Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5G बाबत अफवा पसरवणाऱ्यांची खैर नाही, सरकारचे कडक कारवाईचे आदेश

भारतात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनं थैमान घातलं आहे. याचदरम्यान, टेलिकॉम कंपन्यांनी देशात 5G टेस्टिंगसाठीच्या कामांना सुरुवात केली आहे.

5G बाबत अफवा पसरवणाऱ्यांची खैर नाही, सरकारचे कडक कारवाईचे आदेश
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 10:49 PM

नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनं थैमान (Second Wave of Corona) घातलं आहे. याचदरम्यान, टेलिकॉम कंपन्यांनी देशात 5G तंत्रज्ञानाच्या टेस्टिंगसाठीच्या कामांना सुरुवात केली आहे. दुसरीकडे सोशल मीडियावर 5G टेस्टिंगबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. व्हायरल मेसेजमध्ये देशातील कोरोनाच्या परिस्थितीला 5 जी तंत्रज्ञानाला जबाबदार धरण्यात आले आहे. अशा अनेक खोट्या बातम्या, मेसेजस फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होत आहेत. या निराधार दाव्यांद्वारे लोकांना सतत चेतावणी दिली जात आहे. परंतु आता सरकार याबाबत अधिकच कठोर बनत आहे. (Haryana Chief Secretary says they will Take Action On Rumours on 5G Technology and Covid 19)

गेल्या काही दिवसांपासून 5 जी नेटवर्कमुळे कोरोना पसरत असल्याच्या अफवा पसरत आहेत. हरियाणात तर या अफवांचं पेव फुटलं आहे. त्यामुळे हरियाणाचे मुख्य सचिव विजय वर्धन यांनी या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. अशा प्रकारच्या अफवा पसरविल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराच विजय वर्धन यांनी दिला आहे. तसेच देशात अजून 5 जीची (5G Technology) टेस्टिंगच सुरू झाली नसल्याचंही वर्धन यांनी स्पष्ट केलं आहे

यापूर्वी, मोबाईल टेलिकॉम सेवा प्रदात्यांचं व्यासपीठ असलेल्या COAI ने अशी मागणी केली आहे की, 5 जी टेक्नोलॉजी हे कोरोना साथीच्या प्रसाराचे कारण असल्याचे सांगून बनावट आणि दिशाभूल करणारे मेसेज सोशल मीडियावार पसरवले जात आहेत, ते त्वरित हटवावेत. COAI ने यासंदर्भात माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया सारख्या कंपन्या COAI च्या सदस्य आहेत.

5G संबंधित दिशाभूल करणारे ऑडिओ व्हायरल

महत्त्वाचे म्हणजे लोक सोशल मीडियावर असे ऑडिओ आणि व्हिडीओ मेसेज शेअर करत आहेत ज्यात देशातील कोविड -19 च्या वाढत्या परिस्थितीसाठी 5 जी टॉवर्सना दोषी ठरविण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून एक मेसेज सोशल मीडिया आणि व्हॉट्सअ‍ॅपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, त्यामध्ये असा दावा केला जात आहे की, 5 जी तंत्रज्ञानामुळे कोरोना साथीचा रोग पसरत आहे. परंतु या व्हायरल मेसेजमध्ये काहीच सत्य नाही आणि PIB फॅक्ट चेकच्या टीमने याबाबत पुष्टी केली

हरियाणाच्या मुख्य सचिवांचा इशारा

हरियाणाचे मुख्य सचिव विजय वर्धन यांनी एक पत्रक काढून हा इशारा दिला आहे. त्यांनी राज्यातील सर्व डीसी आणि एसपींना हे पत्रं पाठवून अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. 5जीमुळे कोरोना होत असल्यांच्या अफवांचं पेव फुटलं आहे. काही असामाजिक तत्त्वांकडून या अफवा पसरविल्या जात आहे. कोरोनाचा आणि 5जीचा काहीही संबंध नाही. त्यामुळे अशा अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश वर्धन यांनी पोलिसांना दिले आहेत. काही असामाजिक तत्त्वांकडून अफवा पसरवून 5जीच्या टॉवरला क्षती पोहोचवण्याचं कामही हो आहे. त्यांच्यावर तातडीने कारवाई करा. तसेच टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चरला हानी पोहोचणार नाही, याची काळजी घ्या, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.

5 जी टेस्टिंग सुरू झालेलं नाही

5 जी आणि कोरोनाचा काहीच संबंध नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. देशात अजून 5 जीची टेस्टिंगही सुरू झालेली नाही. केवळ जनतेला संभ्रमित करण्यासाठी सोशल मीडियावरून अशा प्रकारच्या अफवा पसरविल्या जात आहेत. अशा अफवांना काहीही वैज्ञानिक आधार नसल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानेहे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अशा अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

इतर बातम्या

मोबाईलमधल्या स्लो इंटरनेटमुळे वैतागलाय? मग ‘हे’ उपाय करुन पाहाच!

सावधान! फेसबुकवर कोव्हिड-19 आणि लसीसंदर्भात अफवा पसरवणं महागात पडेल, कंपनी कठोर पावलं उचलणार

Fact Check : अब्जाधीश किरण मजूमदारांनी नारळाचं तेल नाकात टाकून कोरोनापासून स्वत:ला वाचवलं? मेसेजमागील सत्य काय?

(Haryana Chief Secretary says they will Take Action On Rumours on 5G Technology and Covid 19)

शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.
बॅरिस्टर जिनांनाही मुस्लिमांची इतकी काळजी नव्हती, राऊतांची टीका
बॅरिस्टर जिनांनाही मुस्लिमांची इतकी काळजी नव्हती, राऊतांची टीका.
रुग्णालयाचा हलगर्जीपणा नडला; गर्भवती महिलेचा मृत्यू
रुग्णालयाचा हलगर्जीपणा नडला; गर्भवती महिलेचा मृत्यू.
राज ठाकरे यांना काही विशेष अधिकार बहाल नाही; गुणरत्न सदावर्ते डाफरले
राज ठाकरे यांना काही विशेष अधिकार बहाल नाही; गुणरत्न सदावर्ते डाफरले.
मी युटी म्हणजे युज अँड थ्रो म्हणू का?, 'एसंशिं' वर एकनाथ शिंदे संतापले
मी युटी म्हणजे युज अँड थ्रो म्हणू का?, 'एसंशिं' वर एकनाथ शिंदे संतापले.
दानवे काय एवढा मोठा विरोधी पक्ष नेता आहे का? चंद्रकांत खैरेंची नाराजी
दानवे काय एवढा मोठा विरोधी पक्ष नेता आहे का? चंद्रकांत खैरेंची नाराजी.
MNS Protest : मनसेचा धडक मोर्चा; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्या
MNS Protest : मनसेचा धडक मोर्चा; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्या.
हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला
हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला.
नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर
नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर.
कबुतरांना दाणे टाकताय, मोह आवरा;नाहीतर पडणार महागात, BMCचा निर्णय काय?
कबुतरांना दाणे टाकताय, मोह आवरा;नाहीतर पडणार महागात, BMCचा निर्णय काय?.