FAU-G | 24 तासांत 10 लाख डाऊनलोड्स, गेम इन्स्टॉल करण्यापूर्वी या बाबी जाणून घ्या

अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर काल प्रजासत्ताक दिनी nCore गेम्सने FAU-G हा बॅटल गेम लाँच केला.

FAU-G | 24 तासांत 10 लाख डाऊनलोड्स, गेम इन्स्टॉल करण्यापूर्वी या बाबी जाणून घ्या
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 2:50 PM

मुंबई : अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर काल (26 जानेवारी) प्रजासत्ताक दिनी nCore गेम्सने FAU-G हा बॅटल गेम लाँच केला. लाँचिंगनंतर अवघ्या 24 तासात या गेमने एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. 24 तासांत गुगल प्ले स्टोरवरुन तब्बल 1 मिलियन (10 लाख) युजर्सने हा गेम डाऊनलोड केला आहे. PUBG हा गेम भारतात बॅन केल्यानंतर युजर्समध्ये FAU-G गेमबाबत खूप मोठी क्रेझ होती. ही क्रेझ लाँचिंगनंतर समोर आलेल्या डाऊनलोड्सच्या आकडेवारीवरुन पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. हा गेम nCore गेमिंगने डेव्हलप केला आहे. (FAUG Crosses 1 Million downloads on Google Play store, things to know before installing)

FAU-G गेमच्या टीझरमध्ये लडाख घाटीच्या गलवान खोऱ्याला दाखवण्यात आलं आहे. यामध्ये चीन आणि भारताच्या सैनिकांमधील लढा दाखवण्यात आला आहे. या टीझरमध्ये भारतीय सैनिकांना शत्रूशी लढताना दाखवण्यात आलं आहे. यामध्ये काही टास्क दिले जातील. तुम्हाला तिथे जावं लागेल आणि दहशतवाद्यांशी भिडावं लागेल. हे तेच ठिकाण आहे जिथे भारतीय सेनेने अनेक ऑपरेशन केले आहेत. गेममध्ये युद्धासाठी गरजेचे असलेले सामान दिसत आहे. यामध्ये असॉल्ट रायफलसह अनेक अत्याधुनिक शस्त्रास्त्र पाहायला मिळत आहेत.

iOS युजर्सना वाट पाहावी लागणार

FAU-G हा गेम सध्या केवळ गुगल प्ले स्टोरवरच उपलब्ध आहे. त्यामुळे iOS युजर्सना या गेमसाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. हा गेम iOS युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे किंवा नाही, किंवा तो कधी उपलब्ध होईल, याबाबत iOS ने अद्याप कोणतीही पुष्टी केलेली नाही. तसेच हा गेम सर्वच अँड्रॉयड युजर्ससाठी उपलब्ध नाही. अँड्रॉयड युजर्सना या गोष्टीची माहिती असायला हवी की, हा गेम सध्या केवळ अँड्रॉयड 8 च्या पुढील व्हर्जन्ससाठी उपलब्ध आहे. जर तुमच्याकडे 3-4 वर्ष किंवा त्याहून जुना फोन असेल तर हा गेम तुमच्या फोनवर खेळता येणार नाही.

केवळ एकाच मोडवर गेम खेळता येणार

सध्या हा गेम केवळ एकाच मोडवर खेळता येणार आहे. याचाच अर्थ पूर्ण गेमचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागेल. सध्या या गेममध्ये कॅम्पेन मोड उपलब्ध आहे. या मोडमध्ये भारतीय सैन्यदलाचा एक अधिकारी त्याच्या टीमपासून वेगळा झाला आहे, आणि त्याला शोधण्यासाठी बाकीचे अधिकारी आणि जवान मिशनवर जाणार आहेत.

स्मार्टफोनमध्ये अधिक स्पेसची गरज

तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर हा गेम खेळायचा असेल तर तुमच्या फोनमध्ये किमान 460 एमबी स्पेस असायला हवी. तसेच तुम्हाला या गेमच्या सर्व्हरमध्ये साईन इन करण्यासाठी मोबाइल किंवा वायफाय कनेक्शन/नेटवर्कची आवश्यकता भासेल.

FAU-G कसा डाऊनलोड कराल?

FAU-G हा गेम गुगल प्ले स्टोरवरुन डाऊनलोड करता येईल. परंतु उद्या गेमच्या लाँचिंगपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. गेम लाँच झाल्यानंतर काय-काय करावं लागेल. त्याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

1. सर्वात आधी गुगल प्ले स्टोर ओपन करा.

2. FAU-G असं सर्च करा.

3. त्यानंतर सर्च रिझल्ट्स दिसतील. त्यामधील पहिल्या-दुसऱ्या क्रमांकावरच FAU-G असेल, त्यावर क्लिक करा. (सुरुवातीच्या पर्यायांमध्ये FAU-G गेम दिसला नाही, तर तुम्हाला थोडं स्क्रोल करावं लागेल.

4. गुगल प्ले स्टोरवर गेम इन्स्टॉल करण्यासाठीचं पेज ओपन होईल.

5. इन्स्टॉलचं बटण युजर्सना तेव्हाच दिसेल, जेव्हा कंपनीकडून गेम लाईव्ह केला जाईल.

6. ज्या युजर्सनी या गेमसाठी आधीच प्री-रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यांना गेम लाईव्ह होताच पुश नोटिफिकेशन पाठवलं जाईल. नोटिफिकेशनवर क्लिक करताच युजर्स थेट इन्स्टॉलेशन पेजवर जातील. युजर्स त्याद्वारे गेम इन्स्टॉल करु शकतात.

गुगल प्ले स्टोरवरुन बनावट FauG गेम्स हटवले

हा गेम प्री-रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध करण्यापूर्वी कंपनीने या नावाचे बनावट गेम्स प्ले स्टोरवरुन हटवले होते. FauG गुगल प्ले स्टोअरवर प्री रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध करुन देताना कंपनीने काही गेम प्ले फोटोदेखील शेअर केले आहेत, ज्यावरून या गेमची थीम कशी असणार आहे, याचा आपण अंदाज बांधू शकतो. काही दिवसांपूर्वी या गेमचा एक व्हिडिओ ट्रेलरही शेअर करण्यात आला होता. दरम्यान, या गेमसाठी प्ले स्टोरवर रजिस्टर करणाऱ्या युजर्सना गेम लाँच होताच पुश नोटिफिकेशन पाठवलं जाईल, त्यानंतर युजर्स गेम डाउनलोड आणि इंस्टॉल करुन खेळू शकतील.

हेही वाचा

लाँचिंगसाठी FAU-G सज्ज, अँड्रॉयडवर डाऊनलोड कसा कराल? जाणून घ्या पूर्ण प्रोसेस

PUBG Mobile India आज भारतात लाँच होणार?

PUBG नंतर आता TikTok ही परतणार? युजर्समध्ये आनंदाचं वातावरण

ऑनलाईन अभ्यासासाठी मोबाईल दिला, पोराने PUBG गेममध्ये 16 लाख उडवले

PUBG गेम खेळू दिला नाही, मुलाने वडिलांच्या शरीराचे तीन तुकडे केले

(FAUG Crosses 1 Million downloads on Google Play store, things to know before installing)

मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.