भारतात बॅन तरीही PUBG चा जगभरात डंका, 100 कोटींहून अधिक युजर्सकडून गेम डाऊनलोड

भारत हे PUBG Mobile गेमसाठीचं सर्वात मोठं मार्केट आहे, हा गेम भारतात बॅन झाल्यानंतर गेम बनवणाऱ्या कंपनीचं मोठं नुकसान होईल असं बोललं जात होतं.

भारतात बॅन तरीही PUBG चा जगभरात डंका, 100 कोटींहून अधिक युजर्सकडून गेम डाऊनलोड
PUBG Mobile Game
Follow us
| Updated on: Mar 27, 2021 | 12:04 PM

मुंबई : भारत-चीन तणावाच्या (India-China tension) पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पाच महिन्यांपूर्वी चीनला मोठा झटका दिला. केंद्र सरकारने भारतात PUBG या लोकप्रिय गेमिंग अ‍ॅपसह 118 चिनी अ‍ॅप बॅन केले. त्यापूर्वी केंद्र सरकारने टिक टॉक, शेअरइट, हॅलो, यूसी ब्राऊझर यांसारखे एकूण 59 अ‍ॅप्लिकेशन बॅन केले होते. भारत हे PUBG Mobile गेमसाठीचं सर्वात मोठं मार्केट आहे आणि हा गेम भारतातच बॅन झाल्यानंतर गेम बनवणाऱ्या कंपनीचं खूप मोठं नुकसान होईल असं बोललं जात होतं. परंतु तसं झालेलं नाही. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या मोबाईल गेम्सच्या यादीत पबजी मोबाईल गेम पहिल्या स्थानावर आहे. Sensor Tower च्या रिपोर्टनुसार 2020 मध्ये चीनी मोबाईल गेम्सने मोठ्या प्रमाणात पैसे कमावले आहेत. तसेच डाऊनलोड्सच्या बाबतीतदेखील PUBG Mobile अव्वल असल्याची आकडेवारी समोर आली आहे.

चिनी मोबाईल गेम PUBG MOBILE जगभरात खूपच पसंती मिळीत आहे. चीनच्या बाहेर आतापर्यंत एकूण 100 कोटी लोकांनी PUBG MOBILE Game डाउनलोड केला आहे. कंपनीने आपल्या ऑनलाइन गेमबाबतचा अहवाल प्रसिद्ध करुन याबाबतची माहिती दिली आहे. कंपनीने दावा केला आहे की, चौथ्या तिमाहीत त्यांचे उत्पन्न 29 टक्क्यांनी वाढले आहे. चीन आणि इतर आंतरराष्ट्रीय बाजारात व्हिडिओ गेमसाठी पैसे देणार्‍या युजर्सच्या संख्येत वाढ झाल्यामुळे हे शक्य झाले आहे. कंपनीने आपल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, “जगातील सर्वात लोकप्रिय बॅटल रॉयल गेम्सपैकी (Battle Royal Games) एक असलेल्या पबजी मोबाइलने एक नवीन मैलाचा दगड गाठला आहे. टॅन्सेंटच्या मते, चीनच्या बाहेर 100 कोटी लोकांनी हा गेम डाऊनलोड केला आहे.

कमाईतही पबजी सर्वात पुढे

मोबाईल अ‍ॅप डेटा अ‍ॅनालिसिस फर्म Sensor Tower च्या लिस्टमध्ये सर्वात जास्त ग्रोथ (Growth) करणाऱ्या गेम्समध्ये PUBG Mobile पहिल्या नंबरवर आहे. जागतिक बाजारात पबजी मोबाईलने 1.06 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. दरम्यान, चीनच्या 30 मोबाईल गेम्सचं उत्पन्न 47 टक्क्यांनी वाढले आहे. अशा परिस्थितीत या गेम्सचे मूल्य 6.3 अब्ज डॉलर्सवरुन (वर्ष 2019) वरून 9.3 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढले आहे. जागतिक बाजारात चीनमधील 37 अॅप्सनी 100 मिलियन (10 कोटी) डॉलर्सपेक्षा अधिक कमाई केली आहे, 2019 च्या तुलनेत हा आकडा 12 पट जास्त आहे. आता परदेशी बाजारपेठ (जपान) चीनी पब्लिशर्ससाठी महत्त्वाची ठरत आहे.

PubG Mobile India लवकरच लाँच होणार

भारतात PUBG Mobile लाँच होण्यासंबंधी अद्याप कोणतीही पक्की बातमी समोर आलेली नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की PUBG कॉर्पोरेशनने अद्याप आशा सोडलेली नाही. भारतात या गेमसाठीचं अप्रूव्हल मिळवण्यात अनेक अडचणी समोर येत आहेत. दुसऱ्या बाजूला पबजीने भारतात एका कंपनीची स्थापना तिथे लोकांना कामावर घेतलं जात आहे. अलीकडेच, PUBG कॉर्पोरेशनने Investment & Strategy Analyst हायर करण्यासाठी लिंक्डइनवर जॉब व्हॅकेन्सी पोस्ट केली आहे. जॉब डिस्क्रिप्शन कंपनीने म्हटलं आहे की, उमेदवाराला भारत आणि MENA क्षेत्राशी संबंधित प्रक्रियेचे आणि जागतिक कराराच्या प्रवाहाचे मूल्यांकन करणे तसेच त्यांच्या ग्लोबल टीम्सना असिस्ट करणे यांसारखी कामं करावी लागतील.

