AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GoDaddy Hacked : तब्बल 12 लाख वर्डप्रेस यूजर्सचा डेटा चोरी, जाणून घ्या डिटेल्स

ग्लोबल वेब होस्टिंग वेबसाईट GoDaddy चा डेटा चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याद्वारे जवळपास 12 लाख वर्डप्रेस ग्राहकांची संवेदनशील माहिती चोरी झाल्याचे समोर आले आहे.

GoDaddy Hacked : तब्बल 12 लाख वर्डप्रेस यूजर्सचा डेटा चोरी, जाणून घ्या डिटेल्स
GoDaddy
Follow us
| Updated on: Nov 24, 2021 | 6:38 PM

मुंबई : ग्लोबल वेब होस्टिंग वेबसाईट GoDaddy चा डेटा चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याद्वारे जवळपास 12 लाख वर्डप्रेस ग्राहकांची संवेदनशील माहिती चोरी झाल्याचे समोर आले आहे. GoDaddy चे मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (CISO) डेमेट्रियस कम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या वर्डप्रेस सर्व्हरवर अनअथोराइज्ड अॅक्सेसची माहिती मिळाली आहे. (GoDaddy Hacked, Data of 12 Lakh WordPress Users At Risk, Phishing Attack possible)

डेमेट्रियस कम्स यांनी काल रात्री उशिरा याबाबतचा खुलासा केला आहे. डेमेट्रियस यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 12 लाख अॅक्टिव्ह आणि डिअॅक्टिव्ह मॅनेज वर्डप्रेस ग्राहकांचे ईमेल आणि नंबर लीक झाले आहेत. त्यामुळे या सर्वांवर फिशिंग हल्ल्यांचा धोका निर्माण झाला आहे. तसा प्रयत्न होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या 17 नोव्हेंबरला कंपनीला मॅनेज वर्डप्रेस होस्टिंगमध्ये अनधिकृत थर्डपार्टी अॅक्सेस सापडला होता.

GoDaddy चा डेटा चोरीला गेल्यामुळे नेमका कोणकोणता डेटा लीक झाला?

  • GoDaddy च्या मते, 6 सप्टेंबर 2021 ला अनधिकृत थर्ड पार्टीने खाली दिलेल्या डेटामध्ये अॅक्सेस मिळवला आहे.
  • 12 लाखांपर्यंत अॅक्टिव्ह आणि इनअॅक्टिव्ह मॅनेज वर्डप्रेस ग्राहकांचे ईमेल अॅड्रेस आणि नंबर्स लीक झाले आहेत.
  • प्रोव्हिजन दरम्यान देण्यात आलेला ठराविक वर्डप्रेसच्या अॅडमिनचा मूळ पासवर्ड लीक झाला आहे.
  • अॅक्टिव्ह ग्राहकांसाठीचे sFTP आणि डेटाबेस युजर नेम आणि पासवर्ड लीक झाले आहेत.
  • तसेच काही अॅक्टिव्ह ग्राहकांच्या SSL मधील खासगी गोष्टी लीक झाल्या आहेत.

दरम्यान याबाबत कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे. कंपनीने म्हटलं आहे की, “आम्ही आमच्या मॅनेज वर्डप्रेस होस्टिंग एनवायरमेंटमध्ये संशयास्पदरित्या सुरु असणारी अॅक्टिव्हिटी ओळखली आहे. त्यानंतर लगेचच एका आयटी फॉरेन्सिक फर्मच्या मदतीने याबाबतचा तपास सुरु केला. तसेच कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात संपर्क साधला आहे. तसेच हॅक केलेला पासवर्डचा वापर करुन एका अनधिकृत थर्ड पार्टीने मॅनेज वर्डप्रेससमध्ये लीगेसी कोड बेसमधील प्रोव्हिजनिंग सिस्टमपर्यंत अॅक्सेस मिळवला आहे.”

