100 हून अधिक वॉच फेस, अलेक्सा सपोर्टसह Fastrack चं स्मार्टवॉच बाजारात, किंमत…

भारतीय फॅशन अॅक्सेसरीज रिटेल ब्रँड फास्ट्रॅकने (Fastrack) अलीकडेच त्यांचे लेटेस्ट फास्ट ट्रॅक रिफ्लेक्स वोक्स (Reflex Vox) स्मार्टवॉच भारतात लाँच केले आहे. फास्ट्रॅक रिफ्लेक्स (Fastrack Reflex) लाइनअपमधील हे पहिले स्मार्टवॉच आहे.

100 हून अधिक वॉच फेस, अलेक्सा सपोर्टसह Fastrack चं स्मार्टवॉच बाजारात, किंमत...
Fastrack Reflex Vox smartwatch
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 11:48 AM

मुंबई : भारतीय फॅशन अॅक्सेसरीज रिटेल ब्रँड फास्ट्रॅकने (Fastrack) अलीकडेच त्यांचे लेटेस्ट फास्ट ट्रॅक रिफ्लेक्स वोक्स (Reflex Vox) स्मार्टवॉच भारतात लाँच केले आहे. फास्ट्रॅक रिफ्लेक्स (Fastrack Reflex) लाइनअपमधील हे पहिले स्मार्टवॉच आहे. स्मार्टवॉचमध्ये 1.69-इंचाची HD स्क्रीन, Amazon Alexa साठी इनबिल्ट सपोर्ट, 10 दिवसांपर्यंतची बॅटरी, 100 पेक्षा जास्त वॉच फेस आणि मल्टी-स्पोर्ट्स मोड समाविष्ट आहेत. याशिवाय, या वेअरेबलमध्ये हार्ट रेट मॉनिटर, स्लीप ट्रॅकर, अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकर आणि ब्लड ऑक्सिजन सॅचुरेशन लेव्हल (SpO2) मॉनिटर यांसारख्या हेल्थ फीचर्सचा समावेश आहे.

कंपनीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, हे वेअरेबल फास्ट्रॅक स्टोअर्स, वर्ल्ड ऑफ टायटन, अधिकृत टायटन डीलर आउटलेट्स, शॉपर्स स्टॉप आणि लाइफस्टाइल रिटेल स्टोअरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल. Fastrack Reflex Vox आजपासून (29 जानेवारी) Fastrack वेबसाइट आणि Amazon द्वारे ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध असेल. अधिकृत वेबसाइटवर सध्या ‘Motify Me’ बटण आहे, जे तुम्हाला स्मार्टवॉचच्या उपलब्धतेबद्दल अपडेट्स प्राप्त करण्यासाठी नोंदणी करू देते.

Fastrack Reflex Vox स्मार्टवॉचची किंमत

Fastrack Reflex Vox ची किंमत 6,995 रुपये ठेवण्यात आली आहे. पण हे स्मार्टवॉच 4,995 रुपयांच्या इंट्रोडक्टरी ऑफरवर उपलब्ध आहे. हे स्मार्टवॉच कार्बन ब्लॅक, ब्लेझिंग ब्लू, शॅम्पेन पिंक आणि फ्लेमिंग रेड या चार रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आले आहे. ग्राहक वॉचचा लुक अधिक चांगला बनवण्यासाठी सॉफ्ट सिलिकॉन बँड इंटरचेंज (अदलाबदल) देखील करू शकतात.

फास्ट्रॅक रिफ्लेक्स व्होक्सचे स्पेसिफिकेशन्स

Fastrack Reflex Vox smartwatch बद्दल संपूर्ण माहिती उपलब्ध नसली तरी कंपनीने काही खास फीचर्सबद्दल माहिती दिली आहे. स्मार्टवॉचमध्ये रेक्टँगुलर 1.69 इंचाची एचडी स्क्रीन आहे आणि ते इनबिल्ट Amazon Alexa ला सपोर्ट करते. स्मार्टवॉच 100 पेक्षा जास्त वॉच फेस आणि मल्टी-स्पोर्ट्स मोडसह येते.

स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट मॉनिटर, Sp02 मॉनिटर, स्लीप ट्रॅकर, अॅक्टिव्हिटी ट्रॅकर, स्ट्रेस मॉनिटर आणि मेंस्ट्रुअल ट्रॅकर आहे. Fastrack Reflex Vox म्युझिक प्लेबॅक कंट्रोल, कॅमेरा कंट्रोल, हायड्रेशन अलर्ट आणि नोटिफिकेशन अलर्ट यांसारख्या फीचर्ससह येतं. कंपनीच्या मते, स्मार्टवॉच 10 दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ देते.

इतर बातम्या

11000 रुपयांच्या रेंजमध्ये 5 बेस्ट स्मार्टफोन्स, जाणून घ्या कॅमेरा डीटेल्स आणि फीचर्स

PHOTO | फिटनेस प्रेमींसाठी लवकरच भारतात येतोय Redmi Smart Band pro.; मोठ्या डिस्प्लेसोबत आहेत आकर्षक फीचर्स !

ओप्पोच्या ग्राहकांसाठी गुड न्यूज…फास्ट चार्जिंग मोबाईलच्या जगात आता ओप्पो ठेवणार पाय, स्मार्टफोन झटपट चार्ज होणार!

(Fastrack Reflex Vox smartwatch launched in India with alexa)

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.