वर्षअखेर Google Pixel Fold लाँच होणार, LTPO OLED डिस्प्लेसह सुसज्ज डिव्हाईस

गुगलने फोल्डेबल पिक्सेल (Google Pixel Fold) फोनचे संकेत देऊन काही वर्ष लोटली आहेत. आता कंपनीने यात थोडीफार प्रगती केली आहे. याबाबतचा डेटा कंपनीने सार्वजनिक केला आहे.

वर्षअखेर Google Pixel Fold लाँच होणार, LTPO OLED डिस्प्लेसह सुसज्ज डिव्हाईस
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 8:12 PM

मुंबई : गुगलने फोल्डेबल पिक्सेल (Google Pixel Fold) फोनचे संकेत देऊन काही वर्ष लोटली आहेत. आता कंपनीने यात थोडीफार प्रगती केली आहे. याबाबतचा डेटा कंपनीने सार्वजनिक केला आहे, अशी अपेक्षा आहे की, Google 2021 च्या अखेरीस हे डिव्हाईस लाँच करेल. डिस्प्ले सप्लाय चेन कन्सल्टंट्सचे वरिष्ठ संचालक डेव्हिड नारंजो यांनी याबाबतची माहिती दिली आहे. नारंजो यांनी नुकत्याच केलेल्या एक ट्वीटमध्ये अशा डिव्हाईसेसची लिस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये SDC कडून LTPO OLED पॅनेल वापरण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये गुगल पिक्सेल फोल्डचे नाव देखील समाविष्ट आहे. (Google Pixel Fold to launch at year End, device equipped with LTPO OLED display)

नारंजो यांच्या ट्विटनुसार, एलटीपीओ ओएलईडी डिस्प्ले गुगलच्या पिक्सेल फोल्डवर वापरता येईल. पिक्सेल फोल्डची लाँचिंग टाइमलाइन दर्शविण्याची ही पहिली वेळ नाही. जीएसएम एरिनाच्या मते, गुगलने पिक्सेल 6 सीरिज लाँच करण्याची तयारी केल्यामुळे, टेक दिग्गज कंपनी या वर्षाच्या चौथ्या तिमाहीत आगामी पिक्सेल फोल्डची घोषणा देखील करू शकते. अहवालात असे म्हटले आहे की गुगल 19 ऑक्टोबर रोजी आपली पिक्सेल 6 सिरीज लॉन्च करेल.

हार्डवेअर डेव्हलपमेंटच्या सूचनांसह, Google फोल्डेबल डिव्हाइसेससाठी अधिक कस्टमाइज Android सक्रियपणे पुढे नेण्यासाठी ओळखले जाते. तथापि, फोल्डेबल स्मार्टफोनसाठी प्लॅटफॉर्म सक्षम करण्यासाठी इतर OEM द्वारे हे माध्यम म्हणून सुरू झाले.

Google Pixel 6 Series लाँचिंगसाठी सज्ज

गुगलने आपल्या पिक्सेल लाइनअपचा आधीच खुलासा केला आहे, कंपनी आता पिक्सेल 6 आणि पिक्सेल 6 प्रो लाँच करण्यासाठी सज्ज आहे. गुगलने या स्मार्टफोनचे फीचर्स देखील उघड केले आहेत. पण कंपनीने अद्याप लॉन्चिंग डेटबद्दल माहिती दिलेली नाही. त्याच वेळी, काही सूत्रांकडून असे समजले आहे की, पिक्सेल 6 ची लॉन्च तारीख उघड झाली आहे. लीकनुसार, ही सिरीज 19 ऑक्टोबर रोजी लाँच केली जाऊ शकते.

गुगल पिक्सेल 6 आणि पिक्सेल 6 प्रो च्या लॉन्चची तारीख उघड करणाऱ्या टिपस्टर बाल्ड पांडाने वीबो वर याबाबतची माहिती उघड केली आहे. टिपस्टरने सांगितले आहे की, Apple इव्हेंट अर्थात आयफोन 13 लाँच करण्यापूर्वी, कंपनी हे दोन्ही स्मार्टफोन लॉन्च करेल. जरी गुगलने अद्याप अधिकृतपणे याची घोषणा केलेली नसली तर या फोनची किंमत आणि उपलब्धतेबाबतची माहिती लाँचिंग दरम्यानच कळेल.

गुगल पिक्सेल 6 सिरीजमध्ये कंपनी 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट देईल. मागच्या अहवालात सांगण्यात आले होते की, त्यात 33W चार्जिंग ब्रिक दिली जाऊ शकते. विशेष म्हणजे आतापर्यंत पिक्सेल फक्त 18W चार्जिंग स्पीडला सपोर्ट करत असे. गुगलबद्दल असेही सांगितले जात आहे की, कंपनी पिक्सेल 6 लाँच इव्हेंटमध्ये स्वतःचा फोल्डेबल फोन देखील सादर करु शकते.

संभाव्य फीचर्स

आधीच्या काही अहवालांमध्ये असे दिसून आले आहे की, आगामी पिक्सेल 6 सिरीजमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स दिले जातील. यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप, 5000mAh बॅटरी, 12 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज स्पेस पिक्सेल 6 प्रो मध्ये देण्यात येईल. त्याचबरोबर, गुगलने असेही म्हटले आहे की, आगामी पिक्सेल 6 सिरीजमध्ये इन-हाउस टेंसर चिपसेट दिला जाईल.

दोन्ही स्मार्टफोनमध्ये स्टॅक रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल, जो बंपच्या आत ठेवला जाईल. त्याच वेळी, पिक्सेल 6 प्रो हा पिक्सेल 6 स्मार्टफोनपेक्षा मोठा असेल. जर कंपनी Apple iPhone 13 लाँच होण्याच्या एक दिवस आधी हा स्मार्टफोन लाँच करत असेल, तर नक्कीच काही मोठे नियोजन असणार हे स्पष्ट आहे. यावेळी कंपनी नक्कीच काहीतरी नवीन सादर करु शकते.

इतर बातम्या

65 डब्ल्यू फास्ट चार्जिंगसह मिळणार वनप्लस 9 आरटी, 3 सी सूचीमध्ये फोनचे तपशील उघड

आता व्हॉट्सअॅपवर फोटोला स्टिकर्समध्ये कनवर्ट होणार, लवकरच येणार नवीन फीचर

आयफोन 12 खरेदी करण्याची उत्तम संधी, आयफोन मूळ किंमतीपेक्षा 15,000 रुपये स्वस्त

(Google Pixel Fold to launch at year End, device equipped with LTPO OLED display)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.