AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान! गुगल क्रोमच्या Incognito मोडमध्येही तुमचा डेटा ट्रॅक होतो, कंपनीवर 3600 कोटींचा खटला

फोन असो अथवा संगणक असो, सर्व इंटरनेट युजर्स Google Chrome मध्ये ब्राउझ करतात. (Internet users browse in Google Chrome)

सावधान! गुगल क्रोमच्या Incognito मोडमध्येही तुमचा डेटा ट्रॅक होतो, कंपनीवर 3600 कोटींचा खटला
Google Chrome Incognito
| Updated on: Mar 15, 2021 | 1:41 PM
Share

वॉशिंग्टन डी. सी. : जगभरात ब्राउझिंगसाठी Google Chrome चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तुमचा फोन असो अथवा संगणक असो, सर्व इंटरनेट युजर्स Google Chrome मध्ये ब्राउझ करतात. तुम्हाला गुगल क्रोम ब्राउझरमध्ये Incognito मोडदेखील मिळतो. म्हणजेच, आपल्याला तुमची गोपनीयता जतन करायची (Protect privacy) असेल, अथवा सिक्रेट ब्राउझिंग करायचं असेल तर तुम्ही हा मोड वापरू शकतो. परंतु आता हा Incognito मोडही सुरक्षित नाही. होय, गुगलने सर्व युजर्सना एक मोठा धक्का देत याबाबतचा खुलासा केला आहे की, तुमचं Incognito मोडवरही ट्रॅकिंग केलं जातं. म्हणजेच Google Chrome कडे तुम्ही Incognito मोडवरुन केलेल्या ब्राउझिंगबाबतचा ट्रॅक रिपोर्ट असतो. (Google Chrome tracks users data in incognito mode, 3600 crores lawsuit California Court)

या बातमीनंतर अमेरिकेतील तीन युजर्सनी गुगलला थेट कोर्टात खेचलं आहे. तसेच त्यांनी कंपनीवर 3600 कोटी रुपयांचा खटला भरला आहे. गुगलने त्यांच्या स्पष्टीकरणात असे म्हटले आहे की, आम्हाला असं वाटत होतं की, लोकांना माहिती असेल की आम्ही Incognito मोडवरही त्यांना ट्रॅक करतो.

गुगलने पुढे असेही म्हटले आहे की, Incognito म्हणजे invisible नव्हे (गुप्त म्हणजे अदृश्य नसते), त्यामुळे क्रोम युजर्सकडे एक कॉमन सेन्स असायला हवा की, त्यांचा डेटा ट्रॅक केला जात आहे. कॅलिफोर्नियाच्या न्यायाधीशांनी हे स्पष्ट केले आहे की ते कंपनीविरूद्धचा खटला रद्द करणार नाहीत. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार अमेरिकन जिल्हा न्यायाधीश लुसी कोह (Lucy Koh) म्हणाल्या की, कंपनी युजर्सचा डेटा ट्रॅक करत आहे, याबाबतची माहिती गुगलने त्यांच्या वापरकर्त्यांना दिली नाही.

गुगलने कोर्टात दावा दाखल केला आहे की, Incognito चा अर्थ invisible असा होत नाही. जर या मोडचा वापर करत युजरला कोणत्याही वेबसाईटवर जायचे असेल तर त्या वेबसाइटची माहिती ट्रॅक केली जाईल. त्याच वेळी, त्या वेबसाइटवर उपस्थित थर्ड पार्टी सर्व्हिसेसनाही वापरकर्त्यांविषयीची माहिती मिळते. गूगलने त्यांच्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, Incognito मोड युजर्सना कोणत्याही अॅक्टिव्हिटीशिवाय ब्राउझ करण्याची परवानगी देतो. म्हणजेच या मोडच्या मदतीने तुमच्या अॅक्टिव्हिटी तुमचं डिव्हाइस किंवा ब्राउझर रेकॉर्ड करत नाही. परंतु तुम्ही या मोडमधे कोणत्याही वेबसाइटवर गेल्यास तुमचा डेटा कॅलक्युलेट केला जातो.

इतर बातम्या

मूनशॉट फीचरसह दमदार कॅमेरा, ‘या’ दिवशी लाँच होणार OnePlus 9, OnePlus 9 Pro

Flipkart Carnival Sale सुरु, स्मार्टफोन्सवर बम्पर डिस्काऊंट, आयफोनवर 10000 रुपयांची सूट

Jio युजर्ससाठी खुशखबर! IPL चे सामने मोफत पाहता येणार

(Google Chrome tracks users data in incognito mode, 3600 crores lawsuit California Court)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.