गुगल मॅपने गुपचूप केला बदल, 1 ऑगस्टपासून नेमका कसा होणार परिणाम

Google Map Price Cut: गुगल नेव्हिगेशनसाठी भारतीय ग्राहकांकडून मासिक शुल्क $4 ते $5 घेत होते. आता 1 ऑगस्ट 2024 पासून ते शुल्क $0.38 ते $1.50 पर्यंत कमी करण्यात आले आहे. तसेच गुगल आपले शुल्क डॉलरऐवजी भारतीय रुपयांमध्ये घेणार आहे.

गुगल मॅपने गुपचूप केला बदल, 1 ऑगस्टपासून नेमका कसा होणार परिणाम
google maps
Follow us
| Updated on: Jul 24, 2024 | 3:47 PM

Google Map Price Cut: गुगल मॅपने आपल्या सेवेत काही बदल केले आहेत. येत्या 1 ऑगस्टपासून या बदलाची अंमलबजावणी होणार आहे. भारतासाठी हा बदल फायद्याचा ठरणार आहे. गुगल मॅपने आपल्या शुल्कात घसघसीत कपात केली आहे. ही कपात 70 टक्क्यांपर्यंत आहे. तसेच गुगल मॅपचे शुल्क आता डॉलरमध्येच भरण्याचा आग्रह राहणार नाही. हे शुल्क आता भारतीय रुपयांमध्ये देता येणार आहे. गुगल मॅपला स्पर्धक तयार झाल्यानंतर हा बदल करण्यात आला आहे. गुगलच्या स्पर्धेत ओलाने स्वत:चे मॅप आणले आहे. ओला मॅप मोफत युजर वापरु शकतात.

सामान्य युजरवर परिणाम नाही

गुगल मॅपच्या या बदलाचा परिणाम सामान्य युजरवर काहीच होणार नाही. परंतु गुगल मॅप तुम्ही व्यवसायासाठी वापरत असल्यास त्याचा फायदा होणार आहे. व्यवसायासाठी वापरण्यात येणाऱ्या गुगल मॅपवर शुल्क द्यावे लागते. आता आधीपेक्षा कमी किंमत त्यासाठी मोजावी लागणार आहे. तसेच गुगल मॅप डॉलरऐवजी भारतीय रुपयांमध्ये पैसे घेणार आहे.

कोणाला द्यावे लागते शुल्क

गुगल मॅप फ्री असल्याचे तुम्हाला वाटत असेल. परंतु गुगल मॅप सामान्य ग्राहकांसाठी फ्री आहे. व्यवसायासाठी वापरताना त्याला शुल्क द्यावे लागते. एखाद्या रायडींग शेअर कंपनीने त्याचा वापर सुरु केला, तेव्हा त्या कंपनीला गुगल मॅपला पैसे द्यावे लागतात. त्या किंमतीत आता बदल करावे लागत आहे.

हे सुद्धा वाचा

किती कमी केले शुल्क

गुगल नेव्हिगेशनसाठी भारतीय ग्राहकांकडून मासिक शुल्क $4 ते $5 घेत होते. आता 1 ऑगस्ट 2024 पासून ते शुल्क $0.38 ते $1.50 पर्यंत कमी करण्यात आले आहे. तसेच गुगल आपले शुल्क डॉलरऐवजी भारतीय रुपयांमध्ये घेणार आहे.

ओला येताच गुगला निर्णय

ओलाने स्वतःचे नेव्हिगेशन ॲप नुकतेच सादर केले आहे. हे ॲप गुगल मॅपशी थेट स्पर्धा मानली जाता आहे. ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी लिंक्डइनवर पोस्ट केले आहे की, गुगलने बदल करण्यात खूप विलंब केला आहे. किंमत कमी, भारतीय रुपयात पेमेंट… हा तुमची खोटा देखावा आहे, त्याची गरज नाही.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.