Flipkart TV Days sale : 50 इंचांचे स्मार्ट टीव्ही अवघ्या 32 हजारात खरेदीची शेवटची संधी

तुम्हाला जर स्वस्तात स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर फ्लिपकार्टवर तुमच्यासाठी आजपासून Flipkart TV Days सुरू आहे.

Flipkart TV Days sale : 50 इंचांचे स्मार्ट टीव्ही अवघ्या 32 हजारात खरेदीची शेवटची संधी
smart TV
Follow us
| Updated on: Apr 08, 2021 | 5:55 PM

मुंबई : तुम्हाला जर स्वस्तात स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर फ्लिपकार्ट टीव्ही डेज (Flipkart TV Days) सेल सुरू आहे. यामध्ये तुम्हाला हाय टेक्नोलॉजीसह स्मार्ट टीव्ही मिळू शकेल, तेही अगदी कमी किंमतीत. ग्राहकांना बंपर डिस्काऊंटसह चांगल्या फीचर्सनी सुसज्ज असे स्मार्ट टीव्ही खरेदी करता यावे यासाठी फ्लिपकार्टने 4 एप्रिलपासून Flipkart TV Days Sale सुरु केला आहे. हा सेल 8 एप्रिलपर्यंत (आज रात्री 12 वाजेपर्यंत) सुरु राहणार आहे. त्यामुळे स्वसत्ता स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची आज शेवटची संधी ग्राहकांकडे आहे. (Flipkart TV Days sale : Buy MI, VU, Panasonic 50 Inch smart TV under 32000 Rs)

या ब्रँड्सवर तगड्या ऑफर्स

फ्लिपकार्टच्या या टीव्ही डेज सेलमध्ये तुम्हाला एमआय (Mi), सॅमसंग, (Samsung) रियलमी (Realme) आणि LG सारख्या मोठ्या ब्रँड्सकडून स्मार्ट टीव्हीवर जोरदार ऑफर देण्यात आल्या आहेत. बऱ्याच टेलिव्हिजन्सवर साडेतीन ते चार हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. जर आपण या सेलमध्ये 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही घेतला तर आपल्याला 14,999 रुपयांमध्ये हा टीव्ही मिळेल. ही त्याची सुरुवातीची किंमत आहे. उर्वरित स्मार्ट टीव्हींचे दर वेगवेगळ्या कंपन्या आणि त्यांच्या फीचर्सवर आधारित आहेत.

जर तुम्ही Mi 4A Pro स्मार्ट टीव्ही खरेदी करत असाल तर तुम्हाला या टीव्हीसाठी 14,999 रुपये मोजावे लागतील. सॅमसंग च्या 32 इंचांच्या HD Ready स्मार्ट टीव्हीची किंमत 16,490 रुपये इतकी आहे. तर LG च्या स्मार्ट टीव्हीसाठी तुम्हाला 16,999 रुपये मोजावे लागतील. तर Realme चा स्मार्ट टीव्ही 15,499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. Oneplus च्या 32 इंचांच्या स्मार्ट टीव्हीसाठीदेखील तुम्हाला 15,499 रुपये मोजावे लागतील.

50 इंचांच्या स्मार्ट टीव्हीवर बंपर डिस्काऊंट

साधारणपणे 50 इंचांचे स्मार्ट टीव्ही थोडे महाग असतात. परंतु या सेलमध्ये तुम्हाला 50 इंचांचा स्मार्ट टीव्ही अवघ्या 35 हजार रुपयांहून कमी किंमतीत मिळेल. या सेलमध्ये 50 इंचांच्या Mi 4X Ultra HD (4K) स्मार्ट टीव्हीसाठी तुम्हाला 34,999 रुपये मोजावे लागतील. तर 50 इंचांच्या Vu Premium स्मार्ट टीव्हीची किंमत 36,999 रुपये इतकी आहे. Nokia Ultra HD स्मार्ट टीव्हीदेखील 37,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. जर तुम्ही Panasonic Ultra HD स्मार्ट टीव्ही खरेदी करत असाल, तर त्याची किंमत 35,999 रुपये इतकी आहे.

ICICI कार्ड धारकांना अतिरिक्त डिस्काऊंट

फ्लिपकार्ट वर सुरु असलेल्या टीव्ही डेज सेलमध्ये ICICI बँक कार्ड धारकांना अतिरिक्त सूट देण्यात आली आहे. जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट करताना आयसीआयसीआय बँकेच्या कार्डचा वापर केलात तर तुम्हाला 10% इंस्टंट डिस्काऊंट दिला जाईल. याद्वारे तुम्हाला स्मार्ट टीव्ही खरेदी करताना डबल फायदा मिळेल.

50 इंचांचा स्मार्ट टीव्ही 31500 रुपयांत

तुम्ही जर 50 इंचांच्या Mi 4X Ultra HD (4K) हा स्मार्ट टीव्ही खरेदी करत असाल आणि तुम्ही पेमेंट करण्यासाठी ICICI बँकेचं कार्ड वापरलंत तर तुम्हाला त्यावार 10 टक्के डिस्काऊंट (3499) मिळेल. याचाच अर्थ तुम्ही हा टीव्ही 31500 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. Vu Premium स्मार्ट टीव्हीची किंमत 36,999 रुपये इतकी आहे. यावर ICICI बँकेच्या कार्डवर 10 टक्के डिस्काऊंट (3699 रुपये) मिळाल्यानंतर तुम्हाला या टीव्हीसाठी केवळ 33,300 रुपये मोजावे लागतील. तर 35,999 रुपये इतकी किंमत असलेल्या Panasonic Ultra HD या स्मार्ट टीव्हीसाठी तुम्हाला 32400 रुपये द्यावे लागतील.

संबंधित बातम्या

Flipkart Mobile Bonanza Sale : 9999 रुपयांपेक्षा कमी किंमतीत ढासू स्मार्टफोन खरेदी करा

Flipkart Sale : Iphone, Realme, Moto च्या स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काऊंट

(Flipkart TV Days sale : Buy MI, VU, Panasonic 50 Inch smart TV under 32000 Rs)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.