गुगलची सर्च हिस्ट्री डिलीट कशी करायची? ‘ही’ ट्रिक वापरा

| Updated on: Jan 03, 2025 | 3:02 PM

तुम्हीही गुगल वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. कोणीही तुमची गुगल हिस्ट्री पाहू शकतो. यासाठी तुम्ही गुगल हिस्ट्री डिलीट करणे गरजेचे आहे. आता गुगल हिस्ट्री कशी डिलीट करायची, यासाठी खालील ट्रिक जाणून घेऊया.

गुगलची सर्च हिस्ट्री डिलीट कशी करायची? ‘ही’ ट्रिक वापरा
Google search history
Follow us on

तुम्ही गुगल युजर्स असल्याने तुमच्यासाठी आज आम्ही एक ट्रिक घेऊन आलो आहोत. ही ट्रीक तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. कोणीही तुमची गुगल हिस्ट्री पाहू शकतो. यासाठी तुम्ही गुगल हिस्ट्री डिलीट करणे गरजेचे आहे. आता हे तुम्ही कसं करणार? जाणून घेऊया.

गुगल हिस्ट्री डिलीट करायची असेल तर हे काम तुम्ही मिनिटात करू शकता. त्यासाठी तुम्हाला फार काही करावे लागणार नाही. तुम्ही तुमची स्वतःची गुगल हिस्ट्री सहज डिलीट करू शकता. गुगल हिस्ट्री डिलीट केली नाही तर तो नेहमीच तुमच्या डेटाच्या स्वरूपात पडून राहतो. यामुळे कुणीही व्यक्ती गुगल हिस्ट्री पाहू शकते. तुमची गुगल हिस्ट्री इतर कोणतीही व्यक्ती उघडू शकतो किंवा पाहू शकतो आणि आपण दिवसभर काय शोधता ते देखील दिसेल.

लॅपटॉपवरून गुगल हिस्ट्री कशी डिलीट करावी?

लॅपटॉपमधून गुगल हिस्ट्री डिलीट करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर क्रोम ओपन करावा लागेल. यानंतर मोअर ऑप्शनवर क्लिक करा. हे केल्यानंतर हिस्ट्रीच्या पर्यायाकडे जा. आपण हटवू इच्छित असलेल्या आयटमच्या बाजूचा बॉक्स निवडा. आता उजव्या बाजूला डिलीट ऑप्शनवर क्लिक करावं लागेल.

फोन किंवा टॅबलेटमधून हिस्ट्री डिलीट करा

आपण आपल्या अँड्रॉइड स्मार्टफोनमधून गुगल हिस्ट्री डिलीट करू शकता. यासाठी सर्वप्रथम तुमचे गुगल अ‍ॅप्लिकेशन ओपन करा. पुढे, शोध हिस्ट्री क्लिक करा. आता डिलीट माय अ‍ॅक्टिव्हिटीवर क्लिक करा. यानंतर डेट लिमिट सिलेक्ट करा आणि त्या दरम्यान डिलीट अ‍ॅक्टिव्हिटीवर क्लिक करा.

गुगल अ‍ॅपमध्ये वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या प्रोफाईलवर क्लिक करा. पुढे, शोध हिस्ट्री मेनू निवडा. येथे, डिलीट ऑल पर्याय निवडा. यानंतर एका क्लिकवर सर्व सर्च डिलीट करता येतील.

एखाद्या दिवसाची सर्च हिस्ट्री डिलीट करायची असेल तर ऑल अ‍ॅक्टिव्हिटी फ्रॉम डेटवर क्लिक करून सर्व काही डिलीट करण्याचा पर्याय मिळतो. आपण निवडलेल्या दिवसाचा सर्व हिस्ट्री डिलीट करू शकता.

या ट्रिक्स फॉलो केल्यानंतर तुमची गुगल हिस्ट्री सहज डिलीट होईल. यानंतर तुमची हिस्ट्री इतर कोणालाही पाहता येणार नाही. त्यामुळे तुमच्या प्रायव्हसीला कोणताही धोका निर्माण होणार नाही.

तुम्ही गुगल हिस्ट्री डिलीट करणे गरजेचे आहे. कारण, कुणीही तुमची काय सर्च करता, कोणत्या विषयाचे व्हिडिओ अधिक पाहिले, हे पाहू शकते. त्यामुळे आधीच खबरदारी घेतलेली हिताची ठरू शकते.