Big Saving Days Sale : Narzo 30A ते X7 Pro 5G, Realme चे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी

Flipkart Big Saving Days Sale 2 मेपासून सुरू झाला आहे. या सेलमध्ये विविध ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सवर तगडा डिस्काऊंट जाहीर करण्यात आला आहे.

Big Saving Days Sale : Narzo 30A ते X7 Pro 5G, Realme चे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी
Follow us
| Updated on: May 03, 2021 | 10:46 PM

मुंबई : फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल (Flipkart Big Saving Days Sale) 2 मेपासून सुरू होत आहे. या सेलमध्ये विविध ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सवर तगडा डिस्काऊंट जाहीर करण्यात आला आहे. या सेलमध्ये तुम्ही Realme सह आयफोन स्वस्तात खरेदी करु शकता. फ्लिपकार्टने अनेक चांगल्या डील्स आणि ऑफर्स सादर केल्या आहेत. तसेच कंपनीने एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांनी कार्ड आणि ईएमआयद्वारे स्मार्टफोन खरेदी केल्यास व्यवहारांवर त्यांना 10 टक्के सूट मिळणार आहे. (Flipkart Big Savings Days sale: Discount on Realme phones including Narzo 30A, X7 Pro 5G, X50 Pro 5G)

फ्लिपकार्ट अनेक स्मार्टफोनवर विविध सवलती देत आहे. आम्ही तुम्हाला अशाच फोन्सची यादी देणार आहोत, ज्यावर कंपनीने शानदार डील्स सादर केल्या आहेत. ज्या युजर्सना 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत दमदार स्मार्टफोन हवा आहे, अशा युजर्ससाठी सॅमसंग गॅलेक्सी F62 हा एक चांगला पर्याय आहे. आयफोन प्रेमींसाठीदेखील या सेलमध्ये चांगल्या डील्स मिळतील. त्यातही प्रामुख्याने iPhone 11 वर चांगली ऑफर देण्यात आली आहे.

Realme Narzo 30A

Realme Narzo 30A या स्मार्टफोनवर 2,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन 7,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. Narzo 30A मध्ये 6000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन फास्ट Helio G85 चिपसह येतो.

Realme 8

नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या Realme 8 या स्मार्टफोनवर 1,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. 13,999 रुपये या सुरुवातीच्या किंमतीत हा स्मार्टफोन खरेदी करता येईल. Realme 8 मध्ये एक AMOLED डिस्प्ले मिळेल.

Realme X50 Pro 5G

जर तुम्ही परफॉर्मन्स फोकस्ड फोनच्या शोधात असाल तर Realme X50 Pro 5G हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकतो. 24,999 रुपये या किंमतीत हा फोन उपलब्ध असून यामध्ये स्नॅपड्रॅगन 865 चिप उपलब्ध आहे.

Realme X7 Pro 5G

Realme X7 Pro 5G हा स्मार्टफोन दोन महिन्यांपूर्वी लाँच करण्यात आला होता. आता हा स्मार्टफोन 2,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन तुम्ही 27,999 रुपये या किंमतीत खरेदी करु शकता. यामधील डायमेन्सिटी 1100+ चिप जवळपास सर्व प्रकारच्या अॅप्स आणि गेम्सना कंट्रोल करण्यास, सुरळीतपणे चालवण्यास सक्षम आहे. Realme X7 5G देखील डायमेंशन 800U चिपसह 1,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह उपलब्ध आहे.

iPhone 11

आयफोन 11 चं बेस 64 जीबी व्हेरिएंट 44,999 रुपये या किंमतीसह उपलब्ध आहे. A13 बायोनिक चिपसह या फोनमध्ये तुम्हाला UWB चिपदेखील मिळेल. जी AirTags ना सपोर्ट करते.

संबंधित बातम्या

Flipkart Big Saving Days Sale : स्वस्तात खरेदी करा Poco, Samsung आणि Apple चे स्मार्टफोन्स

Flipkart Big Saving Days Sale : G40 ते Razr 5G, मोटोरोलाचे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी

(Flipkart Big Savings Days sale: Discount on Realme phones including Narzo 30A, X7 Pro 5G, X50 Pro 5G)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.