नवीन वर्षात व्हाट्सअपचे नवीन फिचर ! नोटिफिकेशनमध्ये दिसणार चेहरा, नोटिफिकेशनमध्ये युजरचा चेहरा स्क्रीनवर झळकणार

लोकप्रिय सोशल मॅसेजिंग अॅप व्हाटस्अप दरवेळी नवीन फिचरसह अपडेट होत असते. आता व्हाटस्अपने नवीन वर्षात पुन्हा एक भन्नाट प्रयोग करण्याचे ठरविले आहे. तुमच्या मोबाईल स्क्रीनवर नोटिफिकेशन्सनचा रोज पाऊस पडतो. त्यात व्हाट्सअप युजरसाठी नवीन फिचर घेऊन येत आहे. नोटिफिकेशन सोबत युजरचा चेहरा झळकणार आहे. 

नवीन वर्षात व्हाट्सअपचे नवीन फिचर ! नोटिफिकेशनमध्ये दिसणार चेहरा, नोटिफिकेशनमध्ये युजरचा चेहरा स्क्रीनवर झळकणार
WHATS APP
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 8:24 AM

मुंबई : नवीन वर्षात  पहिले फिचर घेऊन व्हाट्सअप (WhatsApp) यूजरवर(User) गारुड करण्याच्या तयारीत आहे . मोबाईल स्क्रीनवर(Mobile Screen) येणा-या नोटिफिकेशनमध्ये(Notification)  मॅसेज (Message) पाठविणा-याचा प्रोफाइल(Profile) फोटो दिसणार आहे. नवीन व्हाट्सअप फिचर (feature) नोटिफिकेशनमध्ये प्रोफाईल फोटोला सपोर्ट(Support) करणार आहे. व्हाट्सअप नव-नवीन प्रयोग करत असते आणि युजरच्या सुरक्षेसह त्याला फ्रेंडली फिचरचे वेड लावत असते. त्यातीलचा हा नवा प्रयोग या वर्षात पहिल्यांदा करण्यात येत आहे.

सध्या फिचर अॅपल युजरसाठी

इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हाट्सअपने यावर्षातील त्यांचे पहिले फिचर रोल आऊट केले आहे. सिस्टम नोटिफिकेशनमध्ये (System Notification) युजर आता सेंडरने पाठविलेल्या मॅसेज सोबत त्याचा प्रोफाईल फोटो ही पाहू शकणार आहे. व्हाट्सअप प्रोफाइल फोटो युजरला त्याच्या नोटिफिकेशनमध्ये दिसेल. सध्या हे फिचर अॅपल आयओएस (Apple iOS) मध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्याची चाचणी सुरु असून अद्याप सर्व युजरसाठी त्याचा वापर करण्यात येत नाही. यामध्ये काही बग (Bug) आहे का, त्याची चाचपणी सुरु असून बग काढल्यानंतर हे फिचर अॅड्रॉईड(Android) युजरसाठी ही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तेव्हा सर्व युजर त्यांना आलेल्या मॅसेजच्या नोटिफिकेशनमध्ये सेंडरचा प्रोफाईल फोटो पाहु शकतील .

नवीन फिचरची माहिती पोर्टलवर

व्हाट्सअपच्या या भन्नाट प्रयोगाची माहिती दिली आहे ती,  WaBetaInfo यांनी.  WaBetaInfo व्हाट्सअपच्या विकसनशील आणि विकसीत फिचर, प्रयोगाची अपडेट युजर्सना देत असते. WaBetaInfo ने त्यांच्या नवीन ब्लॉगमध्ये या भन्नाट प्रयोगाची माहिती युजरसाठ शेअर केली आहे. नवीन माहितीनुसार, व्हाट्सअपची येऊ घातलेली नवी एडिशन(Edition) नोटिफिकेशनमध्ये सेंडरचे प्रोफाइल फोटो (Sender Profile Photo) दाखविण्यास सपोर्ट करेल. चॅट अथवा ग्रुपवर मॅसेज आला, तर सिस्टिम नोटिफिकेशनमध्ये सेडंरचा प्रोफाइल फोटो युजरला दिसेल. सध्या हे फिचर टेस्टिंगसाठी आयओएस 15 (iOS 15) आणि आयओएस 15 एपीआएस (iOS 15 APIs) मोबाईल धारकांसाठी उपलब्ध आहे.

नवीन फिचरसाठी सज्ज रहा

व्हाट्सअप लवकरच हे वैशिष्ट्यपूर्ण फिचर सर्व युजरसाठी सुरु करण्याची योजना आखत आहे. या फिचरची चाचणी सुरु आहे. प्रोफाइल फोटो नोटिफिकेशनसोबत जोडणी करताना या अॅपला काही अडचणी येत आहे, त्या सोडविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

या व्यतिरिक्त व्हाट्सअप युजरसाठी अनेक नवीन फिचर घेऊन येण्याच्या तयारीत आहे. त्यामध्ये रिएक्शन देण्यासाठी इमोजी (Emojis) व्हाईस मेमो (Voice Memos) ग्रुप अॅडमिनला (Group Admin) जादा अधिकार मिळणार आहेत. तसेच ग्रुप मधील मॅसेज डिलीट (Messge Delete) करण्यासाठी वेळ वाढविण्याचा अधिकार त्याला मिळणार आहे. नवीन वर्षात हे सर्व फिचर लवकरच युजरच्या हाती असतील. त्यामुळे व्हाट्सअप वापरण्याचा आनंद नक्कीच द्विगुणीत होईल.

इतर बातम्या :

Vivo V23 : कलर चेंजिंग इफेक्ट असलेला भारतातला पहिला स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत…

Nokia Mobile : नोकियानं लॉन्च केले परवडणारे स्मार्टफोन्स, किंमत आणि फिचर्स एका क्लिकवर…

Samsung चे Galaxy A33 5G आणि Galaxy A13 5G लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या फोनमध्ये काय असेल खास?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.