Mobile Game : मोबाईल गेममध्ये हरला म्हणून मारले 200 जोडे, अल्पवयीन मुलाची प्रकृती खालावली, नेमका काय प्रकार? जाणून घ्या…

पश्चिम बंगालमध्ये मोबाईल गेम हरल्यामुळे एका अल्पवयीन मुलावर चपलाने 200 वेळा मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर मुलाची प्रकृती खालावली आहे. नेमका काय प्रकार आहे. याविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...

Mobile Game : मोबाईल गेममध्ये हरला म्हणून मारले 200 जोडे, अल्पवयीन मुलाची प्रकृती खालावली, नेमका काय प्रकार? जाणून घ्या...
प्रातिनिधीक फोटोImage Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 12:58 PM

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये (West Bangal) मोबाईल गेम (Mobile Game)  खेळताना हरल्याच्या  कारणावरून एका अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. वृत्तानुसार ही घटना पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील पोटाशपूर गावातील आहे. येथे एका अल्पवयीन मुलाला मोबाईल (Mobile) गेममध्ये हरल्याबद्दल चपलाने 200 वेळा मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर मुलाची अवस्था अशी झाली की त्याला मेदिनीपूर मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ही घटना बुधवार, 17 ऑगस्टला घडली. पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील पोटाशपूर गावापासून काही अंतरावर असलेल्या एका दुर्गम ठिकाणी काही अल्पवयीन मुले मोबाईलवर गेम खेळत होती. या गेममध्ये पराभूत झालेल्याला शूजने मारण्याची अट होती. यामध्ये हरल्यानंतर अल्पवयीन मुलाला चपलानं 200 जोडे मारण्यात आले. अल्पवयीन घरी परतल्यावर त्याची प्रकृती बिघडली आणि नाकातून रक्त येऊ लागले. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी अल्पवयीन मुलाला घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. तेथून त्यांना नंतर मेदिनीपूर मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले.

हायलाईट्स

  1. घटना बुधवार, 17 ऑगस्टला घडली
  2. पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील पोटाशपूर गावापासून काही अंतरावर घटना घडली
  3. एका दुर्गम ठिकाणी काही अल्पवयीन मुले मोबाईलवर गेम खेळत होती
  4. गेममध्ये पराभूत झालेल्याला शूजने मारण्याची अट होती
  5. हरल्यानंतर अल्पवयीन मुलाला चपलानं 200 जोडे मारण्यात आले
  6. अल्पवयीन घरी परतल्यावर त्याची प्रकृती बिघडली आणि नाकातून रक्त येऊ लागले
  7. कुटुंबीयांनी अल्पवयीन मुलाला घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले
  8. मेदिनीपूर मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले.

कोणता गेम खेळत होते?

बुटाने मारहाण केल्याची स्थिती कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी स्थानिक पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर अल्पवयीन मुलालाही पोलिस ठाण्यात बोलावून चौकशी करण्यात आली. मात्र, हे अल्पवयीन मुले कोणता खेळ खेळत होते, याचे नाव अद्याप उघड झालेले नाही. पोलिसांनीही यावर भाष्य केलेले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

दुष्परिणामही वाढत आहेत

हे लक्षात घेण्यासारखे आहे की ऑनलाइन व्हिडिओ गेमिंगचा बाजार खूप वेगाने वाढत आहे, त्यासोबतच त्याचे दुष्परिणामही वाढत आहेत. अनेक व्हिडीओ गेम्स लहान मुलांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहेत. ब्लू व्हेलसारख्या गेममुळे अनेकांचा मृत्यूही झाला आहे. अशा व्हिडीओ गेम्सचा मुलांवर नकारात्मक परिणाम होत असून, ते हिंसक बनत आहेत आणि जीवे मारण्यासही प्रवृत्त होत आहेत.

प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.