Flipkart Big Billion Days Sale 2023 : लिस्ट तयार ठेवा, या वस्तूंवर मिळणार 80 टक्के सूट

Flipkart Big Billion Days Sale : दरवर्षी प्रमाणे यावेळी देखील फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल लवकरच लॉन्च होणार आहे, ज्यामध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, फ्रीज, एसी, स्मार्टवॉच आणि इतर उत्पादनांवर मोठी सूट मिळणार आहे. त्यामुळे आतापासूनच विशलिस्ट तयार करुन ठेवा.

Flipkart Big Billion Days Sale 2023 : लिस्ट तयार ठेवा, या वस्तूंवर मिळणार 80 टक्के सूट
Follow us
| Updated on: Sep 23, 2023 | 4:00 PM

Flipkart Big Billion Days Sale 2023 : फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल लवकरच सुरू होणार आहे. याची तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नसली तरी सेलचे बॅनर फ्लिपकार्ट अॅप आणि वेबसाइटवर दिसत आहे. नवीन फोन, लॅपटॉप किंवा कोणतीही इलेक्ट्रिकल वस्तू घ्यायची असेल, तर आत्तापासून तुमची विशलिस्ट बनवायला सुरुवात करा. Apple, OnePlus, Samsung, Realme आणि Xiaomi सारख्या मोठ्या कंपन्यांचे स्मार्टफोन फ्लिपकार्ट सेलमध्ये स्वस्तात विकले जातील.

आगामी विक्रीसाठी एक स्वतंत्र मायक्रोसाइट तयार करण्यात आली आहे. कोणत्या वस्तूवर किती टक्के डिस्काऊंट असणार आहे याची माहिती देण्यात आली आहे.

वस्तूंवर 50 ते 80 टक्के सूट

फ्लिपकार्टवर दिलेल्या माहितीनुसार, तुम्हाला सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॅबलेटवर 70 टक्के सूट, लॅपटॉपवर आणि स्मार्टवॉचवर 50 टक्के ते 80 टक्के सूट मिळणार आहे. फ्लिपकार्ट प्लस सदस्यांना आधीच याचा फायदा घेता येणार आहे.

तुम्ही अतिरिक्त बचत कशी करू शकाल याची माहिती सांगणार आहोत. सध्या कोणत्या बँकेने या विक्रीसाठी हातमिळवणी केली आहे याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु प्रत्येक वेळी प्रमाणे, तुम्हाला सेलमध्ये खरेदी करताना बँक सवलत, ईएमआय, नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज डिस्काउंटचा लाभ मिळणार आहे.

तुम्हाला स्मार्ट टीव्ही मॉडेल्सवर 75 टक्क्यांपर्यंत सूट, रेफ्रिजरेटरवर 70 टक्क्यांपर्यंत सूट आणि इतर उपकरणांवर 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. याशिवाय, तुम्हाला फ्लिपकार्ट ब्रँडच्या उत्पादनांच्या खरेदीवर 60 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल.

6 नवीन प्रोडक्ट होणार लाँच

मोबाईल पेजवर दिलेल्या माहितीवरून असे समोर आले आहे की यावेळी सेल दरम्यान 6 नवीन स्मार्टफोन लॉन्च केले जातील. याशिवाय मोटोरोला, विवो, सॅमसंग, रियलमी, इन्फिनिक्स आणि इतर कंपन्यांचे स्मार्टफोन स्वस्त दरात मिळतील.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.