नव्या गेममध्ये बदल केले जाणार

कंपनीने घोषणा केली आहे की, PUBG Mobile India नावाचा एक नवीन गेम लाँच केला जाणार आहे. यात काही बदल केले जातील जे पूर्णपणे इंडियन गेमर्ससाठी असतील. हा गेम व्हर्च्युअल सिम्युलेशन ट्रेनिंग गाऊंडमध्ये सेट केला जाईल आणि नवीन कॅरेक्टर्स क्लोथ अँड ग्रीन हिट इफेक्ट्स स्टार्ट करु शकतील. PUBG कॉर्पोरेशन भारतात आपली व्याप्ती वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. या नोकरीच्या ड्स्क्रीप्शनमधून याचा अंदाज लावता येईल. दरम्यान, असेही सांगण्यात आले आहे की, ही जॉब व्हॅकेन्सी कंपनीच्या बंगळुरु येथील कार्यालयासाठी आहे.

जबरदस्त गेमप्ले

दरम्यान, PUBG Corporation ने म्हटलं आहे की, आमचं नवं गेमिंग अॅप युजर्सना जास्तीत जास्त सुरक्षा आणि जबरदस्त गेम प्ले प्रदान करेल. भारतीय प्लेयर्सशी सहज कम्युनिकेशन व्हावे यासाठी कंपनी एक सबसिडरी तयार केली जाणार आहे. तसेच कंपनी भारतात 100 कर्मचाऱ्यांना नोकरी देणार आहे. यासाठी कंपनी भारतात काही ठिकाणी लोकल कार्यालय सुरु केली जाणार आहे. कंपनी भारतात लोकल बिझनेससह गेमिंग सर्व्हिस देणार आहे.

Krafton Inc (PUBG Corporation ची पॅरेंट कंपनी) या कंपनीने भारतात 100 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक मनोरंजन, लोकल गेम्स, ई-स्पोर्ट्स आणि आयटी इंडस्ट्रीसाठी असेल. PUBG Corporation च्या म्हणण्यानुसार ही कोणत्याही कोरियन कंपनीने भारतात केलेली सर्वात मोठी गुंतवणूक आहे.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतीय प्लेअर्सना अधिक चांगला अनुभव प्रदान करण्यासाठी PUBG कॉर्पोरेशनने त्यांचा गेमिंग कॉन्टेंट अपडेट आणि अधिक अॅडव्हान्स केला आहे. भारतीय प्लेअर्सच्या इच्छेनुसार आणि मागणीनुसार नवा गेम कस्टमाईज करण्यात आला आहे.

कसा बनला पबजी गेम?

एक जपानी चित्रपट ‘बॅटल रोयाल’ पासून प्रेरणा घेऊन Pubg हा गेम बनवण्यात आला आहे. या चित्रपटात सरकार विद्यार्थ्यांच्या एका ग्रूपला बळजबरी करून मृत्यूशी लढायला पाठवतं. त्याच गोष्टीला धरून हा गेम बनवण्यात आला आहे.

हा गेम दक्षिण कोरियाची व्हीडिओ गेम कंपनी ब्लूहोलनं विकसित केला आहे. या कंपनीनं या गेमचं डेस्कटॉप व्हर्जन तयार केलं होतं. परंतु, चीनची कंपनी Tenncent ने काही बदल करून या गेमचं मोबाईल व्हर्जन लाँच केलं. डेस्कटॉप व्हर्जनपेक्षा मोबाईल व्हर्जनला जगभरात खूप प्रसिद्धी मिळाली. भारतात हा गेम सर्वात यशस्वी ठरला. जगभरात पब्जी खेळणाऱ्यांपैकी जवळपास 25 टक्के लोक भारतातील आहेत, 17 टक्के चीनमध्ये तर 6% गेमर्स अमेरिकेत आहेत. जगभरात हा गेम 60 कोटींपेक्षा अधिक लोकांनी डाऊनलोड केला आहे.

संबंधित बातम्या

कन्फर्म! PUBG Mobile India लाँच होणार, हा घ्या पुरावा

PUBG नंतर आता TikTok ही परतणार? युजर्समध्ये आनंदाचं वातावरण

ऑनलाईन अभ्यासासाठी मोबाईल दिला, पोराने PUBG गेममध्ये 16 लाख उडवले

PUBG गेम खेळू दिला नाही, मुलाने वडिलांच्या शरीराचे तीन तुकडे केले

(worldwide 100 million users downloaded PUBG Mobile Game)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.