Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BGMI : बॅन होण्याआधी BGMI गेमला 10 कोटींहून अधिक भारतीयांनी Download केलं, कंपनीची भरघोस कमाई

बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया (BGMI) जुलै 2021 मध्ये लाँच झाल्यापासून देशात 100 दशलक्ष वेळा डाउनलोड केले गेले आहे. यामुळे कंपनीनं भरपूर कमाई केलीय. या गेमनं मोठ्या मोबाइल गेम्सला मागं सोडलंय....

BGMI : बॅन होण्याआधी BGMI गेमला 10 कोटींहून अधिक भारतीयांनी Download केलं, कंपनीची भरघोस कमाई
बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियाImage Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 11:45 AM

मुंबई : भारत सरकारनं अलीकडेच गुगल (Google) आणि Apple ला Battleground Mobile India (BGMI) गेम Play Store वरून काढून टाकण्यास सांगितले. आता बीजीएमआय अ‍ॅप भारतात (India) डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध नाही. बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया (BGMI) जुलै 2021 मध्ये लाँच झाल्यापासून देशात दहा कोटी वेळा डाउनलोड केले गेले आहे. BGMI च्या डेव्हलपर Crafton Inc ने जून तिमाहीसाठी कमाई जाहीर करताना ही घोषणा केली. कंपनीनं सांगितले की, वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कंपनीच्या महसुलात वाढ होऊन भारतातील नवीन वापरकर्ता जोडण्यात वाढ झाली आहे.याशिवाय कंपनीनं सांगितलं की, BGMI मास्टर्स स्पर्धा जी देशांतर्गत नॉडविन गेमिंगच्या भागीदारीत आयोजित केली गेली होती आणि स्टार स्पोर्ट्स या टीव्ही चॅनेलवर प्रसारित झाली होती. एकूण 2 कोटी 40 लाख टीव्ही दर्शक आणि 20 कोटी दशलक्ष दर्शक मिळाले.

95 टक्के महसूल मिळाला

क्राफ्टनच्या मते, 2022 च्या पहिल्या सहामाहीत कंपनीच्या जागतिक महसुलात वर्ष-दर-वर्ष (YoY) 3 टक्के वाढ झाली, तर ऑपरेटिंग नफा 18% वार्षिक वाढला. मे मध्ये कंपनीने सांगितले की तिला वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आंतरराष्ट्रीय बाजारातून 95 टक्के महसूल मिळाला आहे. जून 2022 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा एकूण महसूल अंदाजे 32 कोटी 50 लाख होता.

लोकप्रिय गेम

PUBG मोबाईल प्रमाणे BGMI हा देखील आपल्या अल्प कालावधीत भारतीयांसाठी एक आवडता खेळ बनला होता. 2022 मधील काही शीर्ष BGMI स्पर्धांची एकत्रित किंमत सुमारे 6-8 कोटी रुपये होती.या तुलनेत, भारतातील दुसरा सर्वात मोठा eSports गेम असलेल्या Valorant चा वार्षिक बक्षीस पूल BGMI च्या 15 टक्के देखील नाही.

पंतप्रधानांना पत्र

TechCrunch मधील एका अहवालानुसार काही गेमिंग कंपन्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ‘न्यायपूर्ण’ वागण्याची आणि भारतातील गेमिंग इकोसिस्टमला चालना देण्यासाठी मदत करण्याची विनंती केली आहे. या कंपन्या सरकारला “भारतात कार्यरत असलेल्या सर्व संस्थांशी समानतेने आणि न्याय्यपणे वागावे” अशी विनंती करत आहेत. पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी या प्रकरणात त्वरित हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. भविष्यात अधिक तातडीच्या परस्परसंवाद आणि चर्चेसाठी कार्य करण्यासाठी सल्ला आणि मार्गदर्शन मागितले आहे.

खेळणाऱ्यांची मोठी संख्या

गेल्या महिन्याच्या अखेरीस सरकारने Google आणि Apple यांना त्यांच्या संबंधित ऑनलाइन स्टोअरमधून माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या कलम 69A अंतर्गत BGMI गेमिंग अ‍ॅप ब्लॉक करण्याचे आदेश दिले. गेम डेव्हलपर क्राफ्टनने अलीकडेच जाहीर केले की BGMI ने भारतात 10 कोटींहून अधिक नोंदणीकृत वापरकर्ते ओलांडले आहेत.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.