Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Flipkart Mobile Bonanza Sale : 9999 रुपयांपेक्षा कमी किंमतीत ढासू स्मार्टफोन खरेदी करा

फ्लिपकार्ट (Flipkart) या ई-कॉमर्स साईटने पुन्हा एकदा स्मार्टफोन सेलची घोषणा केली आहे. (Mobile Bonanza Sale)

Flipkart Mobile Bonanza Sale : 9999 रुपयांपेक्षा कमी किंमतीत ढासू स्मार्टफोन खरेदी करा
Flipkart Mobile Bonanza Sale
Follow us
| Updated on: Apr 07, 2021 | 3:40 PM

मुंबई : फ्लिपकार्ट (Flipkart) या ई-कॉमर्स साईटने पुन्हा एकदा स्मार्टफोन सेलची घोषणा केली आहे. हा मोबाइल बोनान्झा सेल (Mobile Bonanza Sale) कंपनीच्या वेबसाइटवर लाईव्ह झाला आहे, जो 11 एप्रिलपर्यंत चालणार आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर रियलमी (Realme), रेडमी (Redmi) आणि मोटोरोला (Motorola) कंपन्यांच्या स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट दिला आहे. या दोन्ही कंपन्यांचे अनेक फोन 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना फ्लिपकार्टने दिली आहे. (Flipkart Mobile Bonanza Sale : buy Realme C11, Narzo 30A, Redmi 9 Prime, Moto G10 power under 9999 Rs)

फ्लिपकार्टने स्मार्टफोन्सवर डिस्काऊंट दिला आहेच, यासोबतच ग्राहकांना या सेलमध्ये नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज आणि इतर ऑफर्स देण्यात आल्या आहेत. याचाच अर्थ तुम्ही डिस्काऊंटेड किंमतीसह अधिक डिस्काऊंट मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात तुमच्यासाठी कोणती डील परफेक्ट आहे.

मोटो जी 10 पॉवर (Moto G 10 Power)

हा फोन कंपनीने नुकताच 9999 रुपये इतक्या किंमतीसह लाँच केला होता. आता या फोनवर कंपनीने 500 रुपयांचा डिस्काऊंट देऊ केला आहे. या फोनची मूळ किंमत 9499 रुपये इतकी आहे. हा स्मार्टफोन क्वाड रियर कॅमेरा सेटअप आणि 48 मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेरासह येतो. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन क्वालकॉम 480 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

रियलमी सी 11 (Realme C11)

तुमचं बजेट जर कमी असेल तर Realme C11 हा स्मार्टफोन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. हा स्मार्टफोन तुम्ही केवळ 6,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. यामध्ये कंपनीने 2GB RAM आणि 32GB स्टोरेज स्पेस दिली आहे. याची मेमरी मायक्रोस एसडी कार्डद्वारे वाढवता येईल. या फोनमध्ये पॉवरसाठी 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच याच्या रियर पॅनलवर 13MP+5MP डुअल कॅमेरा सेटअप आणि सेल्फीसाठी फ्रंटला 5 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

रियलमी नार्झो 30 ए (Realme Narzo 30A)

या फोनची मूळ किंमत 9999 रुपये इतकी आहे. मात्र हा फोन तुम्ही 8,499 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. यामध्ये तुम्हाला 3 GB RAM आणि 32 GB स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. याची स्टोरेज स्पेस मायक्रो एसडी कार्डद्वारे 256GB पर्यंत वाढवता येईल. सोबतच यामध्ये 6000 mAh क्षमतेची बॅटरी, 13MP + 2MP चा डुअल कॅमेरा, सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

रेडमी 9 प्राईम (Redmi 9 Prime)

हा फोन तुम्ही 9,499 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. Redmi 9 Prime मध्ये तुम्हाला 4GB RAM आणि 64GB स्टोरेज स्पेस मिळेल. ही मेमरी मायक्रोएसडी कार्डद्वारे 512GB पर्यंत वाढवता येईल. तसेच यामध्ये 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. या फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5020 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

रियलमी X7 प्रो (Realme X7 Pro)

रियलमी X7 प्रो या स्मार्टफोनची किंमत 29,999 रुपये इतकी आहे. हा फोन तुम्ही फ्लिपकार्ट सेलमध्ये 27,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट करत असाल तर त्यावर तुम्हाला 2000 रुपयांचा डिस्काऊंट मिळू शकतो. ही ऑफर 7 एप्रिल ते 1 एप्रिलपर्यंत वैध आहे.

संबंधित बातम्या

Flipkart Sale : Iphone, Realme, Moto च्या स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काऊंट

Flipkart TV Days : बंपर डिस्काऊंटसह MI, Samsung, LG कंपनीचे स्मार्ट टीव्ही खरेदीची संधी

64 MP कॅमेरा, 5000 mAh बॅटरी, खास गेमर्ससाठी डिझाईन केलेला Samsung चा स्मार्टफोन लाँच

(Flipkart Mobile Bonanza Sale : buy Realme C11, Narzo 30A, Redmi 9 Prime, Moto G10 power under 9999 Rs)

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.