मोबाईल कासवाच्या वेगाने चालतोय? ‘या’ ट्रिक्सने माकडासारखा धावेल
Boost Smartphone Speed: तुमच्या मोबाईलचा स्पीड कमी झाला असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. तुमच्या स्मार्टफोनचा स्पीड वाढावा, यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहोत. फोनचा स्पीड खूप कमी झाला असेल तर तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला काही वर्क मोबाईल टिप्स सांगणार आहोत, ज्या फॉलो केल्यास तुमचा स्मार्टफोन वेगाने धावू लागेल
Boost Smartphone Speed: मोबाईलचा स्पीड कमी झाला? चिंता करू नका. कारण, आधी त्याची कारणे समजून घेतली पाहिजे आणि अर्थातच उपाय आम्ही सांगणारच आहोत. तुम्ही वर्षानुवर्षे एकच फोन चालवत असाल, ज्यामुळे तुमचा जुना फोन स्लो झाला असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. याविषयीच्या ट्रिक्स आणि टिप्स जाणून घ्या.
बराच काळ फोन वापरल्यानंतर कधी फोन स्लो होऊ लागतो, कधी बॅटरी ड्रेन सारखी समस्या उद्भवते, पण योग्य माहिती मिळाली तर ही समस्या सहज दूर होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, जर फोन कासवाच्या वेगाने चालत असेल तर कासवाच्या वेगाने धावणारा तुमचा फोन माकडासारखा चपळ व्हावा, यासाठी काय करावे, याविषयी जाणून घ्या.
मोबाईलच्या स्लो स्पीडवर काय उपाय करावे?
तुम्ही फोनच्या स्लो स्पीडमुळे त्रस्त असाल आणि फोनला बूस्ट करू इच्छित असाल तर आधी फोनचे स्टोरेज फुल नाही ना, हे तपासावे. फुल स्टोरेजमुळे फोन हँग होऊ लागतो आणि स्पीडही मंदावतो, या समस्येवर मात करण्यासाठी फोनमधून निरुपयोगी फोटो, व्हिडिओ आणि अॅप्स सारख्या निरुपयोगी गोष्टी डिलीट करा.
कॅश मेमरी साफ करा : फोनची कॅशे मेमरी नियमित साफ करा, जेणेकरून फोन वेगाने काम करेल. ब्राउझर आणि अॅप्सच्या कॅशे फाईल्स आणि कुकीज वेळेत क्लिअर न केल्यास फोन स्लो होऊ शकतो.
व्हायरस स्कॅन करा : अनोळखी साईटवरून फाईल किंवा एपीकेच्या माध्यमातून अॅप इन्स्टॉल केलं असेल तर अँटीव्हायरसच्या मदतीने फोनला व्हायरस तर नाही ना? व्हायरसमुळे फोन स्लोही होऊ शकतो, जर असे असेल तर अँटीव्हायरसच्या मदतीने व्हायरस काढून टाका.
अपडेट सॉफ्टवेअर : जर फोन स्लो चालत असेल तर सॉफ्टवेअर अपडेट देखील एक कारण असू शकते. फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन फोनसाठी कोणतेही अपडेट प्रलंबित नाही ना, हे तपासा, तसे असेल तर लगेच फोन अपडेट करा.
लक्षात घ्या की, मोबाईलची स्पीड कमी झाल्यास टेन्शन घ्यायची गरज नाही. फुल स्टोरेजमुळे फोन हँग होऊ लागतो आणि स्पीडही मंदावते. समस्येवर मात करण्यासाठी फोनमधून निरुपयोगी फोटो, व्हिडिओ आणि अॅप्स सारख्या निरुपयोगी गोष्टी डिलीट करा. तसेच आम्ही वर तुम्हाला दिलेली माहिती वापरा. आपण चिंता करण्यापेक्षा उपाय केल्यास तुमचा मोबाईल लवकर स्पीड पकडेल.