Gmail वर एका क्लिकवर डिलीट होणार विनाकामाचे मेल, जाणून घ्या नवीन फीचर
नवीन फीचर एक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला खूप काही करावे लागणार नाही. हा पर्याय तुम्हाला Manage Subscriptions किंवा Gmail अॅप, वेब व्हर्जन या दोन्ही ठिकाणी मिळू शकेल. त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमचा जीमेल सुरु करावे लागणार आहे.

Gmail Manage Subscriptions: गुगलचे जीमेल खाते इंटरनेट वापणाऱ्या जवळपास सर्वांकडे आहे. जीमेलमध्ये दररोज अनेक नवीन मेल येत असतात. अनेक मेल विनाकामाचे असतात. या मेलमुळे इनबॉक्स भरुन जाते. ऑफर्स, सेल्स, अॅप्लिकेशन अपडेट्स इत्यादींसह मेलचा पूर इनबॉक्समध्ये येतो. यामुळे महत्त्वाचे मेल शोधण्यास त्रास होतो. महत्वाच्या मेलला उत्तर द्यायचे राहून जाते. पण आता तुम्हाला या सर्व समस्यांपासून सुटका मिळणार आहे. जीमेलने नवीन फीचर मॅनेज सबस्क्रिप्शन आणले आहे. त्यामुळे तुमचे सर्व टेन्शन दूर होणार आहे. या नवीन फीचरचे वैशिष्ट्ये काय? अन् हे कसे काम करेल, जाणून घेऊ या…
Gmail आपल्या यूजर्ससाठी Manage Subscriptions पर्याय देणार आहे. हा एक मॅजिक बटनच्या पद्धतीने काम करेल. या फीचरमुळे तुमचा इनबॉक्स क्लीन आणि क्लीयर होईल. यामध्ये तुम्ही सब्सक्रिप्शन केलेले मेल पाहू शकतात. हे असे मेल आहेत, ज्यांना तुम्ही कधी पाहिले असेल किंवा क्लिक करुन एक्टिव्ह केले असेल. तुम्हाला प्रत्येक मेल उघडून Unsubscribe करावे लागणार नाही. तसेच तुम्हाला शोधण्याची गरज पडणार नाही. फक्त एका क्लिकमध्ये सर्व सब्सक्रिप्शन असणारे मेल समोर येतील. जे मेल तुम्हाला हवे ते ठेवता येईल आणि इतर अनसब्सक्राइब करता येईल.
नवीन फीचर कसे एक्टिव्ह कराल?
नवीन फीचर एक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला खूप काही करावे लागणार नाही. हा पर्याय तुम्हाला Manage Subscriptions किंवा Gmail अॅप, वेब व्हर्जन या दोन्ही ठिकाणी मिळू शकेल. त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमचा जीमेल सुरु करावे लागणार आहे. त्यानंतर इनबॉक्समध्ये जा. डावीकडे तुम्हाला Promotions, Social, Spam हे पर्याय दिसतील.
Promotions, Social, Spam मध्ये तुम्हाला कोणता मेल कामाचा आहे त्याला सुरक्षित ठेऊ शकतात आणि कोणता मेल कामाचा नाही, तो केवळ जागा घेत आहे, ते एका क्लिकवर हटवू शकतात. त्यामुळे तुमचा जीमेल क्लीन आणि क्लीयर असणार आहे.