सुरु होतोय Flipkart Big Billion Days सेल, ‘या’ प्रोडक्ट्सवर जबरदस्त डिस्काऊंट, जाणून घ्या सर्वकाही

फ्लिपकार्टवरील बिग बिलियन डेज सेल पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे आणि ऑनलाइन रिटेलरने या विक्रीसंदर्भातील डील्स उघड करण्यास सुरुवात केली आहे.

सुरु होतोय Flipkart Big Billion Days सेल, 'या' प्रोडक्ट्सवर जबरदस्त डिस्काऊंट, जाणून घ्या सर्वकाही
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 5:12 PM

मुंबई : फ्लिपकार्टवरील बिग बिलियन डेज सेल पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे आणि ऑनलाइन रिटेलरने या विक्रीसंदर्भातील डील्स उघड करण्यास सुरुवात केली आहे. फ्लिपकार्टने अद्याप सेलच्या तारखा जाहीर केल्या नसल्या तरी, बिग बिलियन डेज सेल दरम्यान उपलब्ध असलेली काही उत्पादने प्रीव्ह्यू केली आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हा सेल सुरू होण्याची अपेक्षा करू शकतो, परंतु फ्लिपकार्टच्या घोषणेची वाट पाहावी लागेल. (Flipkart big billion days sale : Big discount offers on electronics items and smartphones)

बिग बिलियन डेज सेलच्या लेटेस्ट एडिशनसाठी फ्लिपकार्टने अॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेशी करार केला आहे. याचा अर्थ असा की ग्राहक या वेळी इन्स्टंट डिस्काऊंट ऑफर आणि कॅशबॅक ऑफरची अपेक्षा करू शकतात. याव्यतिरिक्त, फ्लिपकार्टने पुष्टी केली आहे की ग्राहक बिग बिलियन डेज सेल दरम्यान पेटीएम वॉलेट किंवा यूपीआय व्यवहारांद्वारे पेमेंट केल्यावर कॅशबॅक मिळवू शकतात.

बिग बिलियन डेज सेलमध्ये उपलब्ध असलेल्या काही उत्पादनांमध्ये नवीन Realme 4K Google TV Stick, विद्यार्थ्यांसाठी नवीन Lenovo Chromebook, Android 11 चालणारे नोकिया स्मार्ट टीव्ही, नवीन Acer Predator गेमिंग लॅपटॉप, नवीन Bolt TWS, नवीन Fire Bolt स्मार्टवॉच यांचा समावेश आहे. आणि नवीन Hisense टीव्हीदेखील समाविष्ट आहे. या उत्पादनांव्यतिरिक्त, फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये साउंडबार, वायरलेस हेडसेट, लॅपटॉप आणि स्मार्टवॉचवर ऑफर आणि वेगवेगळे डिस्काऊंट मिळू शकतात. याशिवाय फ्लिपकार्ट अॅपल, ओप्पो आणि विवो उत्पादनांवर सूट देणार असल्याचेही सांगितले जात आहे.

फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज दरम्यान साउंडबार 80 टक्के डिस्काऊंटसह उपलब्ध होतील असे सेल पेजवरून दिसून येते. त्याचप्रमाणे, इंटेलवर चालणाऱ्या लॅपटॉपवर 40 टक्के सूट, लॅपटॉप, स्मार्ट वेअरेबल्सवर 50 टक्के सूट दिली जाईल.

बिग बिलियन डेज सेल दरम्यान, फायर-बोल्टने मॅक्स स्मार्टवॉच लाँच केल्याची पुष्टी केली आहे. यात 1.78 इंचाचा AMOLED डिस्प्ले 368 × 448 पिक्सेल आणि 326 PPI पिक्सेल डेंसिटी आहे. कंपनी 90 टक्के स्क्रीन टू बॉडी रेशो असल्याचा दावा करते. त्याचप्रमाणे, MSI ने आपला GF63 लॅपटॉप इंटेल कोर i5 10 व्या जनरेशनसह लॉन्च केल्याची पुष्टी केली आहे. त्याची किंमत 83,990 रुपये आहे आणि हा गेमिंग लॅपटॉप आहे.

इतर बातम्या

जिच्यासाठी महाराष्ट्र सरकारनं लॉबिंग केलं होतं, त्या ‘फोर्ड’नं देशातून गाशा का गुंडाळला? वाचा सविस्तर

Yamaha ची शानदार फेस्टिव्ह ऑफर, ग्राहकांना 1 लाखाचं बक्षीस जिंकण्याची संधी

Royal Enfield च्या ग्राहकांना झटका, Meteor 350 नंतर आता ‘या’ बाईकची किंमत वाढली

(Flipkart big billion days sale : Big discount offers on electronics items and smartphones)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.