुळे त्यांना परतण्यासाठी काही योजना आखाव्या लागतील. मात्र जेव्हा आमच्याकडे याबद्दल कोणती नवीन अपडेट आली, तर आम्ही ती तुम्हाला शेअर करु, अशी माहिती अमेझॉनने दिली आहे.

इतर बातम्या

YouTube वरून कसे कमवाल महिन्याला हजारो डॉलर? काय आहेत अटी? वाचा

 भारतात केवळ 9 महिन्यांत चीनच्या ‘या’ स्मार्टफोनची 20 लाख युनिटची विक्री

अमेझॉनची डिलिव्हरी आता एका दिवसात, ‘या’ 50 शहरांमध्ये सुरु केली नवीन सेवा

(Facebook postponed workers return to office due to fear of increasing cases of Delta variant of Coronavirus)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.