GoDaddy च्या युजर्ससाठी महत्त्वाची सूचना

GoDaddy ने युजर्सना दिलेल्या सूचनेनुसार, या जोखमीमुळे युजर्सना फिशिंग हल्ल्यांचा धोका जास्त असू शकतो. प्रोव्हिजनिंगच्या वेळी सेट केलेला मूळ वर्डप्रेस अॅडमिन पासवर्डही हॅक झाला होता. डेमेट्रियस कम्स म्हणाले, “या घटनेबद्दल आणि आमच्या ग्राहकांच्या चिंतेचे कारण ऐकून आम्हाला वाईट वाटते. आम्‍ही या घटनेतून धडा घेऊ आणि सुरक्षेच्‍या अतिरिक्त लेअर्ससोबत आम्ही आमची प्रोव्हिजन सिस्टिम मजबूत करण्यासाठी महत्त्वाची पावले उचलत आहोत,”

इतर बातम्या

जगातील पहिला 18GB रॅम स्मार्टफोन ‘या’ दिवशी लॉन्च होणार, जाणून घ्या याची खासियत

तुम्हीही फेसबुक, गूगल अकाऊंटसाठी ‘हा’ पासवर्ड वापरत नाही ना? काही सेकंदात होऊ शकतो हॅक

आता गूगल पे सह पैशाचे व्यवहार सोपे होणार, मिळतील उत्कृष्ट वैशिष्ट्ये

(GoDaddy Hacked, Data of 12 Lakh WordPress Users At Risk, Phishing Attack possible)

'त्या' झिपलाइन ऑपरेटरची NIA कडून चौकशी झाल्यानंतर वडिलांकडून मोठा दावा
'त्या' झिपलाइन ऑपरेटरची NIA कडून चौकशी झाल्यानंतर वडिलांकडून मोठा दावा.
पाकिस्तानकडून युद्धबंदीचं उल्लंघन; आखनूर भागात गोळीबार
पाकिस्तानकडून युद्धबंदीचं उल्लंघन; आखनूर भागात गोळीबार.
हिंदू हो क्या?, हल्ल्याच्या आदल्या दिवशी दहशतवाद्यांनी विचारलं अन्...
हिंदू हो क्या?, हल्ल्याच्या आदल्या दिवशी दहशतवाद्यांनी विचारलं अन्....
पंतप्रधान मोदींच्या 5 मोठ्या बैठका; निर्णयाकडे देशाचं लक्ष
पंतप्रधान मोदींच्या 5 मोठ्या बैठका; निर्णयाकडे देशाचं लक्ष.
पहलगाम हल्ल्याचा मुद्दा ब्रिटिश संसदेत उपस्थित; शांततेचं आवाहन
पहलगाम हल्ल्याचा मुद्दा ब्रिटिश संसदेत उपस्थित; शांततेचं आवाहन.
'शत्रू हल्ल्याआधी 10 वेळा विचार करेल', नवाज शरीफच्या मुलीची दर्पोक्ती
'शत्रू हल्ल्याआधी 10 वेळा विचार करेल', नवाज शरीफच्या मुलीची दर्पोक्ती.
या गोष्टीत धर्म, जात, पात भाषा आणायच्या नाहीत - शरद पवार
या गोष्टीत धर्म, जात, पात भाषा आणायच्या नाहीत - शरद पवार.
27 नागरिकांचे मृत्यू हे सरकारने घेतलेले नरबळी; संजय राऊतांचा घणाघात
27 नागरिकांचे मृत्यू हे सरकारने घेतलेले नरबळी; संजय राऊतांचा घणाघात.
मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल, पाकची तंतरली अन् मध्यरात्री मोठा दावा
मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल, पाकची तंतरली अन् मध्यरात्री मोठा दावा.
पहलगामनंतर CCSची बैठक, 'सिंधू जल' स्थगितीनंतर कोणता मोठा निर्णय होणार?
पहलगामनंतर CCSची बैठक, 'सिंधू जल' स्थगितीनंतर कोणता मोठा निर्णय होणार?.