SIM कार्ड लवकरच इतिहासजमा, सॅटलाईट इंटरनेट घेणार जागा, काय आहे अपडेट
Satellite Internet SIM Card | सॅटेलाईट कनेक्शन म्हणजे सॅटेलाईट इंटरनेटविषयी अनेक वर्षांपासून उत्सुकता आहे. स्पेसएक्सचा मालक एलॉन मस्क भारतात ही सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आता या कंपनीने करार पण केला आहे. लवकरच देशात सॅटेलाईट इंटरनेटची सुविधा मिळणार आहे.
नवी दिल्ली | 15 March 2024 : सॅटेलाईट इंटरनेटचे युग लवकरच भारतात आवतरु शकते. आता याविषयी एक मोठी अपडेट समोर येत आहे. स्पेसएक्सचा मालक Elon Musk भारतात ही सेवा सुरु करण्यासाठी खटाटोप करत आहे. पण त्यापूर्वीच या कंपनीने बाजी मारली आहे. भारतीय कंपनी वन वेबने स्पेक्ट्रमसाठी अर्ज दाखल केला आहे. यावर्षी जून महिन्यापर्यंत देशात व्यावसायिक सॅटेलाईट ब्रॉडबँड सेवा सुरु होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याविषयीचा खुलासा एका अहवालात करण्यात आला आहे.
6 वर्षांचा केला करार
कंपनीने सहा वर्षांकरीता वितरणाचा करार केला आहे. भारतात लो अर्थ ऑर्बिट कनेक्टिव्हिटी सेवा देण्यासाठी सहा वर्षांचा करार करण्यात आला आहे. ह्युजेस कम्युनिकेशन्स इंडिया आणि वन वेब यांच्यात झालेल्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. कंपनीनुसार, वनवेबला यामुळे मोठा दिलासा मिळेल. अजून तरी बाजारात इतर कोणती कंपनी नाही. त्यामुळे या दोन कंपन्यांना हा मोठा निर्णय ठरु शकतो.
सिम कार्ड इतिहासजमा
केंद्र सरकारने याविषयी अद्याप कोणताही दुजोरा दिलेला नाही. तसेच ही यंत्रणा कशी काम करेल, त्याची प्रक्रिया काय असेल याची माहिती देण्यात आलेली नाही. पण दूरसंचार कंपन्या याविषयी सातत्याने काम करत आहेत. एकदा सॅटेलाईट कनेक्शन मिळाल्यावर सिम कार्डची कोणतीही आवश्यकता राहणार नाही. सध्या याविषयी ट्रायल सुरु आहे. ही सेवा भारतीय मोबाईलधारकांना कधी मिळेल, याचा ही खुलासा करण्यात आलेला नाही.
जिओ पण मैदानात
सॅटेलाईट इंटरनेटच्या स्पर्धेत जिओ पण मैदानात उतरणार आहे. Jio Space Fiber माध्यमातून ग्राहकांना अंतराळातून, सॅटेलाईटच्या माध्यमातून इंटरनेट उपलब्ध होईल. सॅटेलाईट आधारीत गीगा फायबर तंत्रज्ञानामुळे दूर्गम भागातही इंटरनेट मिळेल. त्यामुळे या भागातही अनेक सोयी-सुविधा सहज पोहचू शकतील. जिओ ही सेवा देशभरात किफायतशीर दरात पुरवणार आहे. सध्या Jio Fiber Broadband आणि Jio AirFiber या सेवा बाजारात उपलब्ध आहेत. हे दोन्ही गतिमान इंटरनेट सुविधा पोहचवत आहेत.