Instagram अकाउंट Facebook पासून वेगळं करण्यासाठी ‘या’ स्टेप्स फॉलो करा

कोणत्याही युजरने Instagram आणि Facebook अकाउंट लिंक केली असतील आणि तुम्हाला हे नको असेल तर आम्ही तुम्हाला दोन्ही अकाउंट डिसकनेक्ट करण्याबाबतची माहिती देत आहोत.

Instagram अकाउंट Facebook पासून वेगळं करण्यासाठी 'या' स्टेप्स फॉलो करा
Follow us
| Updated on: Nov 16, 2020 | 6:54 PM

मुंबई : काही युजर्स सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहेत, त्यांना फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंट एकमेकांशी लिंक करण्याचे फायदे माहीत असतीलच. दोन्ही सोशल मीडिया अकाउंट एकमेकांशी लिंक केल्यानंतर तुम्ही इन्स्टाग्रामवर शेअर केलेला फोटो, स्टेट्स त्याचवेळी फेसबुकवरही शेअर करता येतात. तसेच तुम्ही तुमच्या फेसबुकवरील मित्रांना इन्स्टाग्रामवर सहज शोधू शकता. दोन्ही अकाउंट लिंक करण्याचे अनेक फायदे आहेत, परंतु तुम्ही दोन्ही अकाउंट लिंक केली असतील आणि तुम्हाला हे नको असेल तर आम्ही तुम्हाला दोन्ही अकाउंट डिसकनेक्ट करण्याबाबतची माहिती देत आहोत. (How to Disconnect Instagram Account from Facebook)

इन्स्टाग्रामवर अकाउंट फेसबुकपासून डिसकनेक्ट कसं कराल?

1. सर्वात आधी तुम्ही तुमच्या फोनवर Instagram अकाउंटओपन करा.

2. त्यानंतर सेटिंग्समध्ये जा आणि तिथे लिंक अकाउंट्सवर क्लिक करा. त्यानंतर फेसबुक या ऑप्शनवर क्लिक करा.

3. iOS युजर्स जेव्हा फेसबुक ऑप्शनवर क्लिक करतील तेव्हा तुम्हाला डिसकनेक्ट फेसबुक अकाउंट असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करुन तुम्ही Instagram अकाऊंट फेसबुकपासून वेगळं (Disconnect) करु शकाल.

या स्टेप्स फोलो करुन जेव्हा तुम्ही दोन्ही अकाउंट डिसकनेक्ट कराल, त्यानंतर तुमच्या कोणत्याही इन्स्टाग्राम पोस्ट फेसबुकवर आपोआप शेअर होणार नाहीत.

फेसबुकपासून तुमचं इन्स्टाग्राम अकाउंट डिसकनेक्ट कसं कराल?

केवळ इन्स्टाग्रामवरुन फेसबुक अकाउंट करुन तुम्ही संतुष्ट झाला नाहीत तर तुम्ही फेसबुकवरुन तुमचं इन्स्टाग्राम अकाऊंट डिसकनेक्ट करु शकाल. तसेच दोन्ही अकाऊंट एकमेकांपासून डिसकनेक्ट करण्यापूर्वी शेअर केलेल्या पोस्ट चुटकीसरशी डिलीट करायच्या असतील, तर खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

1. सर्वात आधी तुम्ही तुमचं फेसबुक अकाउंट ओपन करा आणि सेटिंग्समध्ये जा. तिथे अ‍ॅप्सवर क्लिक करा. तिथे इन्स्टाग्राम अकाऊंट दिसेल, त्यावर क्लिक करुन तुम्ही डिसकनेक्ट पर्याय निवडून अकाउंट डिसकनेक्ट करु शकता. परंतु जर तिथे इन्स्टाग्राम अकाउंट दिसलं नाही तर सी मोर (See More) पर्यायावर क्लिक करा.

2. लिस्ट बटणावर क्लिक करुन इन्स्टाग्राम आयकॉनवर क्लिक करा.

3. तिथे तुम्हाला रिमूव्ह अ‍ॅप असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

4. त्यानंतर तुम्ही पॉप अप विंडोमध्ये जाऊन तिथल्या इन्स्टाग्राम बॉक्सवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला रिमूव्ह ऑल युअर इन्स्टाग्राम पोस्ट (Remove all your Instagram Posts) असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करताच तुमच्या फेसबुकवरील सर्व इन्स्टाग्राम पोस्ट डिलीट होतील.

संबंधित बातम्या

Whatsapp पेमेंट्सचा वापर करणार आहात? त्याआधी ‘या’ सहा गोष्टी लक्षात ठेवा

बापरे! Google Photos मध्ये फोटो साठवून ठेवण्यासाठी ‘इतके’ पैसे मोजावे लागणार

(How to Disconnect Instagram Account from Facebook)